थेरगाव I झुंज न्यूज : रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे आज हजारो-लाखो लोकांना जीवनदान मिळते. त्यामुळे ‘रक्तदान हे जीवनदान’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. असे प्रतिपादन इंडियन ह्युमन राइट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी आघाडी रितेश भुजबळ यांनी केले.
थेरगाव परिसरातील बेलठिकानगर येथे इंडियन ह्युमन राइट्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष बी.आर.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रितेश भुजबळ यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात जवळपास ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास पनीरचे व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन समाजसेवक रविदादा भिलारे व प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अजिंक्य बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष सुमेध गायकवाड, सेक्युर एरा कंपनीचे डायरेक्टर साहिल गायकवाड व इंडियन ह्यूमन राइट्स असोसिएशनचे विद्यार्थी आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी आदित्य सोनवणे, सकलेन शेख, आकाश जाधव, यश उंबरे, तन्मय गायकवाड, कृष्णा वर्मा, वैभव साळुंखे, सुगत जोगदंड उपस्थित होते.
संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान असून त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचण्यात मदत होते. आजही समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. रक्तदान करणे किती गरजेचे आहे. या प्रकारचे मार्गदर्शन केले .