(प्रतिनिधी : प्रभाकर कोळसे)
वृक्षवेड्या व्यक्तिला सागरबागच्या रूपाने श्रद्धांजली
हिंगणघाट I झुंज न्यूज : पेशाने वकिल पण झाडांच्या बाबतीत प्रचंड जिव्हाळा असलेल्या स्व. अँड. सागरजी हेमके यांच्या प्रथम पुण्यस्मरणा प्रित्यर्थ त्यांच्याच संकल्पनेतील मँगो पार्क व आयुर्वेदीक पार्कची स्वप्नपूर्ती “सागरबाग” चा पायाभरणी सोहळा पिंपळगाव रोडलगत वन विभागाच्या १ एकर जागेत पार पडला.
वर्धा वनविभाग, वर्धा व ग्रामपंचायत पिंपळगाव (माथनकर) यांच्या सयुंक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन संस्था, हिंगणघाटच्या वतिने आयोजित या समारंभास उपविभागिय अधिकारी चंद्रभानजी खंडाईत, तहसिलदार श्रीरामजी मुंधडा, सरपंच पुरूषोत्तमजी वरटकर, गिरधरजी राठी (माजी नगराध्यक्ष), हेमंतजी पावडे कार्यकारी अभियंता (MSEB), दिगांबरजी खांडरे संचालक- स्नेहल किसान नर्सरी, अँड. अशोकजी काकडे यावेळी उपस्थित होते.
झाडांना जगवण्यासाठी अक्षरशः डोक्यावर पाण्याचा गुंड घेऊन पाणी देण्याची धडपड. लग्न वा शुभ प्रसंगी आंब्याच झाड भेट म्हणून देणे ही प्रथा स्व. सागर हेमके यांनी सुरू केली. वृक्षतोडी विरोधात कायद्याचा दंडूक दाखवून वृक्ष तोडीवर लगाम घालणाऱ्या पण प्रसिद्धि पासून नेहमी दूर राहणाऱ्या वृक्षवेड्या व्यक्तिला सागरबाग च्या रूपाने श्रद्धांजलि वाहण्यात आली.
सागरबागच्या उभारणीला रविजी गोयनका, बाळूभाऊ शिंदे, प्रा. निता पटेल, नायडूजी, पंकज वानखेडे, श्रीवास ट्रेडर्स तसेच MSEB चे कार्यकारी अभियंता हेमंतजी पावडे, सुनिल डोंगरे यांनी मदत केली. उपस्थित पाहुण्यांनी उपक्रमाच कौतुक केलं आणि शासकिय स्तरावर पाहीजे असलेली मदत करू असे सांगत शुभेच्छा दिल्या. तर हेमंतजी पावडे यांनी MSEB च्या वतिने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. अभिजीत डाखोरे यांनी तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद माथनकर, प्रदिप गिरडे, सुनिल अराडे, सचिन थूल, दिपक जोशी, धनराज कुंभारे, कान्हा कलोडे, निलेश बलखंडे, नितीन पिटेकर, किशन माथनकर, संजूभाऊ मोरे, अजूभाऊ वानखेडे, हेमंत हिवरकर, माथनकर सर, तुषार हवाईकर, हेमंत महाजन, पवन डफ, रितू मोघे यांनी सहकार्य केले.
वनराईला पडलेलं एक स्वप्न म्हणजे “दिगंबरभाऊ खांडरे.”
शहर हिरवगार आणि आरोग्यदायी राहावं यासाठी सदैव तत्पर असलेले दिगांबरजी खांडरे यांनी “सागरबाग” च्या उभारणीला जवळपास ३५० झाडं विनामूल्य उपलब्ध करून दिली. यात मँगो पार्क मधे केसर, बारमाही, लंगडा, दशेरी, अम्रपाली तर आयुर्वेदीक पार्क मधे अडूळसा, बिहडा, हिरडा, ब्राम्हणी, नागकेसर, शिवलींग, हल्दु, अर्जुन, सागरगोटी इत्यादि प्रजाती लावण्यात येत आहे. तसेच दुर्मिळ होत चाललेल्या वृक्ष संपदेमधे कुसूम, टेटू, पाखड, मोह यांची लागवड होत आहे. तर कुंपणाच्या भोवती गोल्डन, बुद्धा, लॉजरपेथस, पालिपारमा, टुल्डा, आँसपर अशा ६ वेगवेगळ्या प्रकारच्या बांबूची लागवड करण्यात आली आहे.