- मुखपृष्ठ
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राजकीय
- भटकंती
- देश – विदेश
- क्रीडा
- फिल्मी दुनिया
- आरोग्य
- गुन्हेगारी
- सांस्कृतिक
- लेखांकन
- काव्य लहरी
- व्हिडिओ
- Privacy policy
- DMCA
- DISCLAIMER
- ABOUT US
- CONTACT US
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: झुंज न्यूज
प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्याने, आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘झुंज न्यूज’ वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल करत आहोत. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय आपला प्रतिसाद आम्हाला नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे झुंज न्यूज परिवार आपले स्वागत करत आहे धन्यवाद. आपला अनिल वडघुले. संपर्क ‘झुंज न्यूज’ 9822083064 9673917313 9881444068 ईमेल Krantizunj@yahoo.in admin@zunjnews-in.preview-domain.com वेबसाईट : http://zunjnews-in.preview-domain.com
‘फ्रेंड्स ऑफ राहुल’ तर्फे स्नेह मेळाव्यात वाकड पुनावळे परिसरातील सोसायटी धारकांशी कलाटेंचा संवाद वाकड I झुंज न्यूज : राजकारण हे व्यवसायासाठी आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी नसून ते खऱ्या अर्थाने जनसेवेसाठी वापरण्याचे काम राहुल कलाटे करत आहेत. कोणीही कधीही त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. त्यांच्या प्रामाणिक राजकीय धडपडीचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळे आमच्या भावी पिढीसाठी, चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या राहुल कलाटे यांनाच आम्ही आमदार करणार असा निर्धार आयटीयन्स आणि सोसायटीधारकांनी ‘फ्रेंड्स ऑफ राहुल’ तर्फे आयोजित स्नेह मेळाव्या दरम्यान केला. ‘फ्रेंड्स ऑफ राहुल’ या मंचातर्फे वाकड येथील हॉटेलमध्ये स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी मतदार…
आम आदमी पक्षाचा विजयी संकल्प कार्यकर्ता मेळावा चिंचवड I झुंज न्यूज : चिंचवड विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकप्रिय उमेदवार राहुल कलाटे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प आम आदमी पार्टीच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केला. यावेळी आम आदमी पार्टीचे मुख्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्षा मिना जावळे, युवक शहराध्यक्ष रविराज काळे, वैजनाथ शिरसाट, सचिन पवार, संतोष इंगळे, स्वप्निल जेवळे, सोनाली झोळ, सुरेश बावणकर, मंगेश आंबेकर यांच्यासह शहरातील आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहाराध्यक्षा मीना जावळे म्हणाल्या, चिंचवडमध्ये विकासकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. घराणेशाही व…
-पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार, ॲडव्होकेट असोसिएशन आणि लीगल सेलचा अजित गव्हाणे यांना पाठिंबा -वकील बांधवांच्या माध्यमातून शहरात संविधानाची सक्षमपणे अंमलबजावणी होणार- अजित गव्हाणे भोसरी I झुंज न्यूज : महाराष्ट्र राज्य शाहू,फुले, आंबेडकरांच्या विचारांना मानते. पुरोगामी महाराष्ट्रात संविधानावर चालणारे कायद्याचे राज्य आपल्याला हवे आहेत. वकील बांधवांच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था मानणारा,भयमुक्त व शाश्वत विकासाचा चेहरा असलेले पिंपरी चिंचवड आगामी काळात घडवायचे आहे असा विश्वास माविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला. भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वकील बांधवांच्या कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे शनिवारी (दि.16)आयोजन करण्यात आले. यमुनानगर येथील सीझन बँक्वेट हॉल येथे हा मेळावा पार पडला.…
प्रोग्रेसिव्ह ए्ज्युकेशन सोसायटीत ‘शिक्षण व्यवस्था – सद्यस्थिती व भविष्य’ या विषयावर विशेष चर्चासत्र संपन्न पुणे I झुंज न्यूज : पुणे एज्युकेशन फोरम व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने ‘ भारतीय शिक्षण व्यवस्था – सद्यस्थिती व भविष्य’ याविषयावर विशेष चर्चासत्र प्रोग्रेसिव्ह ए्ज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी प्रमोद रावत,अध्यक्ष, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे, डाॅ प्रशांत साठे, राजेश पांडे, महामंत्री, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशव प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ गजानन र एकबोटे, सहकार्यवाह, डाॅ सौ जोत्स्ना एकबोटे, कार्यवाह प्रा शामकांत देशमख व उपकार्यवाह डाॅ निवेदिता एकबोटे हे उपस्थित होते.…
