- मुखपृष्ठ
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राजकीय
- भटकंती
- देश – विदेश
- क्रीडा
- फिल्मी दुनिया
- आरोग्य
- गुन्हेगारी
- सांस्कृतिक
- लेखांकन
- काव्य लहरी
- व्हिडिओ
- Privacy policy
- DMCA
- DISCLAIMER
- ABOUT US
- CONTACT US
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: झुंज न्यूज
प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्याने, आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘झुंज न्यूज’ वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल करत आहोत. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय आपला प्रतिसाद आम्हाला नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे झुंज न्यूज परिवार आपले स्वागत करत आहे धन्यवाद. आपला अनिल वडघुले. संपर्क ‘झुंज न्यूज’ 9822083064 9673917313 9881444068 ईमेल Krantizunj@yahoo.in admin@zunjnews-in.preview-domain.com वेबसाईट : http://zunjnews-in.preview-domain.com
पुणे : महाराष्ट्रातिल सर्व चित्रकला प्रेमींसाठी तुषार पवार आणि लर्निंग वे ऑनलाईन क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन निमित्त भव्य ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. कलाप्रमींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आकर्षक पारितोषिकांसह या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी रक्षाबंधन आणि कोव्हीड – १९ हे विषय देण्यात आले असून या स्पर्धेसाठी वयाची कुठलीही अट ठेवण्यात आलेली नाही. प्रथम तीन विजेत्यांना रोख रक्कम आणि सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना इ सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक २५५१ रूपये, व्दितीय पारितोषिक १५५२ रूपये आणि तृतीय पारितोषिक ११५१ रूपये देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले चित्रकला ऑनलाईन व्हाट्स अॅप वर…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या टाकळीवाडी गावातील नामदेव पुंडलिक निर्मळे हे एका मिनिटांमध्ये नाकाला १४७ वेळा जिभ लावतात. त्यांनी ग्लोबल रेकॉर्ड अँड रिसर्च फाउंडेशन मध्ये विश्वविक्रम केलेला आहे. त्यांचे सध्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रोसिजर अंतिम टप्प्यात आहे. “जागतीक रेकॉर्ड हे १४२ एका मिनिटात नाकाला जीभ लावण्याची आहे. तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचेहि प्रोसिजर चालू आहे. त्यांच्या मार्गदशनाखाली त्यांची मुलगी स्वरा नामदेव निर्मळे ही एका मिनिटांमध्ये ३८ वेळा नाकाला जिभ लावत आहे. तिचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अवघ्या तीन वर्षाची स्वरा असून एवढ्या लहान वयात तिने हे रेकॉर्ड केले आहे हे विशेष. त्यांची दुसरी मुलगी दुसरी…
पिंपरी : आई, वडील रोजंदारीवर मोलमजूरी करणा-या व कुटूंबाला कोणतीही शैक्षणिक पार्श्वभुमी नसतानाही प्राची दिगंबर कांबळे या विद्यार्थीनीने दहावीच्या परिक्षेत ८९.८० टक्के मार्क मिळविले आहेत. संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटनेच्या शाळेत शिकणा-या प्राचीचे वडील रोजंदारीवर गवंडी काम करतात तर आई मोलकरीण म्हणून काम करते. प्राचीला अभियांत्रिकीची पदवी घेऊन पुढे भारतीय प्रशासन सेवेत (आयएएस) जायचे आहे. प्राची कांबळेच्या यशाबद्दल मुख्याध्यापक श्रीकांत कदम आणि असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
पिंपरी चिंचवड शहरातील या विद्यालयांचा निकाल १००% आहे. अनेकांनी आपली परंपरा टिकवुन ठेवली आहे. तर अनेक विद्यालयांचे १००% चे स्वप्न यावर्षी पुर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांसोबत विद्यालयाचे हि कौतुक नागरीक करित असून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये देशातील जवळजवळ सर्व गोष्टींवर रोख लावण्यात आली होती. त्यानंतर अनलॉक द्वारे हळू हळू व्यवसाय, उद्योगधंदे सुरु करण्यात आले. मात्र अनेक दिवसांपासून व्यायामशाळांबाबत निर्णय होत नव्हता. आता केंद्र सरकारने मोठा दिलासा देत देशातील जिम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. गृह मंत्रालयाने अनलॉक ३ मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे, त्याद्वारे रात्रीच्या वेळी व्यक्तींच्या हालचालीवरील निर्बंध हटविले गेले आहेत. तसेच योग संस्था आणि व्यायामशाळा ५ ऑगस्ट २०२० पासून उघडण्यास परवानगी दिली आहे. अनलॉक ३ मार्गदर्शक तत्त्वे १ ऑगस्ट पासून लागू होतील केंद्र सरकारने यावेळी अनलॉक ३ मध्ये कंटेनमेंट झोनच्या बाहेर आणखी काही गोष्टी सुरू करण्यासाठी…
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती, वाघोली, कुंजीरवाडी, मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्द, शेवाळवाडी, पेरणे, आव्हाळवाडी, खामगाव टेक या अकरा ग्रामपंचायत हद्दीतील कंटेनमेंट (प्रतिबंधीत क्षेत्र) झोनची सायंकाळी नव्याने पुर्नरचना करण्यात आली आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील मायक्रो कंटेनमेंट झोन वगळता उर्वरीत भागातील सर्व प्रकारची दुकाने व व्यवहार सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या दरम्यान चालू करण्यास हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी परवानगी दिली आहे. मायक्रो कंटेनमेंट झोन हद्दीत मात्र अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत व्यवहार पूर्वीप्रमाणेच बंद राहणार आहेत. तसेच, मायक्रो कंटेनमेंट झोन हद्दीत मात्र अत्यावश्यक सेवाही केवळ सकाळी दहा ते दुपारी दोन या दरम्यान चालू ठेवता येणार…
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने स्थापना दिनानिमित्त भारतीय हवामान विभागासाठी “मौसम” मोबाईल अॅप केले सुरु
मुंबई : अद्ययावत उपकरणे व तंत्रज्ञानावर आधारित हवामान अंदाज व सतर्कता सेवांचे प्रमाण सुधारण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने अलिकडच्या वर्षांत विविध उपक्रम राबविले आहेत. उपक्रमांची हीच श्रुंखला पुढे सुरु ठेवत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने भारतीय हवामान विभागासाठी “मौसम” हे मोबाइल अॅप सुरू केले आहे. हे मोबाइल अॅप प्लेस्टोअर आणि अॅपस्टोर या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. तांत्रिक कार्यकुशलतेशिवाय हवामानाची माहिती आणि पूर्वानुमान एका आकर्षक पद्धतीने एकत्रित करण्यासाठी डिझाइन केलेले हे मोबाइल अॅप सर्वसामान्यांना हाताळण्यास सोपे आहे. वापरकर्ते हवामान, हवामान अंदाज, रडार प्रतिमा यांचा वापरू शकतात आणि त्यांना हवामानाच्या घडामोडींसंदर्भात सतर्कतेचा इशारा मिळू शकतो मौसम मोबाइल अॅपवर खालील ५ सेवा उपलब्ध…
पिंपरी : कोरोना संसर्गाने मृत्यु झालेल्या रूग्णाच्या नातेवाईकांना मूखदर्शन मिळावे, अशी मागणी विरोधीपक्षनेते नाना काटे यांनी आयूक्त श्रावण हार्डिकर यांचेकडे पत्राद्वारे केली आहे. पिंपरी चिंचवड शहरामधे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे आजपर्यंत १७ हजार बाधीत रूग्ण आढळले आहे ३२१४ जनांवर वेगवेगळे उपचार सुरू आहेत. कोरोनाने २५२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अलिकडे बाधीत रुग्णांचे आकडे हाजाराच्या पटीत पोहोचले आहे. त्यामूळे शहरातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोना विषाणू संसर्गजन्य असल्याने मृत्यू झालेल्या रूग्णाचा देह प्लॅस्टिक वेष्टणामध्ये पॅक करून नातेवाईकांना न दाखविताच त्यांच्या उपस्थितीत पालिके मार्फत अंत्यसंस्कार केले जातात. नातेवाईकांना त्याचा चेहरा सूध्दा पाहता येत नाही. त्यामूळे नातेवाईक भावनीकदृष्ट्या खचून जातात तरी नातेवाईकांना…
भारत हा खेड्यांचा देश आहे. भारत खेड्यांमध्ये वसलेला देश आहे. भारताची खरी संस्कृती गावातचं आहे. खेड्यांकडे चला असे गांधीजी कधी काळ म्हणटले होते. या करोनाच्या संकटाने पुन्हा एकदा आपल्याला गावाकडे चला, गावात थांबा आणि गावाचा विकास करा शेती आणि मातीशी जवळ जाण्याची संधी दिली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वाधिक स्थलांतर करोनामुळे होत आहेत. लाखो मजुर आपापल्या गावी जात आहेत. या महामारीच्या काळात संपूर्ण जगाला सर्वच अंगाने फटका बसला आहे. यातील रोजगार हे अतीशय महत्वाचे घटक आहे. आता गावी असलेले कामगार ते परत कामासाठी शहरात जातील का ? या तरूणांना गावातच रोजगार मिळेल का? करोनानंतरचे परीस्थिती कशी असेल ? या विषयी अनेकांना…
