पुणे I झुंज न्यूज : ‘महा रोड सेफ्टी’ महिना २०२१ च्या ‘रस्ता सुरक्षा जिवन रक्षा’ या विषयावर आधारित देव फिल्म प्रोडक्शन निर्मित व के.डी फिल्म्स प्रस्तुत ‘गोल्डन आवर क्षण महत्वाचं..’ या लघुचित्रपटच्या चित्रीकरणाचा नुकताच मुहूर्त झाला.
DCP वाहतुक राहुल श्रीरामे, dy. RTO संजय ससाणे, A RTO पवन नव्हाडे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले, तसेच महेश मोटकर यांच्या मार्गदर्शना खाली या लघु चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या लघुचित्रपटाचे दिग्दर्शक कुणाल देशमुख, निर्माता स्वानंद देव, लेखक कल्पेश जगताप, कॅमेरामन अमोल यादव असून चित्रीकरण हडपसर व परिसरात पार पडले.
“श्री. मोळे यांनी वाहतूक जनजागृती विषयी मार्गदर्शन करत क्लेप मारून गणपती बाप्पा म्हणत चित्रीकरणाचा मुहूर्त पार पाडला. तसेच सर्व टीमला शुभेच्छा देत असेच जनजागृतीचे कार्य चालू ठेवा असे सांगितले.
यावेळी येरवडा वाहतूक पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे, डॉ. शांतनू जगदाळे, डॉ. अबाने, चित्रपटातील प्रमुख बालकलाकार अर्णव कालकुंड्री व तुषार देव, अभिनेत्री शीतल पाटील, ओंकार साखरे, सुधीर भालेराव, रोहित ओव्हाळ, पंकज किरदत्त, सागर भागवत, नितीन शेटे, श्रीकृष्ण भिंगारे, संभाजी गोळे, वीनील धोत्रे, सौरभ ढवळे, आदि कलाकार, डॉक्टर व वाहतूक पोलीस उपस्थित होते.