शास्तीकर, साडेबारा टक्के परताव्याचा अवघड प्रश्न सोडवला – शरद पवार आणि त्यांची कन्या ‘फेक नेरेटिव्ह’ची फॅक्टरी भोसरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील शास्तीकर, साडेबारा टक्के परतावा यांसारखे अवघड प्रश्न आपण सोडवले. काळजी करू नका आमदार महेश लांडगे यांनी रेड झोन आणि निळ्या पुररेषेतील बांधकामे हा प्रश्न बराच पुढे नेला आहे. येत्या काळात रेड झोन आणि निळ्या पूररेषेतील बांधकामांचा प्रश्न देखील सोडवला जाणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचे ‘फेक नेरेटिव्ह’ शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे करत असून ‘फेक नेरेटिव्ह’ची यांच्याकडे फॅक्टरी आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी टीका केली.…
लक्ष्मण जगताप यांच्या दूरदर्शी विचारांमुळे न्यायप्रणालीचा पाया मजबूत – ऍड. गोरखनाथ झोळ शंकर जगताप यांचे नेतृत्व न्यायसंस्थेला नवी दिशा देईल ; वकील संघटनांचा विश्वास चिंचवड I झुंज न्यूज : शहरातील वकिलांच्या समस्यांचे निराकरण व्हावे आणि न्यायप्रणाली अधिक सुसंगत बनवावी, यासाठी स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे चिखली येथे भव्य न्यायालय सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यांच्या दूरदर्शी विचारांमुळेच न्यायप्रणालीसाठी एक मजबूत पाया निर्माण झाला असून त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड कायदा आघाडी व संविधान विधी सेवा मंचचे सर्व वकील सदस्य एकजुटीने महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या पाठीशी उभे आहोत, असे प्रतिपादन कायदा आघाडीचे शहराध्यक्ष…
-पोलिसांना हाताशी धरून कार्यकर्त्यांची धरपकड ; फेक नेरेटिव्ह – विलास लांडे – कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास जशास तसे उत्तर देऊ -सुलभा उबाळे भोसरी I झुंज न्यूज : भोसरी मतदारसंघांमध्ये शनिवारी रात्री महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून पैसे सापडले आणि काही कार्यकर्त्यांना अटक केली .असा फेक नेरेटिव्ह पसरवला गेला. यातून जाणीवपूर्वक नागरिकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न झाला. वारंवार अशा प्रकारचे प्रयत्न विरोधी उमेदवारांकडून होत आहेत. पोलीस , निवडणूक विभाग या सर्वांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी सांगितले. महाविकास आघाडीला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव होताना दिसत आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक नागरिकांना आमिष…
– राहूल कलाटे यांचा भाजप उमेदवारावर खळबळजनक आरोप चिंचवड I झुंज न्यूज : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होत असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अवघे दोन दिवस निवडणुकीसाठी उरले असतानाच चिंचवड मतदारसंघात पैशांचे वाटप करत आदर्श आचारसंहितेचा भाजपकडून भंग करण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहूल कलाटे यांनी केला आहे. चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत पिंपळे गुरव परिसरात सुदर्शन कॉलनी, वैदवस्ती भागातील मतदारांना पैसे व इतर विविध स्वरूपाचे आमिष दाखवण्यात येत असून मतदारांचे ओळखपत्र जमा केल्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे. हि घटना…
बालेकिल्ल्यात एक गठ्ठा मतदान होणार ; कार्यकर्त्यांचा विश्वास चिंचवड I झुंज न्यूज : चिंचवड मतदार संघातील सध्याचे चित्र पाहिले तर असं दिसत आहे की शेवटच्या दोन दिवसात चिंचवड विधानसभेचे गणित फिरणार असून अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर लीड घेतील अशी परिस्थिती आहे. पिंपरी चिंचवड या शहराला उद्योगनगरी अशी ओळख आहे, ती सर्वश्रुत आहे. परंतु नव्याने सांस्कृतिक नगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहर ओळखले जाऊ लागले याचे श्रेय भाऊसाहेब भोईर यांना दिले पाहिजे. कारण सुप्रसिद्ध आणि दिग्गज कलाकार आणून त्यांचे कार्यक्रम आयोजित करणे आणि शहरातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे हे कार्य भाऊसाहेब भोईर यांच्या हातून अविरतपणे घडत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य…
शिरूर I झुंज न्यूज : महाविकास आघाडीचे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ॲड. अशोक बापु पवार यांना आमदार व मंत्री करण्यासाठी रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष माऊली भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिरूर हवेलीच्या प्रचारात व पाठिंबा देऊन उतरले आहेत. रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक अर्जुनराव डांगळे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या आदेशावरून पुणे जिल्हाध्यक्ष माऊली उर्फ किसन रामा भोसले यांनी पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिला असून रिपब्लिकन जनशक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर गेले बारा वर्षे युतीमध्ये असून महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. ॲड.अशोक बाप्पु पवार हे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमहत्व असून…
