- मुखपृष्ठ
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राजकीय
- भटकंती
- देश – विदेश
- क्रीडा
- फिल्मी दुनिया
- आरोग्य
- गुन्हेगारी
- सांस्कृतिक
- लेखांकन
- काव्य लहरी
- व्हिडिओ
- Privacy policy
- DMCA
- DISCLAIMER
- ABOUT US
- CONTACT US
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: झुंज न्यूज
प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्याने, आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘झुंज न्यूज’ वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल करत आहोत. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय आपला प्रतिसाद आम्हाला नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे झुंज न्यूज परिवार आपले स्वागत करत आहे धन्यवाद. आपला अनिल वडघुले. संपर्क ‘झुंज न्यूज’ 9822083064 9673917313 9881444068 ईमेल Krantizunj@yahoo.in admin@zunjnews-in.preview-domain.com वेबसाईट : http://zunjnews-in.preview-domain.com
भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांना पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीच्या हद्दीत कोणत्याही शाळेत जाण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत सवलतीचा पास देण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली होती. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने आपल्या हद्दीतील पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना बसपासमध्ये ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांनी बसपाससाठी केवळ २५ टक्के रक्कम भरावयाची आहे. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलमार्फत सवलतीचा प्रवासी पास दिला जातो. त्याचा या शहरातील शेकडो…
सरपंच कमल शिवले यांची चौकशीची मागणी शिरूर I झुंज न्यूज : शिरूर तालुक्यातील पारोडी ग्रामपंचायतीत ठरविण्यात आलेल्या वेळेच्या आधीच ध्वजारोहण करण्यात आल्याने सरपंच कमल शिवले यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. निवेदनात म्हणले आहे कि, ग्रामपंचाय पारोडीयेथील ग्रामपंचायतीचे नमूद वेळेपूर्वी १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या नियोजनाप्रमाणे सकाळी ८ वा. १५ मिनिटांनी ध्वजारोहण करण्याचे ठरले होते. मात्र हे ध्वजारोहण ठरलेल्या वेळे आधीच ७ वा ५५ मिनिटांनी ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्यात आले आहे. हा ध्वजारोहण कार्यक्रम ठरलेल्या वेळेपूर्वी कसा काय झाला आणि कुणाच्या आदेशाने झाला याची खातर जमा करावी अशी मागणी…
पुणे I झुंज न्यूज : ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल व रिपब्लिकन शक्ती च्या वतीने स्नेहल परिवार या वस्तीगृहात कार्यक्रमाचा खर्च टाळून वस्तीगृहातील मुलांना फळे बिस्किटे व अन्नदान करून जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी वस्तीगृहाचे अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय इंगळे यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले व आदिवासी पारधी समाज सुरक्षा दलाचे अध्यक्ष माऊली भोसले यांनी आदिवासी क्रांतिकारी समशेर सिंग भोसले (पारधी) यांच्या कार्याची माहिती मुलांना व उपस्थितांना दिली. सारिका माय इंगळे यांनी आभार मानले यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अनिल पवार, सतीश भोसले, विशाल भोसले, सर्जन पवार, दिपाली भोसले, श्रीमंत भोसले, शंभू कांबळे, आदित्य काळे…
माध्यम स्वातंत्र्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न पत्रकार खपवून घेणार नाहीत – एस. एम. देशमुख मुंबई I झुंज न्यूज : वादग्रस्त ठरलेले “ब्रॉडकास्ट विधेयक” अखेर केंद्र सरकारने आज मागे घेतले.. सरकारचे हे विधेयक डिजिटल ब्रॉडकास्टर आणि इंडिव्हिज्युअल कॉन्टेट क्रिएटर्सचा आवाज बंद करणार होते. विधेयकातील अनेक तरतुदी डिजिटल मिडियाचा गळा घोटणाऱ्या असल्याने देशभरातील पत्रकारांनी या विधेयकास तीव्र विरोध केला होता. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेनं देखील विधेयकास विरोध करीत आंदोलनाचा इशारा दिला होता.. तसे पत्र माहिती मंत्र्यांना पाठविले होते.. अखेर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वांशी चर्चा करून या विधेयकाचा नवा मसुदा तयार…
