Author: झुंज न्यूज

प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्याने, आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘झुंज न्यूज’ वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल करत आहोत. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय आपला प्रतिसाद आम्हाला नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे झुंज न्यूज परिवार आपले स्वागत करत आहे धन्यवाद. आपला अनिल वडघुले. संपर्क ‘झुंज न्यूज’ 9822083064 9673917313 9881444068 ईमेल Krantizunj@yahoo.in admin@zunjnews-in.preview-domain.com वेबसाईट : http://zunjnews-in.preview-domain.com

शंकर जगताप यांच्या प्रयत्नांना यश ; लाखो नागरिकांना दिलासा सांगवी I झुंज न्यूज : सांगवीतील पवना नदीलगतच्या निळ्या पूररेषेअंतर्गत असलेल्या निवासी आणि व्यावसायिक बांधकामांवरील कारवाईस अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह मंगळवारी स्थगिती दिली. भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या विनंतीवरून झालेल्या या निर्णयामुळे लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी नदीला पूर आल्यानंतर नदीपात्रा लगतच्या भागात पुराचे पाणी शिरते. त्यामुळे तेथील रहिवाशांना स्थलांतरित करावे लागते. पुराचा धोका असल्यामुळे निळ्या पूररेषेतील बांधकामामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या…

Read More

शिरूर I झुंज न्यूज : ग्रामदैवत गवळीबाबा तरुण मंडळाच्या वतीने शिरूर तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, शिवसेना तालुकाप्रमुख चेतना ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत गवळीबाबा तरुण मंडळाच्यावतीने तीर्थक्षेत्र तळेगाव ढमढेरे नगरीमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडावी म्हणून अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या पोलीस दलातील सर्व अधिकाऱ्यांना पाणी बॉटल व फळांचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील नागरिकांनी तोंड भरून कौतुक केले. पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी मनापासून आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख चंद्रकांत भुजबळ, शिवसेना विभाग प्रमुख नितीन मुळे, उपविभाग प्रमुख दीपक इंगळे, तळेगाव ढमढेरे गावचे शिवसेना संपर्कप्रमुख…

Read More

पिंपरी । झुंज न्यूज : दरवर्षी धम्मलिपी गौरव दिन – अनागारिक धम्मपाल जयंतीचे औचित्य साधून सेव बुद्धा केव अँड हेरिटेज, लेणी संवर्धक पुणे. यांच्या मार्फत लेणी संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय योगदानबद्दल दिला जाणारा सम्राट अशोक पुरस्कार यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी, पिंपरी येथे संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूह, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आला. याप्रसंगी संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूहच्या माया कांबळे, छाया बोरसे, पूजा वैद्य, ज्योती निकाळजे सर्व पदाधिकारी, सेव बुद्धा केव अँड हेरिटेज लेणी संवर्धक पुणेचे दीपक गायकवाड, सचिन साठे, संदीप शेंडगे, मनोज जगताप, अभिजित थोरात बौद्ध अभ्यासक, सुरज जगताप, प्राध्यापक आनंद देवडेकर , आमदार गौतम चाबुकस्वार, पुणे शहर…

Read More

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे आवाहन कार्यशाळेत डिजिटल मीडियातील तज्ञ करणार मार्गदर्शन पिंपरी I झुंज न्यूज : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने पिंपरी चिंचवड येथे राज्यस्तरीय डिजिटल मीडियाच्या कार्यशाळेचे आयोजन आचार्य अत्रे रंगमंदिर सभागृह पिंपरी येथे २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश आदक, उपाध्यक्ष सुरज साळवे तसेच डिजिटल मीडियाचे अध्यक्ष महावीर जाधव यांनी महाराष्ट्रातील डिजिटल मिळण्याच्या पत्रकारांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा पार पडणार आहे. कार्यशाळेचे उद्घाटन…

