राहुल कलाटेंचा दैनंदिन कामाचा धडाका नेहमीप्रमाणे सुरूच
वाकड । झुंज न्यूज : चिंचवड मतदारसंघात मतदान पार पडले. दरम्यान जाहीर सभा, रॅली, वैयक्तिक गाठी भेठी अशा झंजावती प्रचारासाठी गेली पंधरा दिवस पायाला भिंगरी लावून दिवस रात्र व्यग्र असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे मतदान प्रक्रिया संपली तरी लोकांच्या भेटीगाठीत व्यग्र असल्याचे दिसून आले. मतदान झाले त्यामुळे उसंत घेण्याऐवजी रात्री उशिरापर्यंत तर आज सकाळपासुन त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेटीगाठीसाठी येणाऱ्यांचा राबता दिसून आला.
आज सकाळी त्यांनी जनसंपर्क कार्यालयात बसून नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे. मतदार संघातील नागरीकांच्या भेटी, उदघाटने, विविध सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावत कलाटेंनी दैनंदिन कामाचा धडाका नेहमीप्रमाणे सुरू केला. जी जनता गेली १५-२० दिवस आपल्यासाठी झगडली, त्या जनते व कार्यकर्त्यांप्रती मनात कृतज्ञता ठेवून विधानसभा मतदानाला चोवीस तासही उलटत नाही तोच निकालाची पर्वा न करता राहुल कलाटे हे पुन्हा सक्रिय झालेले आहेत.
दरम्यान उद्योजक रेवननाथ खंडागळे यांनी पिंपरी येथे नव्याने सुरू केलेल्या ‘श्री साई संस्कृती सप्लायर्स आणि श्री साई समृध्दी इंटरप्राईजेस’ चे उद्घाटन त्यांनी करत नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी विविध सोसायटी्यांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. एकंदरीत राबविण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेबाबत चर्चा करीत आढावा घेतला.
चौकट : जनसंपर्क पुन्हा सुरु !
निवडणूक प्रक्रिया संपताच बहुतांश उमेदवार रिलॅक्स होण्यासाठी सुट्टीवर जातात. कोकण, गोवा वारी करत प्रचारादरम्यान झालेला संपूर्ण ताण तणाव घालवण्यासाठी पर्यटन वारी करत असतात. मात्र, याला कलाटे या सर्वाला अपवाद ठरले आहेत. ‘झालं इलेक्शन, जपा रिलेशन’ असा ध्यास धरत पुन्हा जनसेवेत सक्रिय झाले आहेत.
नागरिकांशी संपर्क यासाठी निवडणुकीचे निमित्त मला आवश्यक वाटत नाही. माझ्या कार्यालयात एरवीही सर्वसामान्य नागरिकांचा राबता असतो. तोच दिनक्रम कायम आहे. निवडणुकी दरम्यान माझे आयटी मधील मित्र, सोसायट्यांमधील सहकारीही प्रचारात सहभागी होते. त्यांच्या भेटी घेऊन आभार मानले. – राहुल कलाटे