या अभियानांतर्गत महिन्याभरात ३५० हुन अधिक जनांचे प्लाझ्मा दान
पिंपरी : थेरगाव सोशल फाऊंडेशनने प्लाझ्मा थेरीपीची पूर्ण माहिती घेऊन शहरात प्लाझ्मा दान कारण्यातबाबत जनजागृती करीत आहेत. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी १० डोनरकडुन प्लाझ्मा दान करुन घेण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत महिन्याभरात या अभियानांतर्गत ३५० हुन अधिक जनांचे प्लाझ्मा दान पूर्ण झाले आहे.
२८ दिवस पुर्ण झालेल्या कोरोनाबाधितांना थेरगाव सोशल फाऊंडेशनकडून प्लाझ्मा दान करण्यासाठी समुपदेशन करण्याचे कार्य केले जात आहे. या उपक्रमासाठी वायसीएम रक्तपेढी व भोसरीतील संजीवनी रक्तपेढी यांचे मौलाचे सहकार्य लाभत आहे. हा उपक्रम गेल्या १ महिन्यांपासून फाऊंडेशनचे अनिकेत प्रभू , निलेश पिंगळे, राहुल सरवदे, अनिल घोडेकर यांच्या पुढाकाराने यशस्वीरीत्या सुरु आहे.
“राज्य सरकारने प्लाझ्मा थेरीपीला मान्यता दिल्यानंतर सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहरात थेरगाव सोशल फाऊंडेशनने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता. कोरोनाबाधितांनी प्लाझ्मा दान करण्यास पुढे यावे आणि काही अडचण असल्यास संपर्क साधावा असे आवाहन फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे.”