भारत हा खेड्यांचा देश आहे. भारत खेड्यांमध्ये वसलेला देश आहे. भारताची खरी संस्कृती गावातचं आहे. खेड्यांकडे चला असे गांधीजी कधी काळ म्हणटले होते. या करोनाच्या संकटाने पुन्हा एकदा आपल्याला गावाकडे चला, गावात थांबा आणि गावाचा विकास करा शेती आणि मातीशी जवळ जाण्याची संधी दिली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वाधिक स्थलांतर करोनामुळे होत आहेत. लाखो मजुर आपापल्या गावी जात आहेत. या महामारीच्या काळात संपूर्ण जगाला सर्वच अंगाने फटका बसला आहे. यातील रोजगार हे अतीशय महत्वाचे घटक आहे. आता गावी असलेले कामगार ते परत कामासाठी शहरात जातील का ? या तरूणांना गावातच रोजगार मिळेल का? करोनानंतरचे परीस्थिती कशी असेल ? या विषयी अनेकांना प्रश्न पडला आहे. महाराष्ट्रातून अंदाजे ११ लाख मजूर आपापल्या राज्यात गेले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सागितले.
राज्यातील आणखीन स्थलांतरीत मंजूरांची संख्याही लाखोमध्ये आहेत. तेही आज ना उद्या त्यांच्या गावाला जातीलच. करोनानंतर यातील काही तरूण कामासाठी परत शहरात येतील. पण ज्यांची परत शहरात येण्याची इच्छा नाही. त्यांच्यासाठी गावातचं एखादं कुटीर उद्योग, छोटा व्यापार, व्यवसाय किंवा शेतीपूरक जोडधंदा करावा लागेल. गावातील तरूणांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग करून गावात राहून गावाचा विकास करण्याची ही उत्तम संधी आहे. त्यासाठी अनेक उद्योग व्यवसाय आहेत. या उद्योगापैकी एक म्हणजे कृषी पर्यटन शेतीपूरक व्यवसाय होय. देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात कृषी पर्यनाला सुरूवाती झाली. राज्यात दर वर्षी शेकडो कृषी पर्यटन केंद्र उभे राहत आहेत. अनेक कृषी पर्यटन केंद्र यशस्वीपणे चालू आहेत. राज्यातील काही कृषी पर्यटन केंद्रांना भारतातील ग्रामीण संस्कृती समजून घेण्यासाठी विदेशी पर्यटक भेट देतात. ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम म्हणजे कृषी पर्यटन होय.
कृषी पर्यटन म्हणजे आपल्या शेतात शहरी पर्यटकांना बोलवून शेती आणि गावाची संस्कृती प्रत्यक्षात दाखवणे. शिवार फेरीच्या माध्यमातून शेती कशी पिकवली जाते. कशी केली जाते. विविध पिके, फळांची माहिती शहरी पर्यटकांना आपल्या पद्धीतने सांगणे. शेतकरी शेत पिकविण्यासाठी कधी काय, कसा आणि कोणासाठी मेहनत घेतो. याची प्रत्यक्ष माह्ति देऊन दुपारी अस्सल गावाराण जेवण त्या गावात, शेतात जे काही रानभाज्या किंवा स्थानिक भाज्या असेल ते पर्यटकांना खायायला देणे. संध्याकाळी कृषी पर्यटन केंद्रात स्थानिक व पारंपरिक खेळांची माहिती देणे/खेळणे. आलेल्या पर्यटकांना गावदर्शन घडविणे. गावातील प्रसिद्ध अशा गोष्टी सांगणे. गावाचा इतिहास, भूगोल, पर्यावरण आणि गावाचे आर्थिक गणित सागंणे. पर्यटकांना गाव आणि शेती संस्कृती विषयक माहिती देऊन समृद्ध करणे म्हणजे कृषी पर्यन होय. स्थानिक लोकांनी स्थानिक लोकांसाठी राबविलेले प्रकल्प म्हणजे कृषी पर्यटन होय. हे सगळं करताना शेतक-यांना पर्यटकांकडून काही तरी मोबदला मिळणारचं.
