माॅडर्न महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पुणे I झुंज न्यूज : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवातीला डाॅ.रवींद्र क्षीरसागर व प्रा महेंद्र वाघमारे यांनी बुध्दवंदना सादर केली.
या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ संजय खरात म्हणाले,” डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अभ्यासू शिक्षक, व्यासंगी नेता, वास्तुशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, संगीताचे जाणकार, समाजशास्त्रज्ञ, संत साहित्याचे गाढे आभ्यासक आणि घटनेचे शिल्पकार होते. अशा व्यक्तिमत्वाला जाणून घेणे हि एक जबाबदारी आहे.
तानाजी खरावतेकर यांनी १९४६ साली डाॅ आंबेडकरांवर ग्रंथ लिहिला व कराची येथून प्रसिध्द केला. रवींद्रनाथ टागोरांनी डाॅ आंबेडकरांवर ‘बुद्धाचे पुनरागमन’ हि कविता केली हे खुप खास आहे. वयाच्या २२ वर्षी ग्रंथ लिहणारी हि व्यक्ती सर्वांनी समजून घेतली पाहिजे. राष्ट्रपुरुषांच्या विचारांचे पुर्नवालोकन केले पाहिजे कारण या महापुरुषांची धडपड ही समाजासाठी असते. कर्तृत्व ,दातृत्व स्वत: निर्माण करा असा सल्ला जो डाॅ आंबेडकरांनी दिला आहे तो आमलात आणा. आजच्या राज्यकर्त्यांनी घटनेचा निट वापर केला पाहिजे. युवकांनी जयंतीला नाचू नका तर वाचा.” असे मार्गदर्शन उपस्थितांनी केले.
या कार्यक्रमाला उपप्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा किशोर मोरे यांनी केले.