पिंपरी I झुंज न्यूज : आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. महापालिकेत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी शिवसैनिकांनी निर्धार केला आहे. त्याकरिता शिवसेनेने राबविलेल्या शिवसंपर्क अभियानाला पिंपरी विधानसभेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानूसार प्रभागातील बूथ बांधणी मजबूत करुन प्रत्येक बुथवर दहा शिवसैनिकांची टीम तयार करण्यात येत आहे, अशी माहिती शिवसेनेचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक अॅड सचिन भोसले यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने राज्यातील जनतेच्या हितासाठी लोक कल्याणासाठी राबविलेल्या योजना तळागाळातील जनतेपर्यत पोचविण्याचे काम शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून केले जात आहे. शिवसेनेचे खा. संजय राऊत, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खा. शिवाजी आढळराव पाटील, गजानन बाबर आदीच्या मार्गदर्शनाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाचा विचार तळागाळात पोहोचविण्यात येत आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. शहरात शिवसेनेचे विचार ध्येय धोरणे प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचविण्याचे काम सुरु आहे. १४ जुलै ते १७ जुलै दरम्यान पिपरी विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबविण्यात आले.
निगडी प्राधिकरण, आकुर्डी, काळभोरनगर, संभाजीनगर, शाहूनगर, पिंपरीगांव, बोपोडी, दापोडी, कासारवाडी, बोपखेल या परिसरात प्रत्येक शिवसेनेच्या शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, कार्यकर्त आदींच्या गाठी – भेटी घेवून त्यांना शिवसंपर्क अभियानातून शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यास मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानात शिवसेनेचे मधुकर बाबर, सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, नगरसेवक अमित गावडे, प्रमोट कुटे, विशाल यादव, नगरसेविका मिलन यादव, महिला अध्यक्षा उर्मिला काळभोर या आदी पदाधिकारी यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन शिवससंपर्क अभियानातून संघटन अधिक मजबूत करण्यावर विचारविनिमय करण्यात आला. यावेळी राजेश वाबळे, पिंपरी विधानसभा प्रमुख, भाविक देशमुख (शहर समन्वयक), उपशहर प्रमुख तुषार नवले, अमोल निकम, पांडुरंग पाटील, पदाधिकारी विजय गुप्ता, सरिता साने, जावेद आतार व सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख आदी उपस्थित होते.