(प्रतिनिधी : अमोल जगताप)
मुळशी I झुंज न्यूज : थेरगाव आणि हिंजवडी केंद्रा अंतर्गत मुळशी तालुक्यातील चांदेगाव येथे कृषी सप्ताह निमित्ताने ग्रामाभियान आयोजित करण्यात आले होते. भव्य पालखी सोहळ्याने या ग्रामाभियानाची सुरवात करण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थ व सेवेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन पालखी सोहळ्याचा आनंद घेतला. दिप प्रज्वलन व ग्रामस्थांनी भजन गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने व सतिशदादा यांच्या नियोजनाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जाधव यांनी स्वामी मार्गाविषयी व कृषी विषयी, संन्यासी यांनी जनकल्याण व सिद्धमंगल पूजे विषयी, काकडे यांनी बालसंस्कार विषयी मार्गदर्शन केले. तर शिर्के यांनी सणवार, वृत्त आणि भागवत यांनी आयुर्वेदा चे महत्व व माहिती सांगितली.
“ हिंजवडी केंद्रातील सेवेकरांनी उत्कृष्ट तयारी केली होती. जागा नियोजन, मार्गाचे फ्लेक्स नियोजन तसेच चांदेगाव स्थानिक ग्रामस्थांनी व मांडेकर परिवार यांनी प्रसादाचे व पाण्याचे उत्तम नियोजन केले होते. तर थेरगाव केंद्रातील महिलां सेवेकरी यांना मराठी संस्कृती मराठी अस्मिता अंतर्गत सणवार पूजेचे मांडणी केली होती. प्रत्येक येणाऱ्या सेवेकरांना सणवार व स्वामी मार्गा विषयी माहिती सांगितली. तसेच विवाह संस्कार, प्रश्न उत्तर विभाग, कृषी व जनकल्याण योजना प्रतिनिधी यांनी उपस्थित भाविकांना विभागा विषयी मार्गदर्शन केले.
थेरगाव केंद्रातील महिला व पुरुष सेवेकर्यांनी मराठी अस्मिता बरोबरच १८ वेगवेगळ्या विभागांचे मांडणी करून प्रबोधनाचे सेवा केली. त्यात अनेक विषयांवर चर्चा करुन मार्गदर्शन करण्यात आले. थेरगाव, हिंजवडी, राहटणी, काळेवाडी, पिंपरी, चांदेगाव आणि पंचक्रोशीतील सेवेकरी उत्स्फूर्तपणे ग्रामाभियान सेवेत सहभागी झाले होते.