लोणीकंद I झुंज न्यूज : जीवन ऊन पावसाचा खेळ आहे.दुःखाने, अडीअडचनीने, परिस्रमाने खचलेल्या माणसाला कविता जीवनात उभारी देते म्हणून कविता हवी आहे, असे प्रतिपादन पाठ्यपुस्तकातील कवी व साहित्यिक सचिन बेंडभर यांनी केले.
पेरणे फाटा (ता. हवेली) येथे पंचक्रोशीतील जेष्ठ मंडळाच्या वतीने झालेल्या जागतिक कविता दिनानिमित्ताने ‘आठवणीतील कविता’ कार्यक्रमामध्ये बेंडभर बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते आबासाहेब गव्हाणे, संत प्रबोधन केंद्राचे अध्यक्ष उत्तमअण्णा भोंडवे, सुयश दिनदर्शिकेचे संपादक के.डी गव्हाणे, माजी सरपंच सिताराम बाजारे, अण्णासाहेब टुले, बाळासाहेब सातव, प्रकाश गोसावी, शिवाजी खांदवे, परशूराम कापरे, रवी कंद, बाबासाहेब गव्हाणे, आण्णासाहेब टुळे, प्रकाश गोसावी, रवी कंद, शरद ढमाले, सुहास धर्माधिकारी आदी सहभागी झाले होते.
बाप कष्टाचाच धनी
राबायचा दिनरात
सुख आणाया घरात
गेली हयात शेतात । ।
ही कविता सादर करुन बेंडभर म्हणाले, सध्याचे आयुष्य खूपच धक्काधक्कीच आहे. जर आपल्याला आयुष्यात समाधान पाहीजे असेल तर ते समाधान संत साहीत्यात आहे.संत साहित्य समाज व्यवस्थेला संस्कार देण्याचे काम करते.
यावेळी आबासाहेब गव्हाणे यांनी
आयुष्यात आजुन माझा करार बाकी आहे,
मावळताना लखलखण्याचा
विचार बाकी आहे.
तर
प्रकाश गोसावी यांची कवीता बालपणात घेऊन गेली.
बा निज गडे निज गडे लडवाळा
निज निज माझ्या बाळा
रवि गेला सोडून आकाशाला
धन जेसै दुभाग्याला
आण्णासाहेब टुले यांच्या
देशासाठी जागृत झाला
विर बाबु गेणू मेला
शूर मर्दाने अर्पिला जिवप्राण
या स्पूर्ती गिताने शहारे ऊभे राहीले.
आठवणीतील कविता मध्ये अनेकांनी पाठ्यपुस्तकातील कवीता सादर करुन जुन्या काळच्या आठवणी जागृत केल्या. यात अंभग, स्पुर्ती गिते, शेतकरी गिते,पोवाडे होऊन व्वा.. क्या बात बहुत खूब म्हणत टाळ्या .. हशा.. याने ही काळ्य मैफल रंगत गेली.
प्रारंभी जागतिक कविता दिनानिमित्त कवी सचिन बेंडभर याचा सत्कार करण्यात आला.बाळासाहेब ढगे यांनी स्वागत केले तर रविंद्र कंद यांनी सुत्र संचालन केले.सुयश दिनदर्शिकेचे संपादक के.डी गव्हाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.