आळंदी I झुंज न्यूज : मनसेला आज १५ वर्षे पूर्ण झाली आणि १६ व्या वर्षात पदार्पण केले आहे, हे १६ वे वर्ष मनसे साठी मोक्याचे आणि विरोधकांसाठी धोक्याचे आहे असेच म्हणावे लागेल, कारण ज्या आक्रमक पणे मनसे आज मार्गक्रमण करत आहे ते पाहता येणाऱ्या काळात मनसे उंच भरारी घेणार हे निश्चित…असा खोचक टोला रस्ते आस्थपणा तालुका अध्यक्ष प्रसाद बोराटे यांनी मनसे वर्धापनदिनी विरोधकांना दिला आहे.
मराठी माणसाच्या हितासाठी, भाषेसाठी, संस्कृती साठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वा वर्धापनदिन आळंदी शहर मनसेतर्फे विजया एकादशीनिमित्त फळे व फराळ वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अनिल शिदोरे , हेमंत संभुस, रस्ते आस्थपणा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष योगेश परुळेकर, कार्याध्यक्ष योगेश चिले, पुणे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे, रस्ते आस्थपणा जिल्हा अध्यक्ष सचिन भांडवलकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी, तालुका अध्यक्ष संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रस्ते आस्थपणा तालुका अध्यक्ष प्रसाद बोराटे, मा. आळंदी शहर अध्यक्ष निलेश बाप्पू घुंडरे पा, मा. शहराध्यक्ष रस्ते आस्थापना तुषार नेटके, माऊली गुंडाळ, कैलास बोरगावकर, ह.भ.प विठ्ठल महाराज कापसे व संस्थेतील वारकरी विध्यार्थी तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात प्रत्येक जण घरात बसलेला असताना मनसेचा महाराष्ट्र सैनिक हा स्वतःचा जीव धोक्यात घालून सामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरून मदत करत होता, या काळात अनेक महाराष्ट्र सैनिकांना देखील कोरोनाची लागण झाली तरी देखील हार न मानता पुन्हा मैदानात उतरून शेवट पर्यंत नागरिकांसाठी लढत राहिला आहे.
दरवर्षी वर्धापनदिन सोहळा मुंबईतील सभागृहात आयोजित केला जातो, पण या वर्षी देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला. मनसेने आज पर्यंत नेहमीच सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घेऊन त्यावर वेळोवेळी नगरपरीषदेला निवेदने देऊन ते प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले आहेत व करत आहेत. असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.