पुणे I झुंज न्यूज : अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची आर्थिक लूट होण्याचे व वाढीव बिल आकारण्याचे प्रकार वाढत आहेत. अशाच सह्याद्री हॉस्पिटलमधील एका मयत रुग्णांच्या नातेवाईकांना १६०००० रुपयांचे ( एक लाख साठ हजार) बिल माफ करून प्रहार जनशक्ती पक्ष पुणे शहर युवा अध्यक्ष रोशन गावंडे यांनी एक प्रहार रुग्ण सेवक या नात्याने रुग्णाच्या नातेवाईकांना मोठा दिलासा दिला आहे.
पुणे शहर युवा अध्यक्ष रोशन गावंडे यांना अचानक डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटलमधील एका पेशंटच्या नातेवाईकांचा कॉल आला होता. यावेळी बोलणे झाले असता परिस्थिती कळली कि, पेशंट किसन आंग्रे (वय वर्षे ९०) हे डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे दोन दिवसांपासून उपचारासाठी ऍडमिट होते व दिनांक १३/ ०९ / २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता ते मयत झाले असून रुग्णालयाकडून दोन दिवसाचे बिल तब्बल २३०००० रुपये ( दोन लाख तीस हजार ) इतके आकारले होते व पैसे भरा यासाठी खूप त्रास देत होते.
“पेशंटच्या नातेवाईकांची इतके बिल भरण्याची परिस्थिती नसल्याने त्यांनी शहर युवा अध्यक्ष रोशन गावंडे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. अशा परिस्थितीत गावंडे यांनी कसलीही वेळ वाया जाऊन न देता एक प्रहार रुग्ण सेवक या नात्याने रुग्णालयात दाखल झाले. तेथील परिस्थिती खूप गंभीर निर्माण झालेली होती हे पाहता थेट संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून १६०००० रुपयांचे ( एक लाख साठ हजार) बिल माफ करून घेतले.”
त्यानंतर रात्री ३:३० च्या सुमारास मयत रुग्णाची बॉडी कैलास समशान भूमी येथे नेऊन विधी पूर्ण केला व रात्री ४:३० वाजता रुग्णाच्या नातेवाईकांना घरी सोडले. त्यामुळे आजही समाजात माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन दिसून आले.