बारामती I झुंज न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नसून त्यांचे विचार डोक्यात घेऊन रोजच्या जीवनात आचरणात आणण्याचा विषय आहे. ढाल-तलवारी पलीकडचे शिवराय शिवप्रेमींना समजावे या उद्देशाने घाडगेवाडी (ता.बारामती) येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व शिवजयंती उत्सव समिती तर्फे शिवजयंती नाचून साजरी न करता वाचून साजरी करण्यात आली.
यावेळी राजमाता जिजाऊ चौकात उपस्थितांच्या हस्ते शिवपुजन करून उपस्थित शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज व इतर बहुजन महापुरूषांच्या चरित्राच्या पुस्तकांच्या प्रति वितरित करण्यात आल्या. तसेच शिवजयंती निमित्त रविवारी शाहिर राजेंद्र कांबळे-खुडुसकर यांचा शाहिरीचा कार्यक्रम झाला.
या प्रसंगी संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे, तालुका संघटक विशाल भगत, घाडगेवाडी शाखा उपाध्यक्ष कार्तिक काकडे, प्रशांत काकडे, रणजित तुपे, सोमनाथ जगदाळे, अमोल साबळे, सुर्यकांत काकडे, लालासो तुपे, अंकुश पवार, चंद्रकांत तुपे, राजेंद्र बळीप, सोमनाथ चव्हाण, शरद घोरपडे, हिंदुराव घाडगे, गणेश कळसकर, प्रकाश मगर, सुमित भोसले, राहुल काकडे, प्रविण तुपे, सोमनाथ कळसकर, बाळासो बाबर, सोमनाथ चव्हाण आदी घाडगेवाडी गावातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.