पुणे : रुमण्या ही एक कथा, पटकथा, किंवा चित्रपट नसून एक विचार आहे. आज समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्ती आपल्या अपयशा मुळे, व्यक्तिगत नुकसानी मुळे, समाजातील काही चुकीच्या घटकां मुळे आत्महत्या करतात. त्यात विदयार्थी पासून व्यावसायिक ते शेतकरी सगळेच घटक असतात.
जीवनात प्रत्येकालाच यश, अपयश, नैराश्याला सामोरे जावे लागते. म्हणून आत्महत्त्या करणे हा काही पर्याय नाही. आहे त्या परिस्थितीत आपल्या परीवार, आपल्यावर प्रेम करणारी लोक आणि स्वतःसाठी जगणं आणि आलेल्या संकटावर मत करण हे शिकवत आयुष्यात जगण्याची एक नवीन उमेद आणणारा एक विचार म्हणजे रुमण्या.
हा लघुपट जरी एकाच घटकावर बनलेला असेल तरी समाजातील सर्व घटकांनी या रुमण्या तुन एक विचार घेणं खूप गरजेचं आहे. अस या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सोमनाथ तांबे यांनी दाखवून दिले आहे.
येणाऱ्या काळात रुमण्या हा समाजात एक नवीन विचार आणेल आणि नैराश्यात जगणाऱ्या लोकांमध्ये जगण्याची एक नवीन उमेद जागी करेल हे नक्की. रुमण्या या लघुपटाची कथा पटकथा संवाद दिग्दर्शन सोमनाथ तांबे यांचे आहे. तर यामध्ये अश्विन तांबे याने मुख्य भूमिका साकारली आहे, सहकलाकार म्हणून रुपेश शेलार, समृध्दी दैने, समृध्दी झगडे, गणेश फरताळे उत्तम भूमिका वठवली आहे. याचे निर्माते लक्ष्मण गव्हाणे असून चित्रीकरण भास्कर ठोकळ यांनी केले आहे.