मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते जय पांडा यांनी बॉलीवुडमधील काही सेलिब्रिटीजचा पाकिस्तानी सैन्यदल आणि ‘आयएसआय’ शी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे माजी खासदार बैजयंत जय पांडा यांनी केला आहे. पांडा यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा बॉलीवूड आणि अंडरवर्लडमधील लागेबंध चर्चेत आले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तान आर्मी आणि गुप्तचर यंत्रणेचा मोहरा आहे. या मोहऱ्याच्या माध्यमातून पाकिस्तानने भारताविरूद्ध कट रचला. आता दहशतवादी कारवाया, देशद्वेष पसरवण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गुंतवलेल्या पैशांचा वापर करून पाकिस्तान दहशतवादी कट रचण्यासाठी भारतीय चित्रपट उद्योगात आपले नेटवर्क वाढवत आहे. भाजप उपाध्यक्ष जय पांडा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्वीट केले आहे. तसेच बॉलिवूडमधील व्यक्तींचे पाकिस्तान आणि आयएसआयशी संबंध असल्याचे काही पुरावे समोर आल्याचं देखील म्हटलं आहे. बैजयंत जय पांडा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की ‘बॉलिवूडमधील काही व्यक्तींचा काश्मीरमध्ये हिंसा पसरवणाऱ्या तसेच अनिवासी भारतीयांसोबत संबंध आहेत. हे संबंध दाखवणारी काही कागदपत्रं समोर आली आहेत. काश्मीरमध्ये हिंसा पसरवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तान आणि आयएसआयशी असलेले संबंध यामधून उघड होत आहेत’
पांडा यांनी नाव न घेता परदेशातल्या एका मोठ्या रिअल एस्टेट बिजनसमनकडे इशारा केला आहे. ही व्यक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या अत्यंत जवळची आहे. आता याच व्यक्तीचे बॉलीवुडमधील अनेक सुपरस्टार सोबत फोटो आणि व्हीडियो आहेत तसेच याच व्यक्तीचे पाकिस्तानी लष्कराच्या मोठ्या अधिकारी आणि राजकरण्यांशी संबंध असल्याची ही माहिती आहे.
पांडाच्या आरोपांबरोबर अमेरिकेत बॉलिवूडचे इव्हेंट आयोजित करून पाकिस्तानच्या आयएसआयला पैसे पुरविणाऱ्या रेहाण सिद्दीकीवर अखेर बंदी घालण्यात आली आहे. तब्बल तीन वर्षानंतर केंद्र सरकारने ही बंदी घातली असून सिद्दीकीच्या इव्हेंटला हजेरी लावणाऱ्या सर्व बॉलिवूड कलाकारांची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
अमेरिकेत बॉलिवूड इव्हेंट आयोजित करणारा पाकिस्तानी रेहान सिद्दीकी हा भारतविरोधी कारवायांसाठी आयएसआय या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करत असल्याची माहिती राहुल शेवाळे यांच्या तक्रारीत देण्यात आली होती. तसेच सिद्दीकीच्या रेडिओ चॅनल, सोशल मीडिया या मार्फत होणारा भारतविरोधी प्रचार याचीही माहिती देण्यात आली होती. रेहान सिद्दीकीसह राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांच्यावर बंदी घालून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार शेवाळे यांनी केली होती. वॉशिंग्टन मधील भारतीय दुतावासाने भारतीय कलाकारांना, रेहान सिद्दीकी, राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांच्या कार्यक्रमांमध्ये सामील न होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
“पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय दाउद त्या माध्यमातून त्यांची नावे पडद्यावर चित्रपट फायनान्स करतात. कॉल करुन धमकावतात, चित्रपटाचे परदेशी हक्क जबरद्स्तीन घेतले जातात, बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांचे प्रिंट बनवून कोट्यावधींची कमाई केली जाते आणि या पैशाचा उपयोग भारतविरूद्ध आणि दहशतवादी कारवायांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी केला जातो. या कामासाठीच आयएसआयने डी कंपनीच्या मदतीने दुबई इथे एक कंपनी उभी केली आहे. जिथून पैश्यांचा संपूर्ण नेटवर्क चालवलं जातं. अंडरवर्ल्ड सुद्धा हनीट्रॅप, भीती आणि पैसा बॉलीवुडमध्ये लावला जातो. बॉलीवुड सेलिब्रिटीसाठी सिनेमा बनवतात. सिनेमाचं प्रमोशन केलं जातं आणि या सेलिब्रिटींना जवळ करून त्यांचा वापर स्वता: साठी अंडरवर्ल्डमध्ये वापर करण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातात.”