शिरूर I झुंज न्यूज : ग्रामदैवत गवळीबाबा तरुण मंडळाच्या वतीने शिरूर तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, शिवसेना तालुकाप्रमुख चेतना ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत गवळीबाबा तरुण मंडळाच्यावतीने तीर्थक्षेत्र तळेगाव ढमढेरे नगरीमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडावी म्हणून अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या पोलीस दलातील सर्व अधिकाऱ्यांना पाणी बॉटल व फळांचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील नागरिकांनी तोंड भरून कौतुक केले.
पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी मनापासून आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख चंद्रकांत भुजबळ, शिवसेना विभाग प्रमुख नितीन मुळे, उपविभाग प्रमुख दीपक इंगळे, तळेगाव ढमढेरे गावचे शिवसेना संपर्कप्रमुख वसीमभाई बागवान, क्रांतिवीर पतसंस्थेचे चेअरमन निलेश नाना मुळे, आरोह बागवान यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.