पुणे I झुंज न्यूज : १४ जानेवारी ते २८ जानेवारी होत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा याचे औचित्य साधून प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांनी ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन केले. या कविसंमेलनात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप आवटे,युवा साहित्यिक सचिन बेंडभर,सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, सुप्रसिद्ध कवी संजय गुरव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विषय सहाय्यक वेच्या गावित यांनी केले.तर प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई येथील उपसंचालक संघमित्रा त्रिभुवन, वरिष्ठ अधिव्याख्याता प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई येथील मनिषा पवार यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा याचे औचित्य साधून प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांनी ऑनलाईन कविसंमेलनात मराठी विषय सहाय्यक वेच्या गावित यांनी प्रथम मान्यवरांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई येथील उपसंचालक संघमित्रा त्रिभुवन, वरिष्ठ अधिव्याख्याता प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई येथील मनिषा पवार यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. मृणाल खैरमोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रदीप आवटे यांनी साहित्य विषयक मार्गदर्शन करत मराठी भाषेचे महत्व पटवून दिले. त्याचप्रमाणे मराठी भाषेची अस्मिता जपत असताना इतर भाषांचा आदर करावा आणि त्या आत्मसात कराव्यात असा संदेश त्यांनी यावेळी दिला. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात वर्ष कसा येईल नव या कवितेने त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. मनाला या कवितेने त्यांनी सर्वांना भाऊक केले.
युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांनी साहित्य निर्मिती कशी होते हे सांगून पाळणाघर या कवितेने सुरुवात केली.
“आई तुझे कमवते हात
कणखर तरीही थरथरतात
डोळे भरून का येतात
सोडताना मला पाळणाघरात”
या त्यांच्या ओळींनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. त्यानंतर येते जगाया उभारी, कसे जगावे विधात्या, कळो निसर्ग मानवा या शेतीविषयक व निसर्गविषयक कवितांनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली.
प्रसिद्ध बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी मराठी भाषेचे महत्व पटवून देत सविता पाटेकर रोज गैरहजर या कवितेने सुरुवात करत कार्यक्रमाला एक वेगळीच उंची आणली.यावेळी त्यांनी कहाणी एका कवितेची, आभाळाचा फळा या व अशा अनेक कवितांचे सादरीकरण केले व आपला साहित्यिक प्रवास कसा झाला याबद्दल रसिक श्रोत्यांना माहिती दिली.
संजय गुरव यांनी कोकणात काय असा,सकाळच्या पारी, खरं सांगतो पांडुरंगा या कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. तर हर्षा चव्हाण यांनी क्षण,न्यूटनचा पुनर्जन्म,कृतज्ञता शिल्लक असेल तर, रेनापुरे यांनी मुंबापुरी,अर्चना जोशी यांनी मी गेल्यावर,तर नम्रता परब यांनी महापुर या नाटकाचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप आवटे, युवा साहित्यिक सचिन बेंडभर, सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, सुप्रसिद्ध कवी संजय गुरव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई येथील उपसंचालक संघमित्रा त्रिभुवन, वरिष्ठ अधिव्याख्याता प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई येथील मनिषा पवार, बृहन्मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर साहेब, विभागीय उपसंचालक संदीप सांगळे साहेब, मराठी विषय सहाय्यक वेच्या गावित, मृणाल खैरमोडे, अर्चना जोशी,हर्षा चव्हाण, शिवाजी रेणापूरे, नम्रता परब आदी मान्यवर उपस्थित होते.