पिंपरी : कोरोना या महामारीवर नियंत्रण मिळेपर्यंत राज्यातील ऑटो रिक्षा चालक, मालकांना केंद्र व राज्य सरकार आणि स्थानिक महानगरपालिकांनी प्रत्येकी साडेसात हजार रुपये मासिक अनुदान द्यावे. रिक्षासाठी परिवहन विभागाकडून आकारण्यात येणारे परवाना शुल्क, नुतनीकरण शुल्क, प्रवासी वाहतूक शुल्क, वाहन नोंदणी शुल्क असे सर्व शुल्क एक वर्षासाठी माफ करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी केली. कोरोना कोविड – १९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन केंद्र व राज्य सरकारने २५ मार्च २०२० पासून लॉकडाऊन केले. या लॉकडाऊन काळात राज्यातील ऑटो रिक्षा चालक व मालकांची न भूतो न भविष्यती असे आर्थिक नुकसान झाले आहे.…
गराडे (प्रतिनिधी) : राष्ट्रीय मानव अधिकार एवं भष्ट्राचार निवारण महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधीपदी भिवरी ( ता.पुरंदर ) येथील सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा सिताराम कटके यांची निवड झाली. निवडीचे पञ राष्ट्रीय मानव अधिकार प्रदेश अध्यक्ष रमेश गणगे यांनी श्री.कटके यांना दिले. यावेळी राष्ट्रीय कानून मंञी अँड. बाबूराव झेंडे, राज्य उपाध्यक्ष यशवंत कुंभार, युवा अध्यक्ष बाळासाहेब मदने, सचिव लक्ष्मण सुरवसे, सरचिटणीस विपुल ठक्कर, ओंकार बोराळे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत मदने, महिला अध्यक्ष भारती कदम आदी उपस्थित होते. धोंडीबा कटके हे उद्योजक असून त्यांनी भिवरी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपद व ग्रामपंचायत सदस्यपद कार्यक्षमतेने भूषविले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीना व…
मुंबई : सुशांतसिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे आणि अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुशांतच्या वडिलांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘माझा मुलगा सुशांतला फिल्म लाइन सोडून केरळमध्ये सेंद्रिय शेती करायची होती, त्याचा मित्र महेश त्याच्याबरोबर कुर्गला जाण्यास तयार होता, जेव्हा रियाने सांगितले की, ‘तू कोठेही जाणार नाहीस. आणि जर तू माझे ऐकत नसेल तर मी तुझा मेडिकल रिपोर्ट मीडियात देईन आणि सर्वांना सांगेल की तू वेडा आहेस’. सुशांतच्या वडिलांनी तक्रार दिली आहे की, जेव्हा रियाने पाहिले की सुशांत तिचं म्हणणं ऐकत नाही आणि त्याचा बँक बॅलन्स खूपच कमी झाला आहे,…
मुंबई : “शिवसेनेला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही आणि शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही” असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “कोणताही प्रस्ताव शिवसेनेकडून आम्हाला अथवा त्यांच्याकडून भाजपला आला नाही. भाजप आता स्वत:च्या ताकदीवर यापुढे असेल” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याचं पावसाळी अधिवेशन सप्टेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकललं असल्याची माहितीही त्यांनी दिली. “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. बिहारच्या राजकारणाचा दाखला देत चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बोलून दाखवली.…
मुंबई : मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकलाची प्रतिक्षा अखेर संपली असुन उद्या दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर केला जात असल्याचे कळवण्यात आले आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी, तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनी आहेत. दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचे गुण आता इतर विषयांमध्ये मिळणाऱ्या…
माळशिरस : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी रोहित विलास खाडे रा. म्हाळुंग ता माळशिरस यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. खाडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राज ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सुरेश टेळे यांनी हि नियुक्ती केली. याप्रसंगी माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, म्हाळुंग ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य विक्रांत काटे उपस्थित होते. सर्व स्तरावरून रोहित खाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पिंपरी : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे २७ जुलै पासून ‘प्लाॅझ्मा दान संकल्प’ अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान ३ आॅगस्ट २०२० पर्यंत सुरु राहणार आहे. ‘चला कोरोनाला हरवूया, चला प्लाझ्मा दान करूया’ या मोहिमेअंतर्गत ‘प्लाझ्मा दान संकल्प’ अभियान राबविण्यात आले आहे. यासाठी शिवसेनेकडून कोरोनामुक्त झालेल्यांशी संपर्क साधला जात आहे. प्लाझ्मा दान करू इच्छिणाऱ्याला वायसीएममध्ये नेण्याची आणि घरी सोडण्याची सोय केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोरोनाची परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळत आहेत. त्यांचे संपूर्ण राज्यावर बारीक लक्ष आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात ‘प्लाझ्मा दान संकल्प’ अभियान सुरु केले आहे. खासदार…
गराडे (प्रतिनिधी) : देशात कोविड -१९ ने दिवसागणिक अनेक नागरिक संक्रमित होत आहे. त्यावर अद्यापही कोणतेही प्रभावी औषध निघाले नाही.परंतु या आजाराच्या संक्रमणापासून प्रतिबंधात्मक म्हणून सरकारने प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे व सॅनिटायझरचा वापर करणे सुचवले आहे. तर या कोविड-१९ मध्ये पोलीस , सफाई कर्मचारी , नगरपरिषद कर्मचारी, महसूल कर्मचारी , पत्रकार, शिक्षक, आरोग्य कर्मचारी ,आशा सेविका , अंगणवाडी सेविका हे कोरोना योद्धा म्हणून काम करीत आहेत. क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण लिमीटेड ( ग्रामीण कुटा संस्थेने सामाजिक बांधिलकी म्हणून संपूर्ण देशात ज्या ठिकाणी कंपनी शाखा आहे त्या ठिकाणच्या कोरोना योद्धा यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सासवड…
ही त्या ३ फूट मुलीची कहाणी आहे जी समाजाचे टोमणे खाऊन आयएएस अधिकारी झाली. आपल्याकडे समाजात असे बरेच वर्ग आहेत जे मुलींना कमकुवत मानतात आणि शारीरिकरित्या अपंग राहिल्यास त्यांना तिरस्काराने पाहण्यास सुरुवात करतात. मी तुम्हाला अशाच एका मुलीची कहाणी सांगणार आहे, जिने शारीरिक आव्हान असताना समाजातील टोमणे खाल्ले, पचवले आणि एक दिवस इतकी मोठी झाली की तिने सर्वांचे तोंड बंद केले. आज त्यांची राजस्थानात अजमेरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तिचे नाव आहे आरती डोगरा….! जिची उंची फक्त 3 फूट ६ इंच आहे. समाजाचं टोमणे खाऊन आयएएस अधिकारी बनलेल्या त्या ३ फूट मुलीची कहाणी जाणून घ्या. आरती डोगरा आज…
गराडे ( प्रतिनिधी) : गुरोळी ता.पुरंदर येथील नूतन गणेश जाधव यांची हवेली तालुका कृृषी कन्या पदवीधर संघटना कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. कृषी पदवीधर संघटनेने राज्यातील कृषी व संलग्न पदवीधर आणि शेतकरी बांधवांचे संघटन करत असतानाच युवती आघाडी कृषिकन्यां साठी स्थापन केली आहे. कृषी पदवीधर च्या कोअर कमिटी प्रमुख मंगल कडूस पाटील यांनी कु. नूतन गणेश जाधव यांचे नाव युवती कार्याध्यक्ष म्हणून निश्चित केले. राज्यातील कृषी विद्यार्थी संघटीत करत असताना युवती विद्यार्थीनी यांचे प्रश्न दुर्लक्षित करुन चालणार नाही, त्यांना संघटीत केले पाहिजे. कृषी कन्या संघटीत होण्याची ही राज्यात पहीली वेळ आहे. पश्चिम महाराष्ट्र पातळीवर मी युवती संघटीत करुन महाराष्ट्रातील…
पुणे : पुण्याच्या वैभवशाली परंपरेत मानाचे स्थान असलेल्या गणेशोत्सवात दिमाखदार उत्सव अखिल मंडई मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने आणि शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन करण्यात येणार आहे. मंडळाच्या शारदा गजाननाची गेल्या १२७ वर्षांत यावर्षीच्या गणेशोत्सवात प्रथमच मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला मंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद काची, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट आदी उपस्थित होते. अण्णा थोरात म्हणाले, दरवर्षी अखिल मंडई मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाचे १२५ वे…