- मुखपृष्ठ
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राजकीय
- भटकंती
- देश – विदेश
- क्रीडा
- फिल्मी दुनिया
- आरोग्य
- गुन्हेगारी
- सांस्कृतिक
- लेखांकन
- काव्य लहरी
- व्हिडिओ
- Privacy policy
- DMCA
- DISCLAIMER
- ABOUT US
- CONTACT US
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: झुंज न्यूज
प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्याने, आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘झुंज न्यूज’ वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल करत आहोत. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय आपला प्रतिसाद आम्हाला नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे झुंज न्यूज परिवार आपले स्वागत करत आहे धन्यवाद. आपला अनिल वडघुले. संपर्क ‘झुंज न्यूज’ 9822083064 9673917313 9881444068 ईमेल Krantizunj@yahoo.in admin@zunjnews-in.preview-domain.com वेबसाईट : http://zunjnews-in.preview-domain.com
उरुळी कांचन : हवेली तालूका शिवसेनेचे संघटक स्वप्निल कूंजीर यांना उस्मानाबाद च्या लोहारा येथिल सम्राट ग्रूप संस्थेने कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . कूंजीर वाडी येथिल स्वप्निल कूंजीर हे गेली चार महिन्यापासून करोनाच्या पार्श्वभूमी वर योध्द्याच्या भूमिकेत कोरोना रूग्णांसाठी मदत करत आहे तर लॉकडाऊनमुळे आवक जावक ठप्प झाली उद्योग बंद झाल्याने हातावर पोट असणारे मजूरांची उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली. हे पाहून कूंजीर यांनी स्वखर्चाने हजारो लोकांना अन्न धान्य किटचे वाटप केले तर कोरोना ग्रस्त रूग्णांना आर्थिक मदत दवाखान्यात ने आन त्यांची स्व्याब तपासणी करने यामुळे स्वप्निल कूंजीर हे नाव हवेली तच नव्हे तर…
मुंबई : भारत आणि चीनमधील संघर्षानंतर भारत सरकारने चीनचे ५९ अॅप बंद केले. त्यानंतर आता आणखी ४७ अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अॅप क्लोनप्रमाणे काम करत होते. या बंदी घातलेल्या अॅपमध्ये पब्जी आणि अली एक्स्प्रेसचाही समावेश असल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने एक नवीन यादी तयार करण्यात येत आहे. या यादीत कोणते चिनी अॅप बंद करण्यात येतील याचा अभ्यास केला जात आहे. सध्या तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये अनेक गेमिंग अॅपचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच भारतात प्रसिद्ध झालेले काही चिनी गेम्सवरही बंदी घातली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी २०० पेक्षा अधिक अॅपची यादी तयार केली जात आहे. ज्यामध्ये…
सांगवी : पिंपळे गुरव येथे अत्यंत भयंकर व धक्कादायक अशी घटना घडली आहे. स्वतःची ४ वर्षाची मुलगी त्रास देते म्हणून एका महिलेनं आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली. या घटनेमुळं शहरात खळबळ उडाली आहे. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी त्रास देते या कारणावरून तिच्या आईनं पोटच्या चार वर्षांच्या मुलीचा भिंतीवर डोके आपटून आणि मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. सासूच्या दशक्रिया विधीसाठी कुटुंबीय बाहेर गेले असताना पिंपरी – चिंचवडमधील भालेकर नगर, पिंपळे गुरव परिसरात ही हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना सोमवारी (२७ जुलै) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. सविता दीपक काकडे (वय २२, रा. भालेकर नगर, पिंपळे गुरव, सांगवी) या निर्दयी…
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते जय पांडा यांनी बॉलीवुडमधील काही सेलिब्रिटीजचा पाकिस्तानी सैन्यदल आणि ‘आयएसआय’ शी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे माजी खासदार बैजयंत जय पांडा यांनी केला आहे. पांडा यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा बॉलीवूड आणि अंडरवर्लडमधील लागेबंध चर्चेत आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तान आर्मी आणि गुप्तचर यंत्रणेचा मोहरा आहे. या मोहऱ्याच्या माध्यमातून पाकिस्तानने भारताविरूद्ध कट रचला. आता दहशतवादी कारवाया, देशद्वेष पसरवण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गुंतवलेल्या पैशांचा वापर करून पाकिस्तान दहशतवादी कट रचण्यासाठी भारतीय चित्रपट उद्योगात आपले नेटवर्क वाढवत आहे. भाजप उपाध्यक्ष जय पांडा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्वीट केले आहे. तसेच…
हिंजवडी : ऐन पावसाळ्यात जनावरांचा चारा भिजू नये तसेच गळके छप्पर, घर, गोठा यावर अच्छादन करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ताडपत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले. आयटीनगरीपासुन जवळच असलेल्या नेरे येथील गावठाण, वाड्यावस्त्यांवरील गरजू शेतकरी, ग्रामस्थांना घरोघरी जाऊन ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष रामदास पायगुडे, सुभाष शेडगे यांच्या पुढाकाराने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयटीपार्क मधील यशराज पारखी सोशल रिस्पॉन्सिबिलीटी फाऊंडेशनच्या सहकार्याने नेरे परिसरातील पंचवीसहून अधिक ग्रामस्थांना बहूउपयोगी ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे यशराज पारखी, संतोष शिळीमकर, श्रीराम झाटे तसेच तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्याध्यक्ष रामदास पायगुडे, सुभाष शेडगे आणि सहकारी ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकरी ग्रामस्थांसाठी वर्षभर विविध कारणास्तव उपयोगात…
