(प्रतिनिधी I मनोज सोनवणे)
पिंपळे गुरव I झुंज न्यूज : पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात धावणाऱ्या पीएमपीएल बस मधील कोरोना पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या सूचना व लिहिण्यात व छापील नियम फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहेत. सांगवी परिसरातून विविध ठिकाणी पीएमपीएल बस प्रवाशांच्या सेवेसाठी धावत असतात. या बसमध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी सोशल डिस्टन्सच्या सूचना लिहलेल्या असतानाही प्रवाशी सर्रास या सूचनांकडे दुर्लक्ष करत असून, या सूचनांना केराची टोपली दाखवणाऱ्या प्रवाशांकडे प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष झाले आहे.
कोरोना पूर्णपणे नाहीसा झालेला नसून नवीन रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण कायम असून गेल्या काही महिन्यात जरी रुग्णांचे प्रमाण कमी झाले असले तरी रुग्ण नव्याने सापडत आहेत. सार्वजनिक प्रवासी वाहतूक व सामान्य नागरिकांचे प्रवासाचे हक्काचे वाहन म्हणून पीएमपीएल बसकडे बघितले जाते. यात हजारो प्रवासी दररोज प्रवास करत असतात. परंतु कोणता प्रवासी कसा आहे व त्याचे आरोग्य व्यवस्थित आहे की नाही हे कोणालाही माहिती नसल्याने प्रवास करतांना काळजी घेणे गरजेचे आहे.
बसमध्ये एका शेजारी एक असे प्रवासी बसून प्रवास करताना तर काही मास्क न वापरता दिसून आले. बसमध्ये सॅनिटायझर तसेच इतर व्यवस्था नसल्याचे व त्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. तरी महानगरपालिका प्रशासनाने आरोग्यासाठी सूचना व नियम फक्त कागदावरच नाही तर प्रत्यक्ष कृती मधून अवलंबण्यासठी व नागरिकांना मार्गदर्शक सूचना देण्याची गरज असल्याचे व त्या संदर्भात मास्क व इतर नियम न पाळणाऱ्यावर कारवाई करावी अशी सूज्ञ नागरिकांनी मागणी केली आहे.