विविध उपक्रमांनी अरुण पवार यांचा वाढदिवस साजरा चिंचवड I झुंज न्यूज : गेल्या १२ वर्षात शासन दरबारी खूप प्रयत्न करूनही पिंपरी – चिंचवड शहरात मराठवाडा भवनसाठी जागा मिळू शकली नाही. मात्र, पिंपरी – चिंचवड शहरात मराठवाडा भवन करायचेच, हा निर्धार मनात ठेवून मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांनी स्वतःची पिंपळे गुरव येथील १० गुंठे जागा मराठवाडा भवन बांधण्यासाठी दान केली. आज पिंपळे गुरवसारख्या ठिकाणी तब्बल ४० लाख रुपये प्रति गुंठा जागा असतानाही आपल्या फायद्याचा विचार न करता १० गुंठे जागा दान केल्याने शहरातील मराठवाडा वासियांनी अरुण पवार यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात वृक्षमित्र अरुण पवार…
बावधन I झुंज न्यूज : पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथे गुरवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वज फडकावून व ध्वजगीत, राष्ट्रीय गायनाने तिरंग्याला मानवंदना देऊन करण्यात आली. इयत्ता ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांनी सुमधुर स्वरात देशभक्ती पर गीत सादर केले. मराठी, संस्कृत, इंग्रजी व हिंदी अशा विविध भाषांमधून विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांचे मनोगत व्यक्त केले. इयत्ता ४वी व ५वी च्या विद्यार्थ्यांनी मनोऱ्याचे नयनरम्य प्रात्यक्षिक सादर करून कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. याप्रमाणेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे, महेश लोहार यांनी रिसर्च स्कॉलर…
पुणे I झुंज न्यूज : गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या विद्यार्थी तसेच शिक्षकांनी दिव्यांगासाठी काम करणार्या बाल कल्याण संस्थेला भेट देवून दिव्यांगाचे प्रश्न समजून घेतले. पुण्यातील बाल कल्याण संस्था 1983 पासून दिव्यांगासाठी मनोरंजन व संस्कृतिक केंद्र चालवत आहे. रक्षाबंधनाचे औचित्य साधत विभागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिव्यांगाच्या प्रश्नांची जाणीव व्हावी या हेतूनं संस्थेला भेट दिली. या कार्यक्रमाचे समन्वयन इतिहास विभागातील प्राध्यापक डॉ. गुंजन गरुड आणि डॉ.श्वेता सावले यांनी केले. सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थी-शिक्षकांनी संस्थेमधील शिबिरार्थी विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधांनाचा सोहळा साजरा केला. इतिहास विभागातील विद्यार्थ्यानी संस्थेच्या अधिकार्यांकडून शिबिरार्थीसाठी चालवले जाणार्या विविध उपक्रमाची माहिती करून घेतली. या उपक्रमांचा भाग म्हणून इतिहासाच्या विद्यार्थ्यानीही दिव्यांगासोबत…
शिरूर I झुंज न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र भगवा सप्ताह उपक्रम कार्यक्रम साजरा होत असताना शिरुर तालुका शिवसेनेच्या वतिने चिंचणी, निमोणे, शिंदोडी या ठिकाणी शाखा स्वागत फलक उपक्रम पार पडला. याप्रसंगी उप तालुकाप्रमुख अनिलबापू पवार, शेतकरी सेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील, तालुका सल्लागार संतोष काळे, महिला आघाडी सुमन वाळुंज, ग्राहक संरक्षण कैलास पवार, युवासेना विजय पवार, निमोणे शाखाप्रमुख आबासाहेब काळे, चिंचणी शाखाप्रमुख सुदाम जेऊघाले, शिंदोडी शाखाप्रमुख दौलत ओव्हाळ पाटील, चेअरमन प्रविण धावडे, उपसरपंच अनिल पवार, राजेंद्र पवार, प्रकाशआण्णा पवार, व्हा.चेअरमन साहेबराव कारंडे, श्रीरंग ओव्हाळ पाटील, दौलत पवार, संदीप रोकडे, माऊली नागवडे, दादा बारवकर, माऊली पवार, अर्जुन…
पिंपरी I झुंज न्यूज : भारताच्या स्वातंत्राच्या इतिहासात ९ ऑगस्ट या दिनास असाधारण महत्व असल्याने सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे.शहीद भगतसिंग व सुखदेव यांचे स्मारक दापोडी या ठिकाणी आहे. यानिमित्ताने येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभाग शहराध्यक्ष भाई विशाल जाधव, ख्रिश्चन सेना अध्यक्ष शौल कांबळे, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष अजय पिल्ले, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा सायली किरण नढे, महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आयचे उपाध्यक्ष ॲड उमेश खंदारे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, झेवियर अँथनी, रोहित शेळके, किरण नढे, जय ठोंबरे, सोनाली…
