(प्रतिनिधी I मनोज सोनवणे )
पिंपळे गुरव I झुंज न्यूज : सालाबादाप्रमाणे पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील बंगाली समाजाच्या नागरिकांकडून नवी सांगवीतील मल्हार गार्डन येथे सरस्वती पूजा व होम हवनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बंगाली समाजाकडून सरस्वती मातेचे पूजन करणे व प्रसाद घेणे हे खूप महत्त्वाचे आहे, आणि या पुजनाला खूप महत्व असते, असे वेद शास्त्रात सांगतात.
अशा या धार्मिक कार्यक्रमावेळी पिंपरी-चिंचवडच्या नगरसेविका उषाताई मुंढे यांच्या हस्ते देवीचे पूजन करण्यात आले. या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे, बेचू पत्रा, सोमनाथ माल, मिठू माल, श्रावंती माल, शिप्रा पत्र, दुर्गा पत्र, झुमा माल, कृष्णा बाग, शिप्रा दास, सोनाली संत्रा, सोमपा माझी, ममता मंडल आणि बंगाली समाजाचे नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
“नगरसेविका उषा मुंढे यांनी मनोगत व्यक्त केले की, या ठिकाणी सरस्वती मातेचे पूजन करताना मला खूप आनंद होत आहे, सरस्वती ही साक्षात ज्ञान देवता आहे, सरस्वती ही विद्या, बुद्धि, ज्ञान आणि वाणीची प्रमुख देवता आहे. शास्त्र-ज्ञान देणारी आहे. भगवती शारदाचे मूळ स्थान शशांकसदन म्हणजेच अमृतमयी प्रकाशपुंज आहे. जिथुन शब्द रूपात ज्ञानमृत प्रवाहित होत असतो. देवीचे दिव्य आहे, सृष्टी निर्माण वेळी आद्यशक्तीने देवाच्या इच्छेनुसार स्वत: ला पाच भागात विभागले. भगवान श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या भागातून ती राधा, पात्रा, सावित्री, दुर्गा आणि सरस्वती म्हणून दिसली. त्यावेळी कृष्णाच्या गळ्यातून उद्भवलेल्या देवीचे नाव सरस्वती झाले. सरस्वती देवीचे स्मरण प्रत्येक व्यक्ती काहीना काही शिकताना अगोदर ज्ञान प्राप्त करत असतो त्यामुळे सरस्वती देवीचे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे.