बावधन I झुंज न्यूज : कै. शरद भाऊराव मोरे यांच्या प्रथम स्मरणात बावधन पुणे येथील अनिकेत सेवाभावी संस्था संचलित निवासी मतिमंद मुला मुलींचे पुनर्वसन विद्यालयात अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मोरे परिवाराचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर दिनकर मोरे, सागर शरद मोरे, सुमित शरद मोरे, रेखा शरद मोरे, नवनाथ व्यंकटराव बसूदे, सुनील बाबुराव बसूदे, योगेश बसुदे, भागवत घोरपडे यांनी या अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
संस्थेच्या अध्यक्ष कल्पना वरपे व गणेश तनपुरे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.