Author: झुंज न्यूज

प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्याने, आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘झुंज न्यूज’ वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल करत आहोत. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय आपला प्रतिसाद आम्हाला नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे झुंज न्यूज परिवार आपले स्वागत करत आहे धन्यवाद. आपला अनिल वडघुले. संपर्क ‘झुंज न्यूज’ 9822083064 9673917313 9881444068 ईमेल Krantizunj@yahoo.in admin@zunjnews-in.preview-domain.com वेबसाईट : http://zunjnews-in.preview-domain.com

पुणे I झुंज न्यूज : चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या पौड शाखेत नॅशनल गणित दिनाचे औचित्य साधून प्रायमरी व सेकंडरी विभागातील विदयार्थी व शिक्षकवृंद यांच्या कडून आज नॅशनल मॅथेमॅटीक्स डे अत्यंत उत्साहात व थाटात साजरा करण्यात आला. गणित दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी सांख्यिकी खेळ, फ्लो चार्ट्स, वर्किंग मॉडेल्स बनवून विविध प्रकारे गणिती उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमाची माहिती व संदर्भासहित स्पष्टीकरण देवून सर्वाँना सांगितली. यामुळे अनेक संखिक मॉडेल्स बघायला मिळाले व विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती ला दाद देवून सोप्या पद्धती ने गणित विषय सादर करण्यासाठी वाव मिळाला. विद्यार्थ्यांची गणित विषयाची भिती जाऊन त्यांना गणित या…

Read More

– चिखली – कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर ‘बुलडोझर’ – बांगलादेशी, रोहिंग्यांवर कारवाई मागणी, प्रशासनाची थेट ‘पाडापाडी’ पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी- चिखली या भागातील अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड, भंगार दुकानांवर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. भंगार दुकानांमध्ये वारंवार लागणाऱ्या आगींच्या घटना आणि बांगलादेशी, रोहिंग्यांच्या बेकायदा वास्तव्याबाबत भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष वेधले आणि दोनच दिवसांत ‘बुलडोझर’ कारवाई सुरू झाली आहे. पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.०२ मधील मोरे-पाटील चौक ते कुदळवाडी पोलीस चौकी येथे १८ मीटर रुंद डी.पी. रस्ता (३०० मीटर लांबी ) व…

Read More

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन चिंचवड I झुंज न्यूज : चिंचवड हे स्थान पवित्र व जागृत आहे. येथे मोरया गोसावी महाराजांना साक्षात्कार झाला. मोरया गोसावी महाराजांच्या भूमीत ऊर्जा मिळते, अशा भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी चिंचवड येथे व्यक्त केल्या. माझ्या मोरयाचा धर्म जगभर जागो. मंगलमूर्तींचे आशीर्वाद सर्व जगाला लाभोत, अशी प्रार्थना करीत, प्रत्येकाने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या 463 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. चिंचवड देवस्थानचे मुख्य…

Read More

पिंपरी I झुंज न्यूज : क्रीडा व युवा सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेत भैरवी महेश सरोदे हिने १७ वर्षे मुलींच्या गटात प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकावले. बारामती येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये इयत्ता दहावीत शिकणारी भैरवी सरोदे हीने अंतिम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा व रमेश नांदल या क्रीडाशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई…

Read More

मराठा क्रांती मोर्चाच्‍या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्‍हाधिकाऱ्यांना निवेदन पिंपरी I झुंज न्यूज : बीड जिल्‍ह्याच्‍या केज तालुक्‍यातील मस्‍साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्‍या हत्‍येमध्ये सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांना त्वरित फाशीची शिक्षा द्या अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्‍या वतीने करण्यात आली आहे. तसेच हा खटला जलद गती न्‍यायालयात (फास्‍ट ट्रॅक कोर्ट) चालवावा अशीही मागणी करण्यात आली आहे. पुणे जिल्‍ह्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांना दिलेल्‍या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्‍वयक सतीश काळे गणेश देवराम गणेश कुंजीर नकुल भोईर यांनी मराठा क्रांती मोर्चाच्‍या वतीने दिलेल्‍या…

Read More

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार उद्घाटन पंडित संजीव अभ्यंकर, पंडित जयतीर्थ मेवूंडी, बेला शेंडे, शाहीद परवेझ, पं.राजस उपाध्ये, पं.विजय घाटे यांचा घडणार संगीत आविष्कार पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांना श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर चिंचवड I झुंज न्यूज :  श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2024 या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम व उपशास्त्रीय व सुगम संगीत, तसेच व्याख्यान, आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे…

Read More

पिंपरी I झुंज न्यूज : दक्षिण कोरियातील क्वांगवून विद्यापीठ जागतिक पातळीवर उत्कृष्ट, दर्जेदार, आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण देण्यासाठी नावलौकिक मिळवला आहे.‌ पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) शैक्षणिक समूहातील संस्थेमधील विद्यार्थी, प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च शैक्षणिक संधी, संशोधन करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे असे मत दक्षिण कोरियाच्या क्वांगवून विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विभाग संचालक डॉ. सुंगवू बेंजामिन चो यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) आणि क्वांगवून विद्यापीठ यांच्या मध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला.‌ निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे झालेल्या कार्यक्रमात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे पीसीईटी येथे कोरियन भाषा केंद्र, अल्प मुदतीचे पदविका…

