घनगड प्रतिष्ठानचा उपक्रम ; चिमुकल्यांना केले मार्गदर्शन
मुळशी I झुंज न्यूज : मुळशी तालुक्यातील घनगड प्रतिष्ठान यांच्यावतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यांचे महत्त्व व दुर्ग रचना इतिहास लहान पिढीला जवळून अनुभवण्यस यावा यासाठी ‘दुर्ग बनवा व जाणून घ्या महाराजांचे दुर्ग विज्ञान’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव व प्राथमिक शाळा रसळवाडी या शाळेमध्ये दुर्ग बनविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. किल्ला साकारत असताना लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद होताच पण त्याचबरोबर दुर्ग जाणून घेण्याची ही उत्सुकता ही होती.
मुलांना किल्ल्यावरील प्रत्येक वास्तू पाहता येईल अशा पद्धतीने गडावर वास्तू बनवण्यात आल्या त्यामध्ये गडावरती ज्या प्रमुख वास्तू पाहण्यास मिळतात त्या वास्तू साकारण्यात आल्या. त्या मध्ये ध्वज भरून दरवाजा, पहारेकरांची जागा, तटबंदी सदर, घरे, पाण्याची टाकी, खडकात खोदलेल्या खोल्या, पायऱ्या, गडाचा घेरा व मेठाची जागा, नाळ, खांब, टाके, तडबंदी, बालेकिल्ला माची आशा गोष्टी साकारून प्रत्यक्ष मुलांना त्या माहिती होतील अशा पद्धतीने सादर करण्यात आल्या व त्यावर वस्तूंची नावे देऊन फलक लावण्यात आले.
गडाच्या समोर डोंगर असेल तर महाराजांची आज्ञा काय होती याबद्दल माहिती देण्यात आली व तशी प्रत्यक्षात प्रतिकृती दर्शविण्यात आली तसेच नांदगाव शाळेचे मुख्याध्यापक संदीप दुर्गेमुख्याध्यापिका प्रतीक्षा नाईक शाळा रसाळवाडी तसेच घनगड प्रतिष्ठानचे दुर्ग अभ्यासक अध्यक्ष नितेश खानेकर, महिला सदस्य अंजली मांडेकर, प्रतीक्षा सोळंके, राणी मांडेकर, निलेश घायतडकर, हरी दुर्गे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.