– शिवांजली सखी मंचच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद – भोसरी विधानसभा मतदार संघात तब्बल २५ ठिकाणी कार्यक्रम पिंपरी I झुंज न्यूज : महिलांसाठी उत्साहाचा आणि आनंदाचा सण म्हणजे ‘‘मंगळागौरी’’. आधुनिक युगाशी स्पर्धा करताना शहरामध्ये महाराष्ट्राची संस्कृती आणि सण-उत्सव साजरा करण्यासाठी अनेकदा मर्यादा येतात. मात्र, महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले, तर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळातो. याचा प्रयत्य भोसरी विधानसभेतील ‘‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’’ कार्यक्रमात येतो आहे. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता प्रोत्साहन या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘‘इंद्रायणी थडी’’ भरवणाऱ्या शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांच्या पुढाकाराने ‘‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…
शिरूर I झुंज न्यूज : शिरूर येथील शासन निर्णयाची पायमल्ली करणाऱ्या शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहीजे अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे. निवेदनात म्हणले आहे की, नागरी व औद्योगिक भागात आणि अनागरी भागासाठी इमारत व नियंत्रण रेषेसाठीची कमाल अंतरे निश्चित करण्यात आलेली आहेत. नागरी भागातून म्हणजेच कोणत्याही कायदयान्वये गठित करण्यात आलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातून जाणारे सर्व रस्ते हे नागरी वस्तीतून जात असल्यामुळे अशा राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग अथवा द्रुतगती मार्गांना व अन्य दर्जाच्या रस्त्यांना त्या शहराचे विकास योजना रस्ते (डिपी रोड) म्हणून समजण्यात यावे व अशा विकास योजना रस्त्यांसाठी त्या शहराच्या विकास नियंत्रण…
नाट्य परिषदेच्या वर्धापन दिन सोहळ्यात होणार पुरस्काराचे वितरण नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांची घोषणा पिंपरी I झुंज न्यूज : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नाट्य- चित्र अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त नाट्य व इतर सांस्कृतिक क्षेत्रातील राज्य व स्थानिक कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. यंदापासून नाट्य चित्रक्षेत्रातील सन्माननीय जेष्ठ कलावंताला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. यंदाचा पहिला जीवनगौरव…
पुणे I झुंज न्यूज : गणेशखिंड येथील माॅडर्न कॉलेज मध्ये नुकतीच आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांची163 वी जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस आहे. श्री शिवप्रसाद एम के, सचिव, विज्ञान भारती, पश्चिम केंद्र यांनी आचार्य प्रफुल चंद्र राय यांच्या जीवनपटलावर त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांची वैज्ञानिक दूरदृष्टी व देशभक्ती यावर विस्तृत मांडणी केली तसेच भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमाचा आढावा घेतला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आचार्यांचा आदर्श ठेऊन भव्य उद्दिष्ट साध्य करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. प्राचार्य डॉ संजय खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या निमित्ताने रसायनशत्राच्या M.Sc. द्वितीय वर्षाच्या च्या विद्यार्थ्यांनी रसायन शास्त्राच्या पदवीच्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून रसायनशास्त्रावर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली…
सासवड I झुंज न्यूज : “ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम” चा जय घोष करीत टाळमृदुंगाच्या गजरात श्री संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज पालखीचे श्री क्षेत्र अरणकडे प्रस्थान झाले आहे. श्रीक्षेत्र अरण या पायी वारीचे हे ७ वे वर्षे आहे. श्री क्षेत्र सासवड सोपान काका समाधी स्थळ ते अरण (तालुका माढा जिल्हा सोलापूर) श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी स्थळ असा पायी पालखी सोहळा गेली सात वर्षापासून हभ प दिलीप महाराज झगडे यांच्या संकल्पनेतून ह भ प दत्तात्रय महाराज फरांदे बाळासाहेब बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघत आहे. दरम्यान पुरंदरचे आमदार संजय जगताप व जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ दिगंबर दुर्गाडे यांनीही सोहळ्याला…
भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांची मागणी पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड आणि ह प्रभागांतर्गत येणाऱ्या उद्यान, महापालिका शाळा व पाण्याची टाकी याठिकाणची सुरक्षा व देखभाल करण्याच्या कामांसाठी कंत्राटी पद्धतीने नमलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेत आणि किमान वेतन दरानुसार वेतन न देणाऱ्या क्रिस्टल कंपनीवर कायदेशीर कारवाई कारण्यात यावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील अनेक कामांचे खासगीकरण केलेले आहे त्यानुसार ड आणि ह प्रभाग हद्दीतील उद्यान, महापालिका शाळा व पाण्याची टाकी येथे सुरक्षा…