Read More

जागा वाटपाचं सूत्र ठरलं ; ‘भाजपला २०, शिवसेना १२, राष्ट्रवादीला १० मंत्रीपदे’ मुंबई I झुंज न्यूज : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधावरी रात्री भेट घेतली. या भेटीवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत महायुतीमधील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार? यावर निर्णय झाल्याचे समजते. यानुसार भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अनुक्रमे २०, १२, १० मंत्रीपदे या सुत्रांवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि…

Read More

फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी पाच लाखांची मागणी ; प्राथमिक माहिती समोर न्याय-हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा सातारा I झुंज न्यूज : आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचारविरुद्ध दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय. लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याने प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्याविरुद्धची लढाई देखील मोठ्या आशेने न्यायालयात (Court) लढली जाते. मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानंतर, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे. त्यामुळे,…

Read More

माॅडर्न महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन पुणे I झुंज न्यूज : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवातीला डाॅ.रवींद्र क्षीरसागर व प्रा महेंद्र वाघमारे यांनी बुध्दवंदना सादर केली. या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ संजय खरात म्हणाले,” डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अभ्यासू शिक्षक, व्यासंगी नेता, वास्तुशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, संगीताचे जाणकार, समाजशास्त्रज्ञ, संत साहित्याचे गाढे आभ्यासक आणि घटनेचे शिल्पकार होते. अशा व्यक्तिमत्वाला जाणून घेणे हि एक जबाबदारी आहे. तानाजी खरावतेकर यांनी १९४६ साली डाॅ आंबेडकरांवर ग्रंथ लिहिला व कराची येथून प्रसिध्द केला. रवींद्रनाथ टागोरांनी डाॅ आंबेडकरांवर ‘बुद्धाचे पुनरागमन’ हि कविता केली…

Read More

सलगरा (बु) ग्रामस्थांच्या वतीने दमदार आमदार रमेश आप्पा कराड यांचा सत्कार लातूर I झुंज न्यूज : गेली अनेक वर्ष लातूर ग्रामीण विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या लातूर ग्रामीण मध्ये रमेश आप्पा कराड यांनी सुरांग लावला. यानिमित्ताने लातूर ग्रामीण मतदारसंघातील सलगरा बु. येथील ग्रामस्थांनी विद्यमान आमदार रमेश आप्पा कराड यांचे लातूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे भव्य सत्कार करण्यात आला. सलगरा (लातूर ग्रामीण) : महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरघोस मताने महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठवाड्यामधील लातूर शहरात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांचा राजकीय वारसा जपणारे आणि लातूर ग्रामीण विधानसभा…

Read More

जनतेने दाखवलेल्या विश्वासाने आणि प्रेमाने आमदार शंकर जगताप भारावले ; मतदारांचे मानले आभार सांगवी I झुंज न्यूज : चिंचवड विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी मतदारांचे आभार मानले. पिंपळे गुरव, नवी सांगवी, आणि सांगवी परिसरातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाने आणि प्रेमाने आपले मन भारावून गेले असल्याचे त्यांनी सांगितले. “आपल्या सन्मानाने आणि प्रेमाने मी धन्य झालो आहे. तुमच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्यानेच आज चिंचवड विधानसभा महाविजयाचा साक्षीदार ठरला आहे,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “या विजयामध्ये माझ्या लाडक्या बहिणी, युवक-युवती, मार्गदर्शक ज्येष्ठ नागरिक, माझ्या सहकारी मंडळी आणि विशेषतः मायमाऊलींचा मोलाचा वाटा आहे. या परिसरातील सर्वांगीण विकासासाठी तुम्ही…

Read More

शेवगाव I झुंज न्यूज : महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना शेवगाव च्या वतीने मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रध्दांजली अर्पण करून सर्व पोलीस कर्मचारी माजी सैनिक यांना गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद मानन्यात आले. महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य राहुल दुबाले, राज्य सचिव योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाधान नागरे (पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे, पोलीस उपनिरीक्षक लहाने, पो.कॉ सागरदादा मोहिते, माजी सैनिक सेवा संघचे सर्व…

Read More

जाणून घ्या, किती झाले मतदान अन् आकडेवारी कुठे जुळली नाही ? पुणे I झुंज न्यूज : राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. निकालाच्या आकडेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, तब्बल ९५ मतदार संघात मतदान केंद्रात झालेले मतदान आणि मतमोजणीत ईव्हीएम ईव्हीएममधून बाहेर आलेले आकडे यात मोठी तफावत असल्याचं आढळलं आहे. तफावत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ९५ मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबरला ईव्हीएममध्ये झालेले मतदान आणि २३ नोव्हेंबरला त्याच ईव्हीएममधून बाहेर आलेले प्रत्यक्ष मतदान यामध्ये फरक असल्याचे दिसते. दरम्यान, यावरून विरोधक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी लागले.…

