पुणे I झुंज न्यूज : ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल व रिपब्लिकन शक्ती च्या वतीने स्नेहल परिवार या वस्तीगृहात कार्यक्रमाचा खर्च टाळून वस्तीगृहातील मुलांना फळे बिस्किटे व अन्नदान करून जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी वस्तीगृहाचे अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय इंगळे यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले व आदिवासी पारधी समाज सुरक्षा दलाचे अध्यक्ष माऊली भोसले यांनी आदिवासी क्रांतिकारी समशेर सिंग भोसले (पारधी) यांच्या कार्याची माहिती मुलांना व उपस्थितांना दिली.
सारिका माय इंगळे यांनी आभार मानले यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अनिल पवार, सतीश भोसले, विशाल भोसले, सर्जन पवार, दिपाली भोसले, श्रीमंत भोसले, शंभू कांबळे, आदित्य काळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.