सांगवी I झुंज न्यूज : जुनी सांगवी येथील बॅंक ॲाफ महाराष्ट्र शाखेमध्ये “महाराष्ट्र राजभाषा मराठी” बोलत नसल्याने व ग्राहकांना उध्दट व ग्राहकानांच हिंदी बोलन्यांची सक्तीच करत असल्याने मनसेने मराठी भाषेसाठी थेट धडक देत मराठी बोलता येणाऱ्या मॅनेजर उपलब्ध करून देण्याचे निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत व्यवस्थापनाकडून हिंदी भाषिक मॅनेजरची बदली करून मराठी बोलता येणाऱ्या मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली.
“ मराठी भाषेच्या विषयावरून मनसेकडून शिवाजीनगर महाव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले होते. यासंदर्भात चर्चा केल्यानंतर त्वरित मॅनेजरची बदली करण्यात येईल असे महाव्यवस्थापकांनी आश्वासन दिले होते. आश्वासन दिल्याप्रमाणे त्या मॅनेजरची बदली करत नविन मॅनेजर नेमण्यात आले.
दरम्यान, मनसे सैनिकांनी बॅंक ॲाफ महाराष्ट्र महाव्यवस्थापकांचे आभार व्यक्त करत नविन नेमणूक झालेल्या मॅनेजर यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनसेचे पदाधिकारी उपशहराध्यक्ष राजू दत्तू सावळे, सुरेश सकट, अलेक्झांडर मोझेस, मंगेश भालेकर, विशाल पाटील, राकेश आणि अनेक मनसे सैनिक उपस्थित होते.