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रविवारी दीडच्या सुमारास रात्री भाजप नगरसेवकाने डॉक्टरांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या निंदनीय प्रकाराचा निषेध नोंदवत वायसीएममधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत संबंधित भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले आहे. “महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रविवारी दोन रुग्णांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. या कारणावरून त्यानंतर रात्री पिंपरीतील भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी रुग्णालयात येत धिंगाणा घातला तसेच डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा डॉक्टरांनी केला. कोविडसारख्या महामारीच्या काळात देखील आम्ही जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असताना शिवीगाळ, मारहाण सारखा प्रकार आमच्या बाबत घडतो हे…
नवी दिल्ली : मराठा आरक्षण प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. तीनच दिवसात ही सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्याचं सुप्रीम कोर्टात काय होणार या उत्तरासाठी आता फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. सुप्रीम कोर्टात १५ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत कोणताही अंतरिम आदेश किंवा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिली नाही. मात्र मराठा आरक्षणावरच्या अंतिम सुनावणीची तारीख निश्चित केली. २७ जुलैपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होईल आणि केवळ तीन दिवसांतच सुप्रीम कोर्ट या सुनावणीचा निपटारा करणार आहे. दीड दिवस याचिकाकर्त्यांना तर दीड दिवस दुसऱ्या बाजूला युक्तिवादासाठी मिळणार आहे. दिवसांठीच वेळ मिळतोय, यावर काही वकिलांनी आपला…
धुळे : येथील कवियित्री निसर्ग सखी मंगला मधुकर रोकडे यांची महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेश सल्लागार पदी निवड करण्यात आली. ऑल इंडिया महात्मा जोतिबा फुले युवा मंच द्वारा मंगला रोकडे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याचे वृत्त राष्ट्रीय महासचिव नरेंद्र बागूल, संस्थापक अध्यक्ष ईश्वर संतोष माळी तसेच प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण आनंदा महाजन यांनी आपल्या नियुक्ती पत्रकान्वये कळविले आहे. मंगला रोकडे यांच्या लेखनातील समाज प्रबोधनपर विचार लक्षात घेऊन मंच च्या कोअर कमिटी द्वारा ही निवड करण्यात आली. या यशाचा गौरव व्यक्त करण्यासाठी त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनांचे वर्षाव होत आहेत. रसिक वाचकांच्या सहमतीने निसर्ग सखी ही पदवी…
पुणे : रुमण्या ही एक कथा, पटकथा, किंवा चित्रपट नसून एक विचार आहे. आज समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्ती आपल्या अपयशा मुळे, व्यक्तिगत नुकसानी मुळे, समाजातील काही चुकीच्या घटकां मुळे आत्महत्या करतात. त्यात विदयार्थी पासून व्यावसायिक ते शेतकरी सगळेच घटक असतात. जीवनात प्रत्येकालाच यश, अपयश, नैराश्याला सामोरे जावे लागते. म्हणून आत्महत्त्या करणे हा काही पर्याय नाही. आहे त्या परिस्थितीत आपल्या परीवार, आपल्यावर प्रेम करणारी लोक आणि स्वतःसाठी जगणं आणि आलेल्या संकटावर मत करण हे शिकवत आयुष्यात जगण्याची एक नवीन उमेद आणणारा एक विचार म्हणजे रुमण्या. हा लघुपट जरी एकाच घटकावर बनलेला असेल तरी समाजातील सर्व घटकांनी या रुमण्या तुन एक विचार…
मुंबई : कोरोनामुळे देशांतील सर्व चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स बंद आहेत. बॉलिवूडचे सर्व मोठे चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत, ज्यामुळे देशातील बड्या थिएटर्स आणि मल्टिप्लेक्सचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ते कधी उघडणार याकडे सगळ्यांच लक्ष आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनलॉक ३ च्या टप्प्यात अटी-शर्तींसह थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स सुरु होण्याची शक्यता आहे. कारण माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं तसा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला आहे. राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ म्हणत सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. ३१ जुलै रोजी अनलॉक-२ संपणार आहे, त्यानंतर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रपटगृहांचे मालक ५० टक्के प्रेक्षकांसह सिनेमागृह…
मुंबई : महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ अर्थात प्रख्यात अभिनेते-सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाली आहे. मुंबईतील दादरमध्ये असलेले देशभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचा कारभार पुढील तीन वर्षेही बांदेकरच सांभाळतील. आदेश चंद्रकांत बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शुक्रवार २४ जुलै २०२० पासून पुढील तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले. आदेश बांदेकर यांच्याकडे शिवसेनेचे नेतेपदही आहे. श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. आदेश बांदेकर गेली १६ वर्ष ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. महाराष्ट्रातील घराघरात जाऊन गृहिणींचा सन्मान करण्याचे काम बांदेकर अव्याहतपणे करत आहेत. त्यामुळे…
प्रतिनिधी : शरद जठार न्हावरे : शिरुर तालुक्यातील महसूलच्या ताब्यातील वाळूच्या गाड्या चोरीला गेल्याचा प्रकार ताजा असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तलाठ्यानं पकडलेला वाळूचा ट्रक पोलीस चौकीला जात असताना गायब झाला आहे. या प्रकारानं तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिरुर तालुक्यातील इनामगाव भागात मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असून त्यासंदर्भात नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या, मात्र कारवाई होत नव्हती. बुधवारी एका तलाठ्यानं वाळूचा ट्रक पकडला, मात्र मांडवगण फराटा पोलीस चौकीकडे जात असताना मधेच कुणाचातरी फोन आल्यानं हा ट्रक सोडून देण्यात आल्याची माहिती आहे. शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांनी या प्रकाराची दखल घेतली आहे. यासंदर्भात तलाठी…