जागा वाटपाचं सूत्र ठरलं ; ‘भाजपला २०, शिवसेना १२, राष्ट्रवादीला १० मंत्रीपदे’
मुंबई I झुंज न्यूज : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधावरी रात्री भेट घेतली. या भेटीवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते.
या बैठकीत महायुतीमधील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार? यावर निर्णय झाल्याचे समजते. यानुसार भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अनुक्रमे २०, १२, १० मंत्रीपदे या सुत्रांवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळ विस्तार अजून बाकी आहे. या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रात मंत्रिमंडळातील खातेवाटपाचे आणि कोणाला किती मंत्रीपदे याविषयीचे सूत्र ठरवण्यात आल्याचे समजते.
सुत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडे २० कॅबिनेट मंत्रीपद असण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडे १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे १० कॅबिनेट मंत्रीपदी असू शकतात.