Read More

फिनिक्स मॉलसमोर गोळीबार करणाऱ्यांच्या वाकड पोलिसांनी आवळल्या मुसक्या वाकड I झुंज न्यूज : फिनिक्स मॉल येथे माथाडीचे काम न मिळाल्याने दहशत निर्माण करण्यासाठी सराईत गुन्हेगाराने गोळीबार केल्याचे उघडकीस आले आहे. वाकड पोलिसांनी फिनिक्स मॉलवरील गोळीबारामागचे कारण उघडकीस आणले असून दोघांना अटक केली आहे. अक्षय ऊर्फ बाला लहू शिंदे (वय ३०, रा. राधाकृष्ण कॉलनी, वाकड) आणि त्यांचा पळून जाण्यास मदत करणारा रंजित नथुराम सलगर (वय २४, रा. मसूर, ता. कराड, जि. सातारा) यांना अटक केली आहे. वाकड येथील फिनिक्स मॉल येथे १७ सप्टेबर रोजी सायंकाळी ६ वाजता फायरिंग केल्याचे उघडकीस आले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा हे फायरिंग बाळु शिंदे…

Read More

मोदी कॅबिनेटचा ‘ग्रीन सिग्नल’ ; ३२ पक्षांचा पाठिंबा दिल्ली I झुंज न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कारकिर्दीला आता शंभर दिवस होणार आहेत. त्यापूर्वी मोदी मंत्रिमंडळाने त्यांच्या जाहीरनाम्यातील महत्वाचा विषयाला मंजुरी दिली आहे. मोदी मंत्रिमंडळाने ‘एक देश एक निवडणूक’ हा प्रस्ताव मंजूर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारीच याबाबत वक्तव्य केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा कायदा कधीपासून लागू होईल, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणाची अंमलबजावणी झाल्यास देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची समिती गेल्या अनेक दिवसांपासून…

Read More

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा दोंदे येथे व्याख्यानमालेचे आयोजन पुणे I झुंज न्यूज : आपल्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात. परंतु सर्वांचेच उपयोग व महत्त्व आपल्याला माहीत नसतात. अगदी छोट्या छोट्या आजारांपासून ते मोठमोठ्या आजारांवर रामबाण उपाय म्हणून या वनस्पतींकडे पाहीले पाहिजे. आपल्या जीवनात झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे मत जगतापवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मीना म्हसे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा दोंदे येथे आयोजित व्याख्यानमालेत औषधी वनस्पतींचे उपयोग व महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे पाचवे पुष्प गुंफताना व्यक्त केले. खेड तालुक्यातील उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा दोंदे येथे गणेश उत्सवानिमित्त दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. या वर्षी…

Read More

पिंपळे सौदागर I झुंज न्यूज : पिंपळे सौदागर येथील रोझ व्हॅली सोसायटीतील रहिवाशांनी सोसायटीमध्ये विविध पर्यावरणपूरक प्रकल्प राबविले असून ते यशस्वीपणे राबवले जात आहेत. यापैकी एक उपक्रम म्हणजे स्वयंचलित लिफ्टची स्थापना, ज्यामुळे समाजासाठी 30% वार्षिक ऊर्जा बचत अपेक्षित आहे, ज्यामुळे आर्थिक भार कमी होईल आणि लक्षणीय बचत होईल. या प्रकल्पाचे उद्घाटन 15 सप्टेंबर 2024 रोजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शीतल ताई नाना काटे आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान, समिती सदस्यांनी इतर उपक्रमांची आणि सोसायटीने सुरू असलेल्या प्रकल्पांचीही माहिती दिली. नाना काटे यांनी या उपक्रमात स्वारस्य दाखवून पाहणी केली. महत्त्वाच्या…

Read More

गवळीबाबा तरुण मंडळ, शिवसेना शिरूर तालुका, सूर्या हॉस्पिटल व मंगल मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन शिरूर I झुंज न्यूज : तळेगाव ढमढेरे येथील मुळेवाडी येथे गवळीबाबा तरुण मंडळाच्या वतीने व शिवसेना शिरूर तालुका, सूर्या हॉस्पिटल शिक्रापूर, मंगल मेडिकल फाउंडेशन शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंगळे नगर येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ यांच्या शुभहस्ते व शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख चेतना ढमढेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख पूनम पोतले, शिवसेना…

Read More

बीड । झुंज न्यूज : बीड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रोहन सर्जेराव गायकवाड यांची निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारानुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने व नगरपरिषद गटनेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी रोहन गायकवाड यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुशांत सिंह बळीराम पवार यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात चांगल्या प्रकारचे योगदान व मोठ्या संख्येने पक्ष संघटना वाढीसाठी मजबूत प्रयत्न करावे अशी अपेक्षा…

