पिंपरी I झुंज न्यूज : चिरतरुण ज्येष्ठ नागरिक संघाचा दुसरा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यासाठी पिंपरी चिंचवड जेष्ठ नागरिक महासंघाच्या प्रथम महिला अध्यक्ष वृषाली मरळ, सायकल मित्र श्री पाटील सर आणि पर्यावरण प्रेमी मित्र श्री कन्हेरे यांची प्रमुख उपस्थितीती होती.
श्री पाटील सरांनी त्यांच्या सायकल मित्र या उपाधी बद्धल विस्तृत माहिती दिली. तसेच श्री कन्हेरे सर यांनी त्याच्या पर्यावरण प्रेमाबद्दल माहिती दिली. त्याना पिंपरी चिंचवड महापालिका तर्फे स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली आहे. कार्यक्रमच्या अध्यक्ष म्हणून वृषाली मरळ यांनी विशेष मार्गदर्शन केले.
चिरतरुण जेष्ठ नागरिक संघ हि वूड्स व्हिल्ले 3 मधील सामाजिक, धार्मिक, आरोग्य या सर्व स्थरा बर काम करते. दररोज सकाळी 5 ते 8 या वेळेत योगासन वर्ग, सायंकाळी 7 ते 8 या वेळेत हरिपाठ पठण, तसेच संघांचे वाचनालय सुरु आहे. चिरतरुण संघातर्फे रामनवमी, आंबेडकर जयंती, गणपती, ईद्द सारखे विविध उत्सव साजरे केले जातात.
या कार्यक्रमासाठी मोशी परिसरातील विविध संघांचे अध्यक्ष हजर होते. पिंपरी चिंचवड महासंघाचे सर्व प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
प्रकाश काशिनाथ पाटील (वय 67 वर्षे) सायकल मित्र , हे पी एम पी एम एल चे सेवानिवृत्त मेकॅनिक स्पाईन सिटी चौकामध्ये राहतात. संपूर्ण भारतभर सायकलवर प्रवास करतात. प्रत्येक एकादशीला आळंदी पुणे पंढरपूर सायकलवर प्रवास करतात. झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा असे पर्यावरण संदेश प्रसारित करतात. 2022 – 2023 या दोन वर्षात पायी नर्मदा पर क्रमांक केली.
आपल्या संदेशांमध्ये श्री पाटील यांनी सायकल चालवण्याची फायदे सांगितले. जे सायकल चालवतात त्यांना शुगर बीपी गोळ्या घेण्याची आवश्यकता नसते. सायकल चालवा आरोग्य सांभाळा पर्यावरण वाचवा. जे सायकल चालवतात त्यांच्याकडे लोकांचा दृष्टिकोन कमीपणाचा असतो. परदेशामध्ये सायकल चालवणाऱ्या लोकांकडे आदराने पाहिले जाते. अनेक लोकांना सायकलच्या किमती 20 लाखापर्यंत असतात हे माहित नसते. रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला सायकल वर जाऊन पाच वाजता मुंबईला आदरांजली वाहिली.
यशवंत गंगाराम कन्हेरे (वय 67 वर्षे), महात्मा फुले नगर येथे राहतात. ओम शांती जेष्ठ नागरिक संघामध्ये अध्यक्ष आहेत. बजाज ऑटो कंपनीमध्ये नोकरी करत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे त्यांना ब्रँड अँबेसिडर स्वच्छता दूत नियुक्त केले आहे. स्वच्छता, समाजसेवा, पर्यावरण रक्षण, प्लास्टिक हटाव अशा अनेक मोहिमांमध्ये अग्रेसर आहेत. सार्वजनिक स्व्छतागृहांची सफाई स्वतः केली आहे.
चिरतरुण जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तरेश्वर तोडकर यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शंभर टक्के मतदान करण्याचे आव्हान केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष वृषाली मरळ, कार्याध्यक्ष बाबुराव फुले, अध्यक्ष माजी अध्यक्ष अरुण बागडे, सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी , कोषाध्यक्ष हेमंत जवळे , सह चिटणीस शांताराम सातव , पुरुषोत्तम हांडे, वसंतराव दंडवते, सुभाष कुलकर्णी आणि अनेक ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त सामाजिक संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी या दोन समाजसेवकांना समाजासमोर आणले. संस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आले. गायक श्री सुनील कवडे, दीपक होमकर, सुरेंद्र लोमटे, जयश्री भोसले सुनिता कवडे, ज्योती होमकर यांनी गाणी सादर केली.
शुभांगी लोमटे यांनी सूत्रसंचालन केले. सूत्रसंचालन दर्जेदार झाले. कार्यक्रम सफल सुंदर करण्यासाठी सुभाष सिंग पाटील, हरीश शेट्टी, दीपक होमकर, राजेश्वर गंगवार, सुरेंद्र लोमटे यांनी परिश्रम घेतले. भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
\