कृषी पर्यटन करण्यासाठी चार मह्त्वाचे घटक लागतात. ते म्हणजे गाव, शेती, शेतकरी आणि ग्राहक म्हणजे पर्यटक. जर गावातील दहा तरूणांनी एकत्र आले तर वरिल सर्व घटक सहज मिळू शकतात. काही तरूणांनी आपल्याकडे असलेल्या कौशल्यांचा योग्य वापर करून परिपूर्ण कृषी पर्यटन प्रकल्प उभा करू शकतात. मोक्याच्या परिसरात जर कोणाची शेती असेल तर त्या जमीनीचा उपयोग करून कृषी आणि शेती पर्यटन घडवू शकतो. मात्र आलेल्या पर्यटकांसाठी काही व्यवस्था करावी लागते. ती म्हणजे त्यांच्या राहण्याची, खाण्याची, फिरण्याची, सुरक्षेची व्यवस्था आणि इतर काही सुविधांसह कृषीरंजन उपक्रमांची सोय करणे गरजेचे आहे.
कृषी पर्यटन जसा सामुदायिक प्रकल्प आहे तसेच विविध प्रकल्पांचा समुह आहे. एका कृषी पर्यटन केंद्रात शेती तर केलीचं जाते. त्याच बरोबर मत्स्य व्यवसाय, कुकूटपालन, शेळी पालन, गोपालन, दुग्ध व्यवसाय, मध निर्मिती, सेंद्रिय शेती, फलबाग, शेती उत्पादने विक्री केंद्र आणि उतर काही व्यवसाय फक्त कृषी पर्यटन केंद्रा अंतर्गत करू शकतो. असा प्रकल्प जर गावा-गावात सुरू झाले तर पर्यटक समृद्ध होईलच पण गाव ही आर्थिक समृद्ध होण्यास कोणी रोखू शकणार नाही. कृषी पर्यटन केंद्र केरळ सारख्या निसर्ग संपन्न भागापासून राजस्थान सारख्या वाळवंटी भागापर्यंत सुरू करू शकतो. म्हणून निसर्गा दुष्काळापेक्षा विचारांची दुष्काळ दूर होणे महत्वाचे आहे. कृषी पर्यटन प्रकल्पाच्या परिसरात डोंगर, तलाव, धरण, वनराई, जंगल, नदी, समुद्र असावा असे अजिबात नाही. मराठवाड्यात अनेक कृषी पर्यटन केंद्र आहेत. स्थानिक संस्कृतीचा प्रतिबिबं त्या त्या कृषी पर्यटनात दिसेल पाहिजे.
कृषी पर्यटन हा एकमेव असा शेतीपूरक व्यवसाय आहे यातून शेतीचा आणि गावाचा विकास होतो. नगदी व्यवसाय व सर्वसमावेशक सामुदायिक प्रकल्प आहे. लोकसहभाग किंवा काही गटाच्या माध्यमातून देशातील कोणत्याही गावात कृषी व ग्रामीण पर्यटन प्रकल्प करू शकतो. त्यासाठी तरूणांची पुढाकार महत्वाचे आहे. एका कृषी पर्यटनाच्या माध्यमातून किमान २० रोजगार मिळू शकते. स्थलांतर थांबवू शकतो. पर्यावरणाचे संतूलन, ग्रामीण व शेती संस्कृतीचे संवर्धन करू शकतो. गावातील कला, खाद्य संकृती, राहणीमान, बोलीभाषा, पेहराव, जत्रा, यात्रा, उत्सव-महोत्सवांचे परंपरा जतन करू शकतो. गावाचं गावपण जपता येते. एखादा आदिवासी गावात कृषी पर्यटन केंद्र असेल तर पर्यटकांची पर्वणीच म्हणा. सुरूवातील भांडवल, जागा, ग्राहक आणि मार्केटिंगसाठी मेहनत घ्यावी लागेल. कृषी पर्यटन केंद्राचे पाया रोवायला किमान एक वर्ष तरी लागते. त्यानंतर ख-या अर्थाने कृषी पर्यटन एक उद्योग म्हणून चालवू शकतो. लोकसहभागातून, शेती गट, महिला बचत गट, गावातील तरूण मित्र मंडळ, शेतात विविध प्रयोग करणारे शेतकरी, कृषी विद्यार्थी, विकासात्मक किंवा कृषी व ग्रामीण भागात काम करणारी संस्था संबधीत व्यक्ती सहज आणि उत्तमरित्या कृषी व ग्रामीण पर्यटन प्रकल्प योग्यरित्या चालवू शकतो. फक्त लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
गणेश चप्पलवार
कृषी पर्यटन विश्व. पुणे
ई-मेल आयडी : chappalwarg@gmail.com
मोबा. ८८८८५५९८८६