गवळीबाबा तरुण मंडळ, शिवसेना शिरूर तालुका, सूर्या हॉस्पिटल व मंगल मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
शिरूर I झुंज न्यूज : तळेगाव ढमढेरे येथील मुळेवाडी येथे गवळीबाबा तरुण मंडळाच्या वतीने व शिवसेना शिरूर तालुका, सूर्या हॉस्पिटल शिक्रापूर, मंगल मेडिकल फाउंडेशन शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंगळे नगर येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ यांच्या शुभहस्ते व शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख चेतना ढमढेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख पूनम पोतले, शिवसेना उपविभाग प्रमुख दीपक इंगळे, युवा नेते दुर्गेश भुजबळ, यशवंत मुळे, संजयराव पोतले, महिला बचत गटाचे अध्यक्ष पल्लवी मुळे, प्रांजल मुळे, मनीषा मुळे, रोहिणी मुळे, अर्चना मुळे, ज्ञानेश्वरी मुळे, नम्रता इंगळे, संगीता बोकले, मंगल दरेकर उपस्थित होत्या.
यावेळी आरती भुजबळ यांचा हिरकणी महिला बचत गटाचे अध्यक्ष प्रांजल मुळे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शिवसेना विभाग प्रमुख नितीन मुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले उपविभाग प्रमुख दीपक दादा इंगळे यांनी आभार मानले.