शिरूर I झुंज न्यूज : रविवारी चिंचोली मोराची गावामध्ये वृक्षारोपणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडला. हा उपक्रम मोराची चिंचोली ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ यांच्या विद्यमानाने आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठीचिंचोली गावचे भूषण उद्योजक संभाजी उकिरडे, माय भूमी फाउंडेशन अध्यक्ष सतीश शिंगणे, गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच अशोक गोरडे, उपसरपंच राहुल नानेकर, पोलीस पाटील अमित उकिरडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन गोरडे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव नाणेकर, ग्रामपंचायत सदस्य विजय मोहिते, ग्रामपंचायत सदस्य संतोष भोसले, अशोक नानेकर, संजय नाणेकर हे उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ दत्तात्रय दिनकर नाणेकर, दत्ताभाऊ करंजकर, चंद्रकांत पंढरीनाथ नाणेकर, मोहन शेठ सखाराम नाणेकर ,बाजीराव मामा उकिरडे ,भगवान धुमाळ , गणेश दादा धुमाळ ,भाऊसाहेब मल्हारी नाणेकर, सावळेराम धुमाळ, पप्पू नाणेकर, खंडू नानेकर , दत्ता नानेकर, पिंटू नाणेकर, दामू नानेकर, शशिकांत नाणेकर ,संतोष साळे, अक्षय उकिरडे, अमोल येवले ,सागर मच्छिंद्र नाणेकर, दशरथ पडवळ यांचीहि उपस्थिती होती.
“वृक्षारोपणासाठी दत्ता धुमाळ यांनी जेसीबी, मेजर प्रकाश नाणेकर यांनी पाणी, न्यायाधीश दत्तू नाणेकर यांनी नाष्टा, अर्जुन विनायक नानेकर यांनी पोयटा माती व ट्रॅक्टर, गणेश नाणेकर यांनी रोप वाहतूक असे सहकार्य केले. ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्सहात संपन्न झाला.