स्वरगंध प्रस्तुत “दिवाळी पहाट” च्या सुमधुर संगीताने रसिक मंत्रमुग्ध
पेरिविंकल शिक्षणासाठीच नाही तर सांस्कृतिक वारसा जपण्यात सुद्धा अग्रगण्य – राजेंद्र बांदल
बावधन I झुंज न्यूज : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे 26 ऑक्टोबर 2024, शनिवार रोजी स्वरगंध प्रस्तुत “दिवाळी पहाट” या सुमधुर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पेरिविंकलचा ठसा हा केवळ शिक्षणासाठीच नाही तर सांस्कृतिक वारसा जपण्यात सुद्धा पेरिविंकल स्कूल ही अग्रगण्य आहे असा विश्वास यावेळी संस्थापक राजेंद्र बांदल यांनी व्यक्त केला.
सुर निरागस हो, दिवाना हुआ बादल, चिंब पावसाने रान झाले आबादानी, पापा कहते है अशा एक से एक बढकर गाण्यांनी परिविंकलची ही महादिवाळी पहाट रंगली होती. प्रेक्षकांनी या गाण्यांचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमासाठी बावधन गावातील नागरिक तसेच पालकवर्ग, विद्यार्थी, शिक्षक वृंद हे मोठ्या संख्येने उपस्थित होते व या सर्वांनीच कार्यक्रमाला अतिशय उस्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमास खुल्या मनाने दाद दिली.
कार्यक्रमाअंतर्गत फुड स्टॉल चे देखील नियोजन करण्यात आले होते.टोकन घेऊन भेळ,पोहे, चहा अशा विविध स्टॉल लावण्यात आले होते. त्यामुळे संगीतप्रेमी आणि खवैये या दोघांचा आज मिलाप होऊन बहारदार अशी स्वरगंध ची मैफिल आज सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करणारी ठरली.
या कार्यक्रमानंतर शाळेतील सर्व शिक्षकवृंदांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोनस मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले.
शाळेचे संस्थापक राजेंद्र बांदल सर व संचालिका रेखा बांदल यांनी दिवाळीचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दिवाळीच्या आभाळभर शुभेच्छा दिल्या. शाळेमध्ये असे कार्यक्रम वारंवार राबवण्यात येऊन अभ्यासाबरोबरच संस्कृती जपली जाणे हे आजकालच्या आधुनिक काळात तेवढेच गरजेचे असून विद्यार्थ्यांना असेच प्रोत्सह देण्याचे आवाहन यावेळी बांदल सर यांनी केले. सर्व कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व उत्साहात संपन्न झाला.
या यशस्वी कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या तरुण तडफदार डायरेक्टर शिवानी बांदल व सदैव हसतमुख अशा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका इंदू पाटील कल्याणी शेळके व नेहा माळवदे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आले होते. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय उत्कृषटपणे बावधन शाखेतल्या सायली गायकवाड, प्रज्ञा केळकर, लक्ष्मी परांजपे व सुस शाखेच्या प्रफुल्ला पाटील आणि सचिन खोडके सर यांनी केले.