Read More

– आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा – दिघीतील वाहतूक कोंडी कमी करण्यास होणार मदत पिंपरी I झुंज न्यूज : दिघी- भोसरीला जोडणारा सीएमई (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग) च्या भिंतीलगत असलेल्या दिघी बायपास रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. या रस्त्याचे काम सुरू झाले असून, लवकरच रहदारीसाठी खुला करण्यात येणार आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण पुढाकार घेतला आहे. दिघी-भोसरी सीएमई सीमा भिंतीलगतच्या रस्त्याचे काम करण्याबाबत स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार कामाला सुरूवात करण्यात आली. माजी नगरसेवक विकास डोळस म्हणाले की, दिघी-भोसरी सीएमई भिंतीलगतचा रस्त्यामुळे भोसरीला जाण्यासाठी पर्यायी रस्ता (बायपास) उपलब्ध…

Read More

काळेवाडीत हॉटेलमध्ये गोळीबार ; माजी नगरसेवकासह दोघांना अटक पिंपरी I झुंज न्यूज : एकाच आठवड्यात खून, खुनी हल्ला, यांसारख्या घटनांची साखळी सुरु असल्याने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेमकं चाललंय तरी काय ? असा सवाल नागरिक करू लागले आहेत. यातच काळेवाडीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. हॉटेलमध्ये बसलेल्या दोघांनी पिस्तुलातून टेबलवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना गुरुवारी (दि.१२) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका माजी नगरसेवकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. सचिन दत्तू नढे, विनोद जयवंत नढे अशी अटक केलेल्या माजी नगरसेवकांची नावे आहेत. तुषार लक्ष्मीचंद भोजवानी (वय २४, रा. पाचपिर चौक,…

Read More

– भाजपा आमदार महेश लांडगे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश – सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांच्या पाठपुराव्याला यश भोसरी । झुंज न्यूज : झपाट्याने विस्तारलेल्या च-होली परिसरातील म्हसोबा चौकातील भाजी मंडईचा प्रश्न अखेर सुटणार आहे. भाजी विक्रेत्यांची अडचण सोडविण्यासाठी मंडईतील स्वच्छतागृहासह उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश आमदार महेश लांडगे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. भाजी मंडईसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर समाविष्ट भागातील विकास कामांना चालना मिळाली. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्हिजन 20-20 च्या माध्यमातून समाविष्ट गावांचा विकास करण्यावर भर दिला. पाणीपुरवठयासह सर्व सोयी सुविधा सक्षमपणे उपलब्ध झाल्या. परिणामी, या भाग झपाट्याने…

Read More

पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर घालणा-या, समाजामधल्या प्रत्येक घटकाला व्यक्त होण्याची संधी देणा-या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओचा दुसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या खजिनदार व अभिनेत्री शुभांगी दामले, गायिका व अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओचे संचालक श्रीदत्त गायकवाड आदि उपस्थित होते. रेडिओच्या निर्मिती प्रमुख माधुरी ढमाले- कुलकर्णी यांनी वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रम अधिकारी विराज सवाई व निर्मिती सहाय्यक विद्या राणे यांनी रेडिओच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. मागील दोन वर्षांमध्ये…

Read More

१७ वर्ष वयोगटातील हॉलीबॉल स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी नवनगर विदयालय संघ विजयी पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड़ महानगरपालिका व जिल्हा क्रीड़ा परिषद पुणे, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी यांच्या सहकार्याने जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन ज्ञान प्रबोधिनी प्राचार्य विद्या उदास, व केंद्रप्रमुख डॉक्टर मनोज देवळेकर यांच्या हस्ते ज्ञान प्रबोधिनीच्या प्रांगणात संपन्न झाले. १४, १७ व १९ वयोगटातील मुले व मुलींच्या स्पर्धेत एकूण २८६ संघांनी सहभाग नोंदविला. १०/०९/२०२४ रोजी १७ वर्षे मुले यांच्या स्पर्धेस प्रारंभ झाला. याप्रसंगी स्पर्धाप्रमुख बन्सी आटवे, कबड्डी प्रशिक्षक भगवान सोनवणे उपस्थित होते. तसेच स्पर्धेत पंचप्रमुख मोशीन बागवान, अजित बोरकर, सायली मॅडम, अनिकेत बद्दी, अथर्व कोरगांवकर पंच म्हणून…

