शिरूर I झुंज न्यूज : महाविकास आघाडीचे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ॲड. अशोक बापु पवार यांना आमदार व मंत्री करण्यासाठी रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष माऊली भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिरूर हवेलीच्या प्रचारात व पाठिंबा देऊन उतरले आहेत.
रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक अर्जुनराव डांगळे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या आदेशावरून पुणे जिल्हाध्यक्ष माऊली उर्फ किसन रामा भोसले यांनी पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिला असून रिपब्लिकन जनशक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर गेले बारा वर्षे युतीमध्ये असून महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे.
ॲड.अशोक बाप्पु पवार हे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमहत्व असून त्यांनी शिरूर हवेली मध्ये जनतेच्या हिताची अनेक कामे केले असून सामान्य माणसांच्या प्रश्नांना त्यांनी न्याय दिलेला आहे शिरूर हवेली मतदारसंघातून निश्चितपणे विजय होणार असून त्या विजयामध्ये रिपब्लिकन जनशक्ती आपला खारीचा वाटा विजयाचा उचलणारा असून महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अशोक बाप्पु पवार यांना नागरिक निवडून देतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही.
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून ॲड.अशोक बाप्पु पवार विजयी झाल्यास ते सामान्य माणसांच्या प्रश्नांना निश्चितपणे न्याय देतील तसेच विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या घटकांना बरोबर घेऊन विकास करतील याचा विश्वास असल्यामुळे त्यांना रिपब्लिकन जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे.