१७ वर्ष वयोगटातील हॉलीबॉल स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी नवनगर विदयालय संघ विजयी
पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड़ महानगरपालिका व जिल्हा क्रीड़ा परिषद पुणे, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी यांच्या सहकार्याने जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन ज्ञान प्रबोधिनी प्राचार्य विद्या उदास, व केंद्रप्रमुख डॉक्टर मनोज देवळेकर यांच्या हस्ते ज्ञान प्रबोधिनीच्या प्रांगणात संपन्न झाले.
१४, १७ व १९ वयोगटातील मुले व मुलींच्या स्पर्धेत एकूण २८६ संघांनी सहभाग नोंदविला. १०/०९/२०२४ रोजी १७ वर्षे मुले यांच्या स्पर्धेस प्रारंभ झाला. याप्रसंगी स्पर्धाप्रमुख बन्सी आटवे, कबड्डी प्रशिक्षक भगवान सोनवणे उपस्थित होते.
तसेच स्पर्धेत पंचप्रमुख मोशीन बागवान, अजित बोरकर, सायली मॅडम, अनिकेत बद्दी, अथर्व कोरगांवकर पंच म्हणून कामकाज पाहिले. डॉक्टर अमृता लोखंडे, मोनिका माटे, शेखर कुलकर्णी, शंभूराजे, विजय लोंढे, प्रशांत उबाळे, वृषाली शिरसाट यांहींची उपस्थिती होती.
सुभाष जावीर यांनी सूत्रसंचालन केले. विजय लोंढे यांनी आभार मानले. सुरेश मंजाळ, गणेश भोसले, हरिभाऊ गायकवाड, विठ्ठल पालखी, नितीश कलापुरे यांनी स्पर्धा यशस्वी होणे करिता परिश्रम घेतले.
१७ वर्ष मुले अंतिम निकाल खालील प्रमाणे
●प्रथम व द्वितीय क्रमांक●
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी वि.वि. रामचंद्र विद्यालय. दिघी इंग्रजी माध्यम : (२-०) [२५-१२,२५-१०]
विजय संघाकडून ऋषिकेश तेली, शौर्य काळोखे, रणवीर फलके यांनी उत्कृष्ट खेळ केला तर पराभूत संघांकडून आदित्य बेंद्रे, ईश्वर चव्हाण, सार्थक हांडे यांनी चांगली लढत दिली.
● तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांक●
सिटी प्राईड स्कूल, निगडी वि.वि. फत्तेचंद जैन विद्यालय, चिंचवड : (२-०) [१५-६,१५-८]
विजयी संघाकडून दर्श शेट्टी, चैतन्य देशपांडे, मणित गुप्ता यांनी उत्कृष्ट खेळ केला तर पराभूत संघांकडून ईशान माळी, पियुष लांडगे, वेदांत भालेकर यांनी चांगली लढत दिली.