पुणे I झुंज न्यूज : जागतिक योग दिनाचे औचित्य साधत “न्याती एक्सलंट” ग्रुप तर्फे “योगा सत्राचे” आयोजन करत योग दिवस साजरा करण्यात आला.
न्याती एन्वायरन सोसायटीचे चेअरमन निवृत्त कॅप्टन श्री नांबियार यांच्या हस्ते दीप प्रज्वल करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योग शिक्षक नरेंद्र वाणी यांनी केले होते.
“योