हिंगणघाट I झुंज न्यूज : हिंगणघाट येथील रा. सु. बिडकर महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. त्या प्रसंगी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. बी. एम. राजूरकर यांनी छत्रपति शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकतानां आजच्या पीढीला महाराजांचे विचारच तारु शकतात असे प्रतिपादन केले. महाराज पर्यावरणाबाबत कीती जागरुक होते हे देखिल त्यानी त्यांच्या भाषणात विषद केले.
महाविद्यालयातिल कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. आंबटकर, मुख्य अतिथि म्हणून महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर, हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विकास बेले, प्रास्ताविक डॉ. गजानन ठक, तर आभार डॉ. शरद विहिरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात कोरोना पाश्ववभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्स राखत व मास्कचा वापर करत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.