गराडे ( प्रतिनिधी) : गुरोळी ता.पुरंदर येथील नूतन गणेश जाधव यांची हवेली तालुका कृृषी कन्या पदवीधर संघटना कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.
कृषी पदवीधर संघटनेने राज्यातील कृषी व संलग्न पदवीधर आणि शेतकरी बांधवांचे संघटन करत असतानाच युवती आघाडी कृषिकन्यां साठी स्थापन केली आहे. कृषी पदवीधर च्या कोअर कमिटी प्रमुख मंगल कडूस पाटील यांनी कु. नूतन गणेश जाधव यांचे नाव युवती कार्याध्यक्ष म्हणून निश्चित केले.
राज्यातील कृषी विद्यार्थी संघटीत करत असताना युवती विद्यार्थीनी यांचे प्रश्न दुर्लक्षित करुन चालणार नाही, त्यांना संघटीत केले पाहिजे. कृषी कन्या संघटीत होण्याची ही राज्यात पहीली वेळ आहे. पश्चिम महाराष्ट्र पातळीवर मी युवती संघटीत करुन महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी महाविद्यालयातील युवतींचे प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नवनिर्वाचित युवती कार्याध्यक्ष नूतन जाधव यांनी सांगितले आहे.
युवती आघाडी ही संकल्पना सौ मंगल कडूस पाटील यांनी मांडली असुन, महिला कृषी उद्योजकांच्या माध्यमातून महिलाच्या करिअर ला नवी झळाळी देण्यासाठी कृषि पदवीधर संघटना ची युवती आघाडी ही उपक्रम शील संघटन असणार आहे अशी माहिती भावना गायके कोअर यांनी दिली.
पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष गणेश कायगुडे, हवेली तालुका उपाध्यक्ष जयेश भदाणे , हवेली तालुका युवती उपाध्यक्ष.हर्षदा शिंदे यांची निवड तालुका पातळीवरील पदाधिकारी म्हणून झाली आहे. पुणे येथील आगामी युवती सोहळ्यात सर्व पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे भावना गायके यांनी सांगितले. कृषिकन्यांचे हे संघटन आता कृषी क्षेत्रातील विषय महत्वपूर्ण ठरतो आहे.