शिरूर I झुंज न्यूज : शिरूर तालुक्यातील ९ सदस्य संख्या असलेल्या टाकळी भीमा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सोडत पद्धतीने सरपंचपद एस सी कॅटेगरीसाठी निघाल्याने सरपंचपदी कोमल मारूती माहूलकर यांची बिनविरोध निवड झाली.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमधे कोमल माहूलकर या बहूमताने विजयी झाल्या आहेत. निवडणूकी पूर्वी सर्व ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले होते. परंतू निवडणूकीत आर्थिक व दबाव तंत्राचे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून मंत्री हसन मूश्रीफ आणि निवडणूक आयोगाने आरक्षण तहकूब केले होते.
“आज पून्हा नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यात एस सी, एस टी आरक्षण कायम ठेऊन इतर सर्व आरक्षणाची सोडत काढण्यात आली. टाकळी भिमा येथील वार्ड क्र १ मध्ये एस सी कॅटेगरीतील एकच उमेदवार कोमल माहूलकर यांच्या रूपाने होता. त्यामूळे कोमल यांची सरपंचपदी बिनविरोध निवड काळ्या दगडावरची रेग ठरली असून अधिकृत घोषणा बाकी आहे.
कोमल माहूलकर यांच्या विजया मध्ये मा. सरपंच रविंद्र दोरगे यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी या कूटूबांला नसतानाही थेट सरपंच पद मिळाल्याने हे कूटूंब आनंदाने भाराऊन गेले आहे. सर्व स्तरातून त्यांचावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.