देशाबरोबरच संपूर्ण दुनियेत कोरोना महामारिने थैमान घातलंय. सर्व दुनिया या कोरोना वर मात करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहतोय आपण. या लढाईमध्ये लाखो लोकांचे प्राण गेलेत आणि अजून हि लाखो लोक जन्ममृत्यु शी झुंज देत आहेत. सर्व दुनिया लॉक डाऊन मद्ये आहे. सर्व कामधंदे बंद आहेत सर्व जन चार भिंतीमध्ये बंधिस्त आहेत. आपले रक्षण करण्यासाठी पोलिस, डॉक्टर्स, सफाई कामगार, समाजसेवक जीवाची बाजी लावत आहेत. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. त्यांना सर्व जनता ही प्रामाणिक पने साथ देत आहे. त्यामुळे जनतेची नक्कीच आभार मानले पाहिजेत. कारण सर्व कामधंदे बंद असताना चार भिंतीत कश्या पद्धतीत जगत आहेत याचा विचार न केलेला बरा .
सर्वच लोकांची परिस्थिती चांगली आहे अस नाही. शेतकरी लोक असतील, मध्यमवर्गीय लोक असतील, सर्व कामगार वर्ग असेल काही हातावरच पोट आहे जे लोक रोजच्या रोज कमवून रोजच्या रोज खातात त्यांचे अतिशय हाल होताना दिसतात. जे लोक घरदार सोडून पोट भरण्यासाठी दुसऱ्या गावी दुसऱ्या राज्यात जातात त्यांचे तर मरणच झालंय. ना घरका न घाटका अशी अवस्था झालीय. आहे त्या जागेवर थांबले तरी मजूर लोकांची उपासमारीची वेळ आलीय आणि समजा घरी जायचं म्हणले तरी जाण्याची सोय नाही. काही मजूर लोक शेकडो किलोमीटर चा प्रवास पाई करत आहेत त्यामध्ये किती तरी लोकांचे बळी सुध्धा गेलेत. अन्न नाही खिशात पैसे नाहीत जगायचं तरी कसं त्यांनीं. उपासमारीने पण खूप लोकांना आपला प्राण गमवावा लागलाय. समाजातील मानवतावादी लोक प्रामाणिक पने माणुसकी निभावत आहेत. गरजू लोकांना निस्वार्थी पणाने मदत करत आहेत. प्रत्येक सरकार ही अतिशय चोख पने भूमिका बजावत आहेत. हा काही समाजकंटक राजकारणी या राष्ट्रीय आपत्ती मद्ये पण राजकारण करू पाहतात पण अश्या निर्बुद्ध लोकांकडे लक्षच न दिलेलं बर. पण या सगळ्यांमध्ये एक असा घटक आहे तो समाजतील अत्यंत महत्त्वाचा आहे पण तो सध्या समाजापासून दुर्लक्षित आहे तो म्हणजे “सेक्स वर्कर महिला”.
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला म्हणले की, आपल्या मनात पहिल्यांदा किळसवाणी भावना उत्पन्न होते. आपण त्यांना नेहमी सोशल डीस्टसिंग मध्ये ठेवतो. कारण त्यांना आपण समाजातील अतिशय निकृष्ट दर्जाची वागणूक देतो. वेश्या म्हणजे सामाजाला लागलेला कलंक समजतो. समाज कधीही या लोकांना आपलंसं करत नाही. पण आपण कदी असा विचार केलाय का की जर सेक्स वर्कर महिला नसत्या तर. आपल्या समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसलाय तो याच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांमुळे. या जर नसत्या तर रोज आपल्या माता भगिनींची अब्रू वेशीला टांगली असती. याच वेश्या समाजामधील दुष्कर्म कमी करण्याचं महत्वाचं काम करत आहेत. कोणत्याही महिलेला हाऊस नसती स्वतःची देह विक्री करायची.प्रयेक महिला या दलदलिमध्ये रुतून जाती ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे.
सध्या या लॉक डाऊन मुळे यांच्याही व्यवसायाला स्थगिती आहे. जसं बाकीचे लोक काम करून पोट भारतात तसच याही महिला स्वतःच पोट भरण्यासाठी रोज हे काम करत असतात. पण आता यांच्यावर ही उपासमारीची वेळ आलीय. हा आता ज्या महिला उघडपणे हा व्यवसाय करतात म्हणजे कुंटणखाना असेल, पब्लिक प्लेस असेल, हॉटेल्स मद्ये व्यवसाय करणाऱ्या असतील त्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे कारण अशा व्यवसाइकांच्या पण संघटना आहेत त्यांच्या मार्फत नक्कीच मदत मिळू शकतात. पण देशात असेल किंवा संपूर्ण जगभरात कितीतरी वयक्तिक बेस वर काम करणाऱ्या अश्या महिला आहेत की ज्या सामाजिक, कौटुंबिक उत्पिडणामुळे वगळण्यात येत ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असते त्यांना मजबुरण समाज प्रवाहाच्या विरूध्द जाऊन स्वतःच घर चालवण्यासाठी हे काम करावं लागतं दिवसभर मिळेल ते उदरनिर्वाहसाठी काम करतात आणि रात्री देह विक्री करावी लागते किंवा दिवस असो की रात्र फक्त देह विक्रीवराच ज्यांचा उदरनिर्वाह चालतो अश्या महिलांचं कुटुंब आहे लहान लहान लेकरं आहेत. त्यांचं पोट भरण्यासाठी मजबुरन देह विक्री करावीचं लागते.
अश्या महिलांवर आणि त्यांच्या कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आलीय. एकतर उघडपणे सांगू शकत नाहीत की वेश्या व्यवसाय करतात आणि आणि दुसरीकडे समाज त्यांना जवळ करत नाही अश्या वेळेला करायचं तरी काय त्यांनी. ना कोणाकडून मदत ना सहकार्य कस कुटुंबाला सांभाळायचं. समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून समाजाने माणुसकीच्या नात्याने सेक्स वर्कर कडे दुर्लक्ष न करता होईल तेवढी मदत केली पाहिजे. त्याचबरोबर सरकारने पण अश्या दुर्लक्षित घटकांकडे लक्ष देऊन उपाययोजना केल्या पाहिजेत. कारण त्या वेश्या असल्या तरीही त्या माणूसच आहेत. आणि त्यांना ही समाजात समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. जेवढा सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार आहे , सामान्य माणसांचे मूलभूत अधिकार आहेत तेवढेच त्यांना ही अधिकार आहे समाजात ताठ मानेने जगण्याचा.
दिग्दर्शक,
प्रितम (राजा) रणबागले ,
मोबा : ८५३०३७१५६७