- मुखपृष्ठ
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राजकीय
- भटकंती
- देश – विदेश
- क्रीडा
- फिल्मी दुनिया
- आरोग्य
- गुन्हेगारी
- सांस्कृतिक
- लेखांकन
- काव्य लहरी
- व्हिडिओ
- Privacy policy
- DMCA
- DISCLAIMER
- ABOUT US
- CONTACT US
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: झुंज न्यूज
प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्याने, आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘झुंज न्यूज’ वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल करत आहोत. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय आपला प्रतिसाद आम्हाला नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे झुंज न्यूज परिवार आपले स्वागत करत आहे धन्यवाद. आपला अनिल वडघुले. संपर्क ‘झुंज न्यूज’ 9822083064 9673917313 9881444068 ईमेल Krantizunj@yahoo.in admin@zunjnews-in.preview-domain.com वेबसाईट : http://zunjnews-in.preview-domain.com
पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघासाचे महाराष्ट्र स्वराज्य व मिञपक्षाचे अधिकृत उमदेवार बाळासाहेब ओव्हाळ यांचा निर्धार पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांनी पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बाळासाहेब ओव्हाळ यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन रविवारी प्रमुख कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी ओव्हाळ यांना पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघासाठी अधिकृत एबी फॉर्म देऊन त्याची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे ओव्हाळ यांच्या…
गेल्या दहा वर्षांच्या अधोगतीची परतफेड करण्यासाठी जनता आतुर- लंके भोसरी I झुंज न्यूज : ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी विधानसभेने, तसेच येथील नागरिकांनी गेल्या १० वर्षांमध्ये जे भोगले त्याची परतफेड करण्यासाठी जनता आतूर आहे. अजित गव्हाणे यांच्या रुपांत शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व मिळणार आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात “तुतारी वाजणार आणि बदल घडणार” असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिली आहे. अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांनी कोपरा सभा घेतली. त्यावेळी ते बोलत…
भोसरी मतदारसंघाला भय व भ्रष्टाचारमुक्त करण्याचा अपक्ष उमेदवार रवी लांडगे यांचा निर्धार पिंपरी I झुंज न्यूज : भोसरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी मंगळवारी मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. फक्त सत्ता, पैसा, पैशातून आलेल्या सत्तेचा गैरवापर, खोटी आश्वासने आणि दहशत व भ्रष्टाचाराने पिचलेल्या या जनतेनेच आता माझी निवडणूक हातात घेतली आहे. ही जनतेची आणि शिवसैनिकांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. भय आणि भ्रष्टाचारमुक्त भोसरी मतदारसंघ करण्यासाठी मी निवडणूक लढणार असल्याचे रवि लांडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगितले. यावेळी शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रभारी अशोक वाळके, शहर समन्वयक कैलास नेवासकर, उपशहरप्रमुख नेताजी काशीद, माजी विरोधी…
मा. नगरसेविका भीमाबाई फुगे, सम्राट फुगे यांनी तुतारी फुंकली ; गव्हाणे यांची ताकद वाढणार सुसंस्कृत, उच्चशिक्षित नेता अजित गव्हाणे यांच्या रूपाने शहराला लाभणार- भीमाबाई फुगे भोसरी I झुंज न्यूज : भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या गडाला अजित गव्हाणे यांनी सुरुंग लावला असून येथील भाजपचा गड ढासळताना दिसत आहे. भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई पोपटराव फुगे यांनी स्थानिक नेतृत्वाच्या दबावाला कंटाळून भाजपला रामराम करत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. स्थानिक नेतृत्वामुळे नाराज असून “आम्हाला शरद पवार साहेब यांचे नेतृत्व मान्य असल्याचे सांगितले. आगामी काळात गव्हाणे यांच्या माध्यमातून या शहराला सुसंस्कृत नेता मिळणार आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. दरम्यान…
भोसरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी साधला संवाद भोसरी I झुंज न्यूज : गेल्या दहा वर्षातील भोसरी विधानसभेमधील विद्यमान आमदारांचा कारभार पाहिला तर ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून दिले गेलेले टेंडर, फुगवलेले एस्टिमेट आणि त्यातून ढासळलेली कामाची गुणवत्ता हेच दिसून येईल. अगदी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या कामात कामाची हीच ढासळलेली गुणवत्ता दिसून आली. महाविकास आघाडीने हा मुद्दा समोर आणला. मात्र या सर्व कारभारावर महाराष्ट्र भर पिंपरी चिंचवडचे नाव मलीन झाल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी येथील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी केली. महाविकास आघाडीने भोसरी पिंपरी आणि चिंचवड या तीन विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले आहे. यामध्ये…
चिंचवड विधानसभेतून स्वराज्य राष्ट्र निर्माण सेनेची उमेदवारी पिंपरी I झुंज न्यूज : सामाजिक संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चिंचवड विधानसभेतून त्यांनी अपक्ष आणि स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना असे दोन उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. २८) दाखल केले.शहरातील सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरला.अर्ज भरण्यापूर्वी पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास,महात्मा फुले आणि सावित्री माई फुले,मोरवाडी चौकातील राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून भव्य रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते,…
जागृत नागरिक महासंघाची महापालिका आयुक्तांकडे मागणी पिंपरी I झुंज न्यूज : मनपा सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याची देणी मिळणे व पेन्शन चालू होणे हा त्यांचा कायदेशीर हक्क व अधिकार आहे तथापि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सेवा पुस्तक लेखा परीक्षणासाठी उशिरा जाते व त्यातील त्रुटींची पूर्ततासाठी विविध विभागांना चक्रा मारताना कर्मचाऱ्याची अक्षरश: ससेहोलपट होते. 30-35 वर्ष प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेळी ससेहोलपट होऊ नये म्हणून त्यांचे सेवापुस्तक लेखापरीक्षण 18 महिने अगोदर व्हावे आणि ज्या अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन साठी काही वर्षे वाट पाहावी लागते त्यांची चौकशी करून त्यांच्या वर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जागृत नागरिक महासंघाने मा आयुक्तांकडे…
पिंपरी I झुंज न्यूज : चिरतरुण ज्येष्ठ नागरिक संघाचा दुसरा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यासाठी पिंपरी चिंचवड जेष्ठ नागरिक महासंघाच्या प्रथम महिला अध्यक्ष वृषाली मरळ, सायकल मित्र श्री पाटील सर आणि पर्यावरण प्रेमी मित्र श्री कन्हेरे यांची प्रमुख उपस्थितीती होती. श्री पाटील सरांनी त्यांच्या सायकल मित्र या उपाधी बद्धल विस्तृत माहिती दिली. तसेच श्री कन्हेरे सर यांनी त्याच्या पर्यावरण प्रेमाबद्दल माहिती दिली. त्याना पिंपरी चिंचवड महापालिका तर्फे स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली आहे. कार्यक्रमच्या अध्यक्ष म्हणून वृषाली मरळ यांनी विशेष मार्गदर्शन केले. चिरतरुण जेष्ठ नागरिक संघ हि वूड्स व्हिल्ले 3 मधील सामाजिक, धार्मिक, आरोग्य या सर्व स्थरा…
घनगड प्रतिष्ठानचा उपक्रम ; चिमुकल्यांना केले मार्गदर्शन मुळशी I झुंज न्यूज : मुळशी तालुक्यातील घनगड प्रतिष्ठान यांच्यावतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यांचे महत्त्व व दुर्ग रचना इतिहास लहान पिढीला जवळून अनुभवण्यस यावा यासाठी ‘दुर्ग बनवा व जाणून घ्या महाराजांचे दुर्ग विज्ञान’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव व प्राथमिक शाळा रसळवाडी या शाळेमध्ये दुर्ग बनविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. किल्ला साकारत असताना लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद होताच पण त्याचबरोबर दुर्ग जाणून घेण्याची ही उत्सुकता ही होती. मुलांना किल्ल्यावरील प्रत्येक वास्तू पाहता येईल अशा पद्धतीने गडावर वास्तू बनवण्यात आल्या त्यामध्ये गडावरती…