Read More

यंदा परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर घेण्याचा राज्य मंडळाचा निर्णय पुणे I झुंज न्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे अंतिम वेळापत्रकाबाबतची माहिती दिली. राज्य मंडळाच्या वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा २४ जानेवारी…

Read More

मविआ उमेदवार राहुल कलाटे यांचे निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर चिंचवड । झुंज न्यूज : चिंचवडमध्ये मतदाना दरम्यान अनेक ठिकाणी ‘सजग रहो’ असे शर्ट घालून बूथ लावून एसपीजे फाउंडेशन संस्थेमार्फत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. गुड समरिटन स्कुल, वाकड गावठाण, विकासनगर, किवळे अशा अनेक भागात या संस्थेमार्फत बूथ उभारण्यात आलेले आहेत. मात्र ही रचना भाजप उमेदवाराचा थेट प्रचार करणारी असून, अशाप्रकारे हे आदर्श संहिता आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे, अशी लेखी तक्रार महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे सजग नागरी मंचकडून अनेक ठिकाणी बूथ उभारण्यात आलेले आहेत. या बुथवर…

Read More

राहुल कलाटेंचा दैनंदिन कामाचा धडाका नेहमीप्रमाणे सुरूच वाकड । झुंज न्यूज : चिंचवड मतदारसंघात मतदान पार पडले. दरम्यान जाहीर सभा, रॅली, वैयक्तिक गाठी भेठी अशा झंजावती प्रचारासाठी गेली पंधरा दिवस पायाला भिंगरी लावून दिवस रात्र व्यग्र असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे मतदान प्रक्रिया संपली तरी लोकांच्या भेटीगाठीत व्यग्र असल्याचे दिसून आले. मतदान झाले त्यामुळे उसंत घेण्याऐवजी रात्री उशिरापर्यंत तर आज सकाळपासुन त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेटीगाठीसाठी येणाऱ्यांचा राबता दिसून आला. आज सकाळी त्यांनी जनसंपर्क कार्यालयात बसून नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे. मतदार संघातील नागरीकांच्या भेटी, उदघाटने, विविध सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावत कलाटेंनी दैनंदिन कामाचा धडाका नेहमीप्रमाणे सुरू केला. जी जनता गेली…

Read More

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील – राजेंद्र बांदल बावधन I झुंज न्यूज : पुणे येथे झालेल्या  ४ थ्या त्वायकांदो फॉर ऑल ओपन इंटरक्लब चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेमध्ये पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज बावधन येथील इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी मल्हार दिपक कंधारे याने त्वायकांदो  स्पर्धेत पुणे विभागातून सुवर्णपदक पटकावले. विद्यार्थ्यांना पेरिविंकल स्कूलमध्ये केवळ शिक्षणच नव्हे तर इतर सुप्त गुण वाढीस लागण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते व तसे प्रोत्साहन मुलांना नेहमीच दिले जाते. विद्यार्थ्यांमधील इतर कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतील शिक्षक नेहमीच अविरतपणे झटत असतात. यावेळी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा…

Read More

नागरिकांच्या हाती निवडणूक सोपवून प्रचाराची सांगता केली – गव्हाणे महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत पदयात्रा ; नागरिकांना भावनिक साद भोसरी I झुंज न्यूज : भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत, त्यांच्याशी संवाद साधत महाविकास आघाडीचे भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी त्यांच्या प्रचाराची सांगता सोमवारी ( दि.18) केली. नागरिकांच्या पुढाकारातून भोसरी मतदारसंघांमध्ये परिवर्तनाचा लढा उभारला. नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता नागरिकांच्या हाती निवडणूक सोपवून निवडणूक प्रचाराची सांगता केली असल्याच्या भावना अजित गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केल्या. सोमवारी प्रचाराच्या सांगता दौऱ्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिला सुरक्षा, शिक्षण, बेरोजगारी आणि रोजगार या मुद्द्यावर महिलांनी यावेळी मतदारांना परिवर्तनाचे आवाहन देखील केले. महाविकास आघाडी…

Read More

– पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधव स्नेहमेळावा – कलाटे, गव्हाणे, शिलवंत-धर यांचे सर्व प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन चिंचवड । झुंज न्यूज : औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवड शहाराची पायाभरणी करणारे ८४ वर्षीय योद्धे शरद पवारांना यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच सर्व सामान्यांच्या हिताचे महाविकास आघाडी सरकार बहुमताने येण्यासाठी आघाडीच्या तिनही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी सोमवारी (ता. १८) शहरातील मुस्लिम बाांधवांना केले. पिंपरी-चिंचवड शहर मुस्लिम समाजाच्या वतीने चिंचवड-काळभोरनगर येथील सिझन बॅन्क्वेट हॉलमध्ये शहरातील मुस्लिम बांधवांचा स्नेहमेळावा झाला. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरुन पानसरे संवाद साधताना बोलत होते. यावेळी शहरातील मौलाना, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व मुस्लिम…

Read More