ग्रामपंचायतीवर असणाऱ्या इंदोरीकरांच्या फोटोची दयनीय अवस्था
मावळ | झुंज न्यूज : मराठी तमाशा क्षेत्रातील आघाडीचे नाव म्हणजे वगसम्राट दादू इंदोरीकर हे बहूरंगी व बहूढंगी चौरंगी चिराच! दादू राघू सरोदे त्यांचे पूर्ण नाव हे मूळ पूणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदोरी गावचे रहिवासी आहे. आणि याच ग्रामस्थांना जणू विसरच पडला आहे असे दिसून येते.
ग्रामपंचायतीच्या सभागृहावर इंदोरीकरांचे नाव दिले खरे परंतू अतिशय जीर्ण अवस्था झालेले नाव व त्या समोरिल फोटो खराब, पूसट अशी दैनावस्था झाल्याने ग्रामस्थांना त्यांचा विसर पडला असेच वाटत आहे. दादू इंदोरीकर एक वगसम्राट तमाशा कलावंत एवढीच ओळख नव्या पिढीला आहे. त्या व्यतिरिक्त या महान कलावंताची कुठलीही माहीती नाही.
दादू हे इंदोरीचे रहिवासी असल्याने इंदोरीकर हे नाव लागले. फार पूर्वीपासून सदर कलाकार ज्या गावचा आहे त्या गावाच्या नावाने त्याला ओळखण्याची प्रथा होती. दादू राघू सरोदे यांचे सातवी पर्यंतचे शिक्षण गावातच झाले पूढे शिकून आदर्श शिक्षक किंवा अधिकारी होण्याचे स्वप्न होते. परंतू परिस्थिती आड आल्याने पैसा जमवण्यासाठी गळ्यात ढोलकी अडकविली आणि तिच जीवनाची सारथी झाली. ते उत्तम ढोलकी पटू झाले सोबतीला शाहीर कृष्णराव साबळे यांची साथ मिळाली आणि सूरू झाला सामना. हे दोन्ही उत्तम सोंगाडेही होते एक पाय पूढे टाकून ढोलकी वर थाप पडली कि प्रेक्षकांना एक टक खिळवून ठेवण्याची किमया दुसऱ्या कुणातही नव्हती. स्वतः वगनाट्य लिहायची त्या वगातिल नटाची भूमीका हूबेहूब रंगवायचे , वगातील उत्तम विनोद संवाद फेक यात ते पारंगत होते. त्यामूळे वगसम्राट, नटसम्राट, सोंगाड्या या बिरदावली घेऊनच लोकप्रिय झाले. त्यांचे वडिल व आजोबा मूकूंदा लहरी यांच्याकडून दादूंना तमाशाचे धडे मिळाले होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी स्वतःचा तमाशा फड सूरू केला मात्र कर्जाचा बोजा झाल्याने फड बंद करून जसराज थियटर्स नाट्य संस्थेत प्रवेश केला आणि घाणेकरांबरोबर गाढवाच लग्न या लोकनाट्यातील दादूंची सावळ्या कूंभाराची भूमीका एवढी अजरामर झाली कि पून्हा कधीही मागे वळून पाहिले नाही.
गाढवाच लग्न, आतून किर्तन वरून तमाशा, राणी अहिल्याबाई होळकर, मिठ्ठा राणी आदि वगनाट्यातील भूमिका अविस्मरणीय ठरल्या. १९७३ साली या सोंगाड्याला भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पूढे त्यांचा मुलगा गणेश यानेही वडीलांची परंपरा चालविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश मिळाले नाही. आतून अंगिक शब्द फेक, विनोदी संवाद , नटाचा दरारा याचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे राष्ट्रपती पदक विजेते वगसम्राट, विनोद सम्राट दादू इंदोरीकर .