पिंपरी I झुंज न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरहि वाकड, थेरगाव परिसरातील खासगी शाळांकडून पूर्ण फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांना तगादा लावलेला आहे. तरी शालेय फी मधून विद्यार्थ्यांना फी मध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेकडून करण्यात येत आहे.
कोव्हिड संक्रमणाच्या काळात सुटलेली कामे तसेच वैद्यकिय म्हणजेच औषधोपचारासाठी झालेला खर्च. या गोष्टि लक्षात घेता. तसेच शाळांचा मेन्टेंनसचा कमी झालेला खर्च पाहता तरी शाळा महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून १०० % फि घेताना दिसतात. त्यामुळे पालकांना मोठ्या मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शाळांचा मनमानी कारभार आणि फि सक्ती विरोधात छावा क्रांतीवीर सेना आक्रमक झाली असून आशा शाळांविरोधात छावा क्रांतीवीर सेना खळघट्याक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे.
छावा क्रांतीवीर सेनेकडुन मागणी वजा इशारा करणारे निवेदन महापौर शिक्षण मंडळाला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेला आहे. त्याकडे सोईस्कर दुलुक्ष करत प्रशासनाचा ढिम्म कारभार सुरु असून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे शाळेकडून फि साठी सुरु असलेल्या तगादामुळे पालकांचे मात्र हाल होत आहेत.
संजय ठाकरे
(पि. चि. युवा अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना)