फिनिक्स मॉलसमोर गोळीबार करणाऱ्यांच्या वाकड पोलिसांनी आवळल्या मुसक्या
वाकड I झुंज न्यूज : फिनिक्स मॉल येथे माथाडीचे काम न मिळाल्याने दहशत निर्माण करण्यासाठी सराईत गुन्हेगाराने गोळीबार केल्याचे उघडकीस आले आहे. वाकड पोलिसांनी फिनिक्स मॉलवरील गोळीबारामागचे कारण उघडकीस आणले असून दोघांना अटक केली आहे.
अक्षय ऊर्फ बाला लहू शिंदे (वय ३०, रा. राधाकृष्ण कॉलनी, वाकड) आणि त्यांचा पळून जाण्यास मदत करणारा रंजित नथुराम सलगर (वय २४, रा. मसूर, ता. कराड, जि. सातारा) यांना अटक केली आहे.
वाकड येथील फिनिक्स मॉल येथे १७ सप्टेबर रोजी सायंकाळी ६ वाजता फायरिंग केल्याचे उघडकीस आले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा हे फायरिंग बाळु शिंदे याने रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केल्याचे व कारमधून पळून गेल्याचे दिसून आले. अक्षय हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात जबरी चोरी, मारामारीचे दोन गुन्हे दाखल होते. तो लपून बसला होता. वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने त्याचा ठावठिकाणी शोधून त्याला टिपटॉप हॉटेल समोरील सर्व्हिस रोड आंडरपास येथे सापळा लावून पकडले. त्याला पळून जाण्यासाठी वापरलेली कारचा चालक रंजित सलगर याला कारसह वाकड येथील भुमकर चौकातून गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने ताब्यात घेतले.
गोळीबार करण्यामागचे कारण विचारले असता शिंदे याने सांगितले की, फिनिक्स मॉल येथे त्यास माथाडीचे काम मिळण्याबाबत पूर्वी सांगितले होते. परंतु, त्याला काम न मिळाल्याने त्याने दहशत निर्माण करण्याकरीता फायरिंग केल्याचे सांगितले. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
ही कामगिरी CP विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ विशाल हिरे, सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हाटकर, गुन्हे शाखा युनिट ४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप सावंत, सहायक पोलीस निरीक्षक पदमभूषण गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुद्ध सावर्डे, साळुंखे, बिभीषण कन्हेरकर, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदु गिरे, संदिप गवारी, स्वप्निल खेतले, प्रमोद कदम, अतिश जाधव, अतिक शेख, प्रशांत गिलबिले, संतोष महाजन, रामचंद्र तळपे, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, भास्कर भारती, कोतेंय खराडे, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे, सागर कोतवाल, मंगेश लोखंडे, तसेच गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस अंमलदार नदाफ, मुंडे, शेटे, गावंडे, गुट्टे व जायभाय यांनी मिळून केली आहे.