– आमदार महेश लांडगे यांची यंत्रणा लागली कामाला – स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार काम ‘फास्ट ट्रॅक’वर ! पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराचे उपनगर म्हणून नावारुपाला येत असलेल्या बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाला गती देण्यात येत आहे. वुड्सविले सोसायटी, कुमार प्रिन्सविले सोसायटी अशा विविध सोसायट्यांना जोडणारा आणि श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथील महानगरपालिका विकास आराखड्यातील १८ मीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहर आणि परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली. यामुळे सर्वसामान्य नागरिक व वाहनचालक यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. तसेच, वुड्सविले सोसायटी येथील १८ मीटर डीपी रस्ता विकसित करावा,…
शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते व विभागप्रमुख गोरख पाटील निलंगेकर यांच्यावतीने आयोजन पिंपरी I झुंज न्यूज : शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे पिंपरी चिंचवड उपशहरप्रमुख हरेश नखाते, महिला आघाडीच्या विभाग संघटिका सुजाता नखाते आणि विभागप्रमुख गोरख पाटील निलंगेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी यूनिव्हर्सल हेल्थ केअरच्या वतीने ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर भारतीय डाक सेवेच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घेतला. नव मतदारांसाठी मतदार नाव नोंदणी राबविण्यात आली. त्याचबरोबर पासपोर्ट, पॅनकार्ड, गॅजेट यांसारखे महत्वाची कागदपत्रेही जागेवर काढून देण्यात आली.…
पिंपरी I झुंज न्यूज : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांचे शुक्रवारी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत किवळे देहुरोड बाह्यवळण या ठिकाणी शिवेसना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ढोल ताशा वादनाने तसेच जेसीबी मधून पृष्पवृष्टी करून व फटाके वाजवून जोरदार जंगी स्वागत करण्यात आले. स्वागत प्रसंगी मावळ लोकसभा संघटक श्री. संजोग वाघेरे (पाटील) यांनी पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले. या दरम्यान पुणे जिल्हाप्रमुख माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले , युवासेना प्रमुख श्री. चेतन पवार , जिल्हाप्रमुख सौ. सुलभाताई उबाळे, महिला शहर संघटिका सौ. अनिताताई तुतारे , माजी शहरप्रमुख…
पिंपरी I झुंज न्यूज : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदेच्या मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार (३ ऑगस्ट) पासून मंगळवार (दि.६ ऑगस्ट) पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. उद्योगनगरी म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण करून देण्यात भाऊसाहेब भोईर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ३ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट या कालावधीत शहराच्या वेगवेगळ्या भागात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाऊसाहेब भोईर मित्र परिवाराच्या वतीने गुरूवारी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. या सांस्कृतिक कार्यक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेतील सांस्कृतिक…
ज्ञान प्रबोधिनी विद्यालयातील क्रीडाकुल विभागाचा उपक्रम पिंपरी I झुंज न्यूज : दि. 29 – पॅरिस ऑलिंपिक 2024 च्या निमित्ताने ऑलिंपिकचा प्रवास सांगणारे विशेष प्रदर्शन निगडी, प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील क्रीडाकुल विभागाने भरवले आहे. या प्रदर्शनाास सोमवारी (दि.29) सुरूवात झाली. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी, खेळाडू व पालकांनी गर्दी केली आहे. हे प्रदर्शन रविवार (दि.4) पर्यंत खुले राहणार आहे. ऑलिंपिक स्पर्धांची माहिती, त्यांचा इतिहास, क्रीडा विज्ञान, भारताचे ऑलिम्पिकमधील स्थान, यासोबतच खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा अशा सर्वांचे एकत्रित प्रदर्शन तक्तांच्या स्वरूपात मांडले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कै. हेमंत जोगदेव यांचे सुपुत्र वसंत…