Read More

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍या प्रेयसीचा खून  थेरगाव I झुंज न्यूज : गणेशोत्सवाच्या धामधुमीत वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसात दुसरी खुनाची घटना घडली. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍या प्रेयसीचा प्रियकराने खून केला. त्यानंतर प्रेयसीचा मृतदेह रिक्षामध्ये ठेवून रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर उभी करून प्रियकर पसार झाला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. ११) सकाळी काळेवाडी स्मशानभूमीजवळ उघडकीस आला. शिवानी सोमनाथ सुपेकर (वय २७, रा. जगतापनगर, थेरगाव) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. प्रियकर विनायक आवळे हा पसार आहे. शिवानी हिच्या पतीचे २०१८ मध्ये निधन झाले आहे. शिवानीची आई काळेवाडी स्मशानभुमीजवळ राहाते. तर, संशयित आरोपी आवळे हा विवाहित असून तो पिंपरीत वास्त्व्यास आहे.…

Read More

दगडूशेठ ट्रस्ट कडून सन्मान ही भाग्याची बाब – राजेंद्र बांदल पुणे I झुंज न्यूज : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेचा श्रीमंत दगडूशेठ मंदिर ट्रस्ट आयोजित अथर्वशीर्ष पठणात प्रथम क्रमांक जाहीर!. सलग दुसऱ्या वर्षीही उपक्रम श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या थेट दारी. चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल च्या सूस शाखेला मागील वर्षी झालेल्या अथर्वशीर्ष पठाणा मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले. यासाठी ऋषिपंचमी च्या दिवशी ३९ हजार महिलांच्या समोर दगडूशेठ हलवाई ट्रस्ट कडून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांना ज्येष्ठ साहित्यिक कवयित्री मा. डॉ. अरुणाताई ढेरे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूनबाई वृषालीताई शिंदे,…

Read More

चौथ्या जागतिक सिलंबम स्पर्धेत भारताच्या संघास विजेतेपद मुळशी I झुंज न्यूज : मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य कविता पप्पू कंधारे यांचे चिरंजीव विशेष दंडाधिकारी अनंतराव चौधरी यांचे नातु आंतरराष्ट्रीय खेळाडू कु प्रसन्न पप्पू कंधारे यांना केरळ या ठिकाणी झालेल्या जागतिक सिलंबम स्पर्धेत प्रसन्न कंधारे यांना दोन कांस्यपदक मिळवून मुळशी तालुक्याचे नाव रोशन केले आहे तर प्रसन्न कंधारे हा सिलंबम स्पर्धेत देशाचे नेतृत्व केले आहे. जिमी जाॅर्ज इंडोअर स्टेडियम तिरूअनंतपुरम केरळ या ठिकाणी लाठी-काठी, तलवारबाजी, भाला चालवणे, सुरूल, मडू इत्यादी क्रीडा प्रकारात झालेल्या चौथ्या जागतिक सिलंबम स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 47 खेळाडूंनी भारतीय सिलंबम संघाचे प्रतिनिधित्व करत भारताच्या विजयात मोलाचे…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुर्तिजापूर मतदार संघात घोंगडी बैठक मुर्तीजापुर I झुंज न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध मतदार संघात 29 ऑगस्ट. 2024 ते 2 सप्टेंबर . 2024 दरम्यान घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वात 18 वक्ते सहभागी झाले होते. घोंगडी बैठकीच्या माध्यमातून पक्षाचे ध्येय धोरण आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचे गेल्या पन्नास वर्षातल्या राजकारणात महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान आणि ओबीसीसाठी केलेल्या कामासंदर्भात माहिती या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. घोंगडी बैठकीचा दुसरा टप्पा 11…

Read More

पिंपरी I झुंज न्यूज : गणेशोत्सव व पुढील सणासुदीच्या काळात शहरात अखंड वीजपुरवठा सुरू राहावा, यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष दक्षता घ्यावी, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) केली. पिंपरी-चिंचवड शहरातील वीज पुरवठा सुरळीत होण्याकरिता पिंपरी येथील महावितरण विभागीय कार्यालय येथे खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता शहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वासराव भोसले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सांगवी विभाग कल्याण गिरी, अतिरिक्त अभियंता खराडी विभाग भुजंग पवार, कार्यकारी अभियंता भोसरी विभाग अतुल देवकर, सहाय्यक कार्यकारी अभियंता किरण सरोदे, सहाय्यक कार्यकारी अभियंता रत्नदीप काळे, सहाय्यक कार्यकारी अभियंता…

Read More