( प्रतिनिधी : सुरज धेंडे )
पुरंदर I झुंज न्यूज : पाणी फाउंडेशन टीम बेलसर तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच बेलसर गावच्या सर्वांगीण विकास कार्यात विशेष योगदान व सहकार्य करणारे शासकीय कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, वायरमन, ग्रामपंचायत शिपाई, आजी, माजी सरपंच व उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळा बेलसर ग्रामपंचायत कार्यालयासमोर संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने सत्कारथींना शाल, नारळ व मोगर्याचे झाड व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
“ यावेळी एसएससी बोर्ड परीक्षा मार्च २०२० मध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल यशस्वी झालेले विद्यार्थी प्रथम क्र- शिवानी मामासाहेब गरूड, द्वितीय क्र- अंशु अलि अकबर मुलाणी, तृतीय क्र- सौरभ सोमनाथ पांढरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावच्या सर्वांगीण विकासात विशेष योगदान देणारे प्रमोद वाघमारे (कृषी सहाय्यक, बेलसर), महेश म्हेत्रे (ग्रामसेवक, बेलसर), रूपाली शेळके (तलाठी), डॉ. भरत शितोळे (प्राथमिक आरोग्य केंद्र), वैभव जगताप (वायरमन), अर्जुन धेंडे (पाणीपुरवठा विभाग, बेलसर), हरिभाऊ जगताप (ग्रा.पं. शिपाई) तसेच ग्रामपंचायत बेलसरचे सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बाळासो गरुड, प्रा हिंगणे सर, पाणी फाउंडेशनचे शहाजी गरुड, मयूर साळुंखे उपस्थित होते. तसेच माऊली जगताप, अनिल गरुड, माजी सरपंच बाळासो जगताप, मामासो गरुड, दिलीप जगताप, चंद्रकांत हिंगणे, प्रकाश बुधे, माकर सर, संभाजीराव गरुड, सलीम शेठ मुजावर, अर्जुन हरी धेंडे, हेमंत जगताप, तुषार कुदळे, बाळासो गरुड गुरुजी, पांडदादा जगताप, निखिल जगताप, सुजाता हिंगणे, स्वाती गरुड, पुनम जगताप, सोनाली रासकर, अश्विनी जगताप हे ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी शिवानी मामासो गरूड या विद्यार्थिनीचे मनोगत मन हेलावून टाकणारे होते. शहाजी सर यांनी सूत्रसंचालन केले. तर माजी सरपंच बाळासो जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.