कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या टाकळीवाडी गावातील नामदेव पुंडलिक निर्मळे हे एका मिनिटांमध्ये नाकाला १४७ वेळा जिभ लावतात. त्यांनी ग्लोबल रेकॉर्ड अँड रिसर्च फाउंडेशन मध्ये विश्वविक्रम केलेला आहे. त्यांचे सध्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रोसिजर अंतिम टप्प्यात आहे.
“जागतीक रेकॉर्ड हे १४२ एका मिनिटात नाकाला जीभ लावण्याची आहे. तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचेहि प्रोसिजर चालू आहे. त्यांच्या मार्गदशनाखाली त्यांची मुलगी स्वरा नामदेव निर्मळे ही एका मिनिटांमध्ये ३८ वेळा नाकाला जिभ लावत आहे. तिचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अवघ्या तीन वर्षाची स्वरा असून एवढ्या लहान वयात तिने हे रेकॉर्ड केले आहे हे विशेष. त्यांची दुसरी मुलगी दुसरी मुलगी शौर्या नामदेव निर्मळे हिचे वय पाच वर्षे असून ती एका मिनिटांमध्ये ६० वेळा नाकाला जीभ लावते तिचे आशिया बुक ऑफ रेकॉर्ड प्रोसिजर चालू आहे आहेत व लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरु आहेत.”
नामदेव निर्मळे यांना ग्लोबल रेकॉर्ड अँड रीसर्च फाऊंडेशनसाठी व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडीचे चेअरमन माधवराव घाटगे, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, त्यांचे गुरु अनिरुद्ध शिपुगडे, कोल्हापूर व जय महाराष्ट्र रिपोर्टर ज्ञानेश्वर साळुंके, पुढारी मिडीया ग्रुप कोल्हापूर चेअरमन डॉक्टर योगेश जाधव, त्यांची बहीण कविता निर्मळे, वडील पुंडलिक निर्मळे, आई मंगल निर्मळे, शिवस्फूर्ती तरुण मंडळ, माजी सैनिक खोत, जयपाल काने, डीवायएसपी स्वाती गायकवाड यांचे मोलाचे योगदान लाभत आहे.