स्वरगंध प्रस्तुत “दिवाळी पहाट” च्या सुमधुर संगीताने रसिक मंत्रमुग्ध पेरिविंकल शिक्षणासाठीच नाही तर सांस्कृतिक वारसा जपण्यात सुद्धा अग्रगण्य – राजेंद्र बांदल बावधन I झुंज न्यूज : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे 26 ऑक्टोबर 2024, शनिवार रोजी स्वरगंध प्रस्तुत “दिवाळी पहाट” या सुमधुर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पेरिविंकलचा ठसा हा केवळ शिक्षणासाठीच नाही तर सांस्कृतिक वारसा जपण्यात सुद्धा पेरिविंकल स्कूल ही अग्रगण्य आहे असा विश्वास यावेळी संस्थापक राजेंद्र बांदल यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचा प्रारंभ हा पारंपरिक सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आला. प्रसिद्ध गायिका अनघा नवरे, गायक आनंद नवरे व…
पिंपरी चिंचवड महापालिकेचे मतदार जनजागृती अभियान पिंपरी I झुंज न्यूज : “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू”, अशी शपथ चिंचवड येथील संघवी केसरी महाविद्यालयात नवमतदार विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी घेतली. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आज…
पिंपरी I झुंज न्यूज : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) लीगल सेलच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपचे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजयुमोची नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय महामंत्री वैभव सिंह, प्रदेशाध्यक्ष अनुप दादा मोरे, प्रदेश उपाध्यक्ष निवेदिताताई एकबोटे, प्रदेश सचिव अजित कुलथे, प्रदेश सचिव तेजेस्विनी कदम, मा. उपमहापोर शहराध्यक्ष तुषार हिंगे, मा, शहराध्यक्ष संकेत चोंधे व लीगल सेल शहराध्यक्ष ॲड. राजेश राजपुरोहित यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यावेळी नवीन पाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. शहराच्या सरचिटणीस (महामंत्री) पदी माहिती अधिकार अक्टीविस्ट प्रदीप नाईक व महेश मार्कड यांना…
नवीन बावधन पोलिस स्टेशनमुळे गुन्हेगारीला आळा बसेल – राजेंद्र बांदल बावधन I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या बावधन पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांचा पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज च्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् व हिमालय नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेन्द्र बांदल, सुहास दगडे, NCP चे जिल्ह्याचे नेते संतोष दगडे व T.V.-9 चे पत्रकार प्रो. संजय दुधाणे आदी मान्यवर उपस्थित होते. बावधन गाव आता गाव न राहता शहराकडे वळत चालल्याने सुरक्षितता ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. केवळ बावधनच नव्हे…
पुणे I झुंज न्यूज : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील ‘फ्युचर्स बॅकर्स फोरम’ने (FBF) दरवर्षी प्रमाणे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या आई पालकांसाठी गृहलक्ष्मी आर्थिक साक्षरता कार्यक्रम व मार्गदर्शन सत्र आयोजित केले. यावर्षी या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. कार्यक्रमाची सुरुवात माॅडर्न गीताने करण्यात आली आणि सहभागींना महाविद्यालयाचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला. वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डाॅ शुभांगी जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा विजयालक्ष्मी कुलकर्णी यांनी FBF ची माहिती दिली. पुणे पीपल्स बँकेचे माजी कार्यकारी अधिकरी सदानंद दीक्षित यांनी पालकांच्या भूमिकेवर सहभागींशी संवाद साधला आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर :ऑनलाइन खाते ऑपरेशन प्रक्रिया, नामनिर्देशन, बँकिंग लोकपाल इ मार्गदर्शन केले. या सत्रात पालकांसाठी प्रश्नमंजुषा…
रामकृष्ण मोरे प्रेक्षगृहात दिव्यांग महामहोत्सव ; ३३ शाळांचा सहभाग चिंचवड I झुंज न्यूज : रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह पिंपरी चिंचवड या ठिकाणी विशेष मुलांचा यहा के हम सिकंदर या सांस्कृतिक कार्यक्रमांचा महामहोत्सव संपन्न झाला. दिव्यांग महोत्सवाची संकल्पना बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती च्या अध्यक्ष आणि अभिनेत्री नीलम शिर्के – सामंत यांच्या माध्यमातून साकार झाली. दिव्यांग महामहोत्सवाचे उद्घाटन नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती चे अध्यक्ष नीलम ताई शिर्के सामंत, उत्पादन शुल्कचे माजी आयुक्त कांतीलालजी उमाप , बालरंगभूमी परिषदेत पुणे च्या अध्यक्ष दिपाली शेळके , शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे , बिरदवडे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स चे धीरज बिरदवडे, मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष राजू…
पं.सुधीर नायक यांच्या एकल संवादिनी वादनाचा आणि पं. शौनक अभिषेकी यांच्या सुश्राव्य गायनाचा आस्वाद निगडी I झुंज न्यूज : निगडी प्राधिकरणामधील ज्ञानप्रबोधिनी संकुलाच्या सभागृहात वीणा संगीत विद्यालयाच्या प्रथम वर्धापनदिना निमित्य कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून पं.सुधीर नायक यांच्या एकल संवादिनी वादनाचा तसेच पं. शौनक अभिषेकी यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम पार पडला. पं.सुधीर नायक यांनी मुलतानी या रागात विलंबित एकताल, द्रुत त्रिताल व द्रुत एकतालात बंदीशी सादर केल्या. यानंतर देस तिलक रागातील धून, एक भावगीत तसेच एक अभंग सादर करुन आपले वादन संपविले. त्यानंतर पं. शौनक यांनी प्रथम प्रतापवराळी हा राग सादर केला. या रागानंतर कलावती व झिंजोटी या रागांचा अंतर्भाव असलेली…
पिंपरी I झुंज न्यूज : पथ विक्रेता समिती निवडणूक निवडणूक २०२४ करिता महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ, नॅशनल हॉकर फेडरेशनच्या वतीने उमेदवारांचे पॅनल उभे करण्यात आलेले आहे या पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने आज जाहीर पाठिंबा देण्यात आला. सर्वसाधारण गट -किरण श्रीधर साडेकर सर्वसाधारण गट -राजू विलास बिराजदार सर्वसाधारण महिला गट-संगीता दत्तात्रय शेरखाने अनुसूचित जाती गट – प्रल्हाद रामभाऊ कांबळे अनुसूचित जमाती गट -किसन रामा भोसले अल्पसंख्यांक गट -सलीम बाबालाल डांगे विकलांग गट -अलका सुनील रोकडे कप बशी या चिन्हासमोर शिक्का मारून या पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच महासंघाचे…
स्पर्धेत ३०० हुन अधिक विद्यर्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद थेरगाव I झुंज न्यूज : भारतीय संस्कृतीमधील सर्वात मोठा सण “दीपोत्सव”म्हणजे दिवाळी.. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा हा सण आनंदाने साजरा करण्यासाठी त्याची पूर्वतयारी म्हणून प्रेरणा प्राथमिक विद्यामंदिर मध्ये “आकर्षक सुंदर आकाश कंदील तयार करण्याची रंगीबेरंगी स्पर्धा” घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये उपजत असणारे कौशल्य विकसित व्हावेत. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतून शाळेत आकाश कंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून तब्बल तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होत आकर्षक व पर्यावरण पुरक असे आकाश कंदील विद्यार्थ्यांनी तयार केले. या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थी अतिशय उत्साहात सहभागी झाले होते,…
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्रयत्नपूर्वक मिळवलेले यश निश्चितच अभिमानास्पद – राजेंद्र बांदल पिरांगुट I झुंज न्यूज : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल च्या पिरंगुट शाखेतील शिवम महाले याला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश संपादन करुन प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल बक्षीसरुपी गदा बहाल करण्यात आली. पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड आयोजित राष्ट्रीय उपकेसरी स्पर्धा ही पुणे व औंध येथे आयोजित करण्यात आली होती. शारीरिक तसेच मानसिक क्षमता कस लावून बघणारा एक क्रीडा प्रकार म्हणजे कुस्ती. लाल मातीशी आपले नाते आणखी दृढ करणारा हा खेळ ग्रामीण भागाशी आपली नाळ घट्ट जोडून असलेला दिसतो. आणि म्हणूनच मुळशी…
महाविकास आघाडीच्या नेत्यांचे महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पिंपरी I झुंज न्यूज : भोसरी येथील अर्बन स्ट्रीट च्या बांधकाम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एका 45 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला. सदरातील घटना हि जुलै महिन्यात घडली आहे. त्यामुळे करता पुरुष गेल्याने या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आली आहे. ठेकेदाराने या कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने व महापालिकेकडून पूर्णपणे ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट महानगरपालिकेमधील चौथ्या मजल्यावर प्रवेश करत आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आयुक्त शेखर सिंह कार्यालयात नसल्याने अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांना निवेदन…