लेखांकन – पूनम पाटील.
“आजपर्यंत वाटतं होते की UPSC किंवा MPSC च्या परीक्षा तरी भ्रष्टाचार मुक्त असतील पण पूजा खेडकर प्रकरणातून तो गैरसमज पण दूर झाला. शंभर कोटींची किंवा त्यापेक्षाही जास्त प्रॉपर्टी असतानाही आरक्षण चा फायदा घेऊन पुन्हा दिव्यांग कोट्यातून देखील खोटी कागदपत्र जमा करून IAS होता येत असेल तर जे गोरगरीब विद्यार्थी पोटाला चिमटा घेऊन दिवसरात्र मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात पण केवळ आरक्षण नसल्याने लायक असूनही त्यांचा नंबर लागत नाही त्यांनी कुठं जायचं?
आज हे एक प्रकरण समोर आले आहे असे कित्येक प्रकरण असतील जे आजवर उजेडात आलेच नसतील मग हा इतर “लायक” विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का? आज या पूजा खेडकर ने भ्रष्टाचार करून जे पद मिळवलं आहे ते कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीचे होते जी या पदाच्या लायक असेल पण त्याच्याकडे कदाचित सिस्टीम ला खाऊ घालायला एकतर पैसे नसतील किंवा आरक्षण नसेल म्हणुन या मॅडम आज एवढ्या महत्वाच्या पदावर जाऊन बसल्या आहेत मग इतर मुलामुलींनी काय करायचं ?
आणि नेमणूक व्हायच्या आधी जे मेडिकल सर्टिफिकेट जमा करायला सांगितले होते ते नियमाने ठरवून दिलेल्या सरकारी दवाखान्यातले सोडून खाजगी दवाखान्यातले का स्वीकारण्यात आले म्हणजे यात किती लोक सामील असतील आणि यांनी असे किती लोकांना पैसे खाऊन वरच्या पदावर पोचवलंय याची तपासणी व्हायलाच हवी नाहीतर ज्यांच्याकडे पैसा आणि आरक्षण त्यांच्याच भरत्या आणि बाकीच्यांनी काय लायकी असूनही टाळ कुटत बसायचे का ?
या पूजा खेडकर च्या आईने तपासासाठी गेलेल्या पोलिसांनाच आत टाकेल म्हणुन धमकी दिली आहे मग हा एवढा माज नेमक कोणाच्या जीवावर चालतो आणि एव्हडी हिंम्मत कोणाच्या जोरावर येते? तसेच जर कारवाई चालू असताना आणि सगळेच संशयस्पद असतानाही नोकरीत स्थगिती देण्याऐवजी दुसरीकडे पोस्टिंग देण्यात येते म्हणजे कायदा फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच आहे का ? या देशातला हेच निष्पन्न होतेय.
एकंदरीत आता सर्वसामान्य मुलांनी स्पर्धा परीक्षाचा नाद खरच सोडून द्यावा कारण तीन चार वेळा प्रामाणिक प्रयत्न करून देखील जर पैशाच्या आणि मिळालेल्या सवलतीच्या जोरावर तुमचा हक्क पूजा खेडकर सारखे भ्रष्ट लोक हिरावून घेत असतील तर तुम्हाला कधीच न्याय भेटणार नाही. या सिस्टीम मध्ये हे खूपच क्लेशदायक आहे !