पुरंदर I झुंज न्यूज : मराठा सेवा संघ, प्रणित जिजाऊ ब्रिगेड पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवगर्जना व जिजाऊ वंदना बोलून करण्यात आली.
“शिवजयंती निमित्त सिंगापूर मधील सरकारी हॉस्पीटल मधील डॉक्टर्स यांना कोव्हीड योद्धा म्हणून सन्मान चिन्ह आणि जिजाऊंचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा शिवमती दुर्गा उरसळ, कार्याध्यक्ष (ग्रामीण) भाग्यश्री यादव , सिंगापूर गावचे सरपंच शिवश्री दशरथ लवांडे, ग्रामसेवक शिवमती आटोळे, सदस्य शिवश्री अक्षय उरसळ, संतोष लवांडे, आरोग्य सेवक शिवश्री डॉ. विरंध धर्माधिकारी आणि आशा स्वयंसेविका शिवमती रुपाली झेंडे आणि गावातील शिवभक्त उपस्थित होते.