गडकरींना राहुल कलाटे यांचे भावनिक पत्र ! वाकड I झुंज न्यूज : चिंचवड विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी (ता.16) सायंकाळी वाकड येथे येणार आहेत. याचेच औचित्य साधून आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी गडकरी यांना भावानिक पत्र लिहिले आहे. यामध्ये, मतदार संघातील प्रलंबित समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधून जरा, यावर एकदा बोलाच असे भावानिक आवाहन कलाटे यांनी केले आहे. हे पत्र गडकरींच्या सभेपूर्वी शहरात दिवसभर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. दरम्यान, वाकड -पुनावळेपासून रावेत किवळ्यापर्यंतच्या हायवेलगतच्या रस्त्याने किंवा सेवा रस्त्याने प्रवास करतांना आमच्यापैकी अनेकांना दररोज आपली आठवण येत असते. याठिकाणी खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डे अशी केवीलवाणी…
– चिंचवडमध्ये सोसायट्यात भेटीगाठी व बैठका – चोवीस तास सेवेस तत्पर राहण्याचा दिला विश्वास. चिंचवड । झुंज न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिंचवड विधानसभेचे उमेदवार राहुल कलाटे यांनी चिंचवड भागातील अनेक सोसायटीत प्रत्यक्ष भेट देऊन संवाद साधला. प्रामुख्याने चिंचवड, रावेत, बिजलीनगर, प्रेमलोक पार्क, चिंचवडगाव तसेच पिंपळे गुरव परिसरातील सोसायट्यांचा यात समावेश होता. यावेळी, कलाटे यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि टँकरमुक्त चिंचवड, समस्यामुक्त चिंचवड करण्याचा विश्वास नागरिकांना दिला. विधानसभा निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असल्याने, कलाटे यांच्याकडून विविध ठिकाणी वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला जात आहे. सोसायटी धारकांशी संवाद साधण्यापूर्वी कलाटे यांनी चिंचवड गावातील श्री. मोरया गोसावी समाधीस्थळी, प्राचीन…
चिंचवड विधानसभेचे वातावरण फिरले ; भाऊसाहेब भोईर यांचा विजय निश्चित आजपर्यंत मी कधीही जातीपातीचे धर्माचे राजकारण केले नसल्याने लोकांचा मला थेट पाठिंबा – भाऊसाहेब भोईर चिंचवड I झुंज न्यूज : प्रचारामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध संस्था संघटनांकडून भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा मिळत आहे. सध्या याच चिंचवड विधानसभा मतदार संघातून रिंगणात असलेले प्रतिस्पर्धी सिद्धिक शेख यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला. या प्रसंगी सिद्धिक शेख, भाऊसाहेब भोईर, मा. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि पदाधिकारी उपस्थित होते. चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे चिंचवड विधानसभेचे अधिकृत उमेदवार आणि अपना…
– मोशी कचरा डेपोवरील प्रकल्पांमुळे नागरी आरोग्य संवर्धन – बफर झोन कमी झाल्यामुळे पायाभूत सोयी-सुविधा मिळाल्या भोसरी I झुंज न्यूज : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि तत्कालीन आमदारांनी दुर्लक्ष केलेला मोशी येथील ‘बफर झोन’चा प्रश्न आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच सुटला आहे. लांडगे यांच्या पाठपुराव्याने ‘बफर झोन’ची हद्द ५०० मीटरवरून १०० मीटर इतकी कमी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आम्ही महेश लांडगे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मोशीकरांनी दिली. या भागातून विजयी मताधिक्य देण्याचा निर्धार केला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी मोशीतील आदर्शनगर, खान्देशनगर, गंधर्वनगरी, तापकीरनगर, फातिमानगर, संत ज्ञानेश्वरनगर…
– शेवटच्या टप्प्यात अजित गव्हाणे यांना वाढता पाठिंबा – चक्रपाणी वसाहत, महादेवनगर , लांडगे वस्तीमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भोसरी I झुंज न्यूज : मूलभूत प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा, शांतता, महिलांना सुरक्षा या मुद्द्यावर चक्रपाणी वसाहत, लांडगे वस्ती, राधाकृष्ण नगर तसेच चक्रपाणी वसाहतीतील नागरिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना जास्तीत जास्त लीड देऊन विजयी करणार असल्याचे सांगितले. दरम्यान निवडणूक येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणार असून शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल प्रचंड वाढले असून , राम कृष्ण हरी वाजवा तुतारी असा एकच जयघोष पाहायला मिळत आहे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस…
पिंपळे निलखमध्ये राहुल कलाटे यांच्या पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग पिंपळे निलख I झुंज न्यूज : महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या पिंपळे निलख – विशाल नगरमधील पदयात्रेत महिलांनी मोठया प्रमाणात सहभागी होऊन महाविकास आघाडीचे ‘महालक्ष्मी’ योजनेवर समाधान व्यक्त करत मविआचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांना भरघोस मतांनी जिंकून देण्याचा निर्धार केला. पिंपळे निलखचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद घेऊन सुरु झालेल्या पदयात्रेत स्थानिक नागरिकांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता. गृहिणी ते उच्च शिक्षित मोकरदार महिलांनीही पदयात्रेत सहभाग घेतला. पदयात्रा मार्गावर महिलांनी जागोजागी औक्षण करत, ‘रामकृष्ण हरी – वाजवा तुतारी’च्या घोषणा देत कलाटे यांना पाठिंबा दिला. नवयुग मित्र मंडळ चौकात…
आदिवासी बांधवांच्या सशक्तीकरणासाठी आम्ही कटिबद्ध – शंकर जगताप जनजातीय गौरव दिनानिमित्त आदिवासी बांधवांना जगताप यांनी दिल्या शुभेच्छा चिंचवड I झुंज न्यूज : महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या प्रभावी नेतृत्वाने ब्रिटिशांच्या विरोधात आदिवासी समाजाचे शोषण थांबवण्यासाठी लढा दिला. क्रांतीच्या माध्यमातून त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या संघर्षाने देशातील स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. आजच्या दिवशी आपण त्यांचे शौर्य, त्याग आणि कार्याची प्रेरणा घेणे आवश्यक आहे, अशा शब्दांत शंकर जगताप यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.आदिवासी जननायक, स्वातंत्र्य सेनानी व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पिंपळे गुरव येथे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप -…
अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ संभाजीनगर, शाहूनगर, आंबेडकर नगर प्रचार दौरा पिंपरी I झुंज न्यूज : महाराष्ट्राचा विकास प्रगती व उज्वल भविष्यासाठी महायुतीला मतदान करा. घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून पिंपरी विधानसभा मतदार संघातून कार्यक्षम आमदार अण्णा बनसोडे यांना पुन्हा एकदा विजयी करा असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती चे अधिकृत उमेदवार अण्णा दादू बनसोडे यांची संभाजीनगर, शाहूनगर, आंबेडकर नगर मध्ये गुरुवारी सायंकाळी प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी रूपाली चाकणकर बोलत होत्या. प्रचारफेरीची सुरवात तुळजाभवानी मंदिर, पोटे कॉर्नर जवळ संभाजी नगर येथून झाली. पुढेसुबोध विद्यालय, रसरंग स्वीटस, अटल बिहारी वाजपेयी उद्यान,…
शहरात चांगल्या शिक्षण संस्था आणण्यासाठी पालकांना केले आश्वस्थ महापालिका शाळांचा दर्जा सुधारणार, शिक्षण संस्था अद्यावत करणार भोसरी I झुंज न्यूज : महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे गुरुवारी इंद्रायणीनगर परिसरात चिमुकल्यांमध्ये रमले. गुरुवारी प्रचाराच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधत असताना काही चिमुकल्यांनी अजित गव्हाणे यांचे लक्ष वेधले. या मुलांशी गप्पा मारत त्यांच्या पालकांना आगामी काळात महापालिका शाळांचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच येथील शिक्षण संस्था अद्यावत करण्यावर भर देणार असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ बालाजी नगर इंद्रायणी नगर तसेच…
– दिवंगत माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्या निवासस्थानी दिली भेट – स्थायी समिती माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या कुटुंबियांशी चर्चा; जुन्या आठवणींना दिला उजाळा सांगवी । झुंज न्यूज : पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील महत्वाचे स्थान असलेल्या दिवंगत माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद यांनी गुरुवारी (ता. १४) सांत्वन भेट घेतली. शरद पवार यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनचे त्यांचे घनिष्ठ मित्र व सहकारी असलेल्या नानासाहेब शितोळे यांच्या पत्नीचे गेल्या महिन्यात २२ ऑक्टोंबर रोजी अनिता उर्फ नानी नानासाहेब शितोळे यांची निधन झाले होेते. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीतही पवार यांनी जुने ऋनाणुबंध जपत शितोळे कुटुंबियांच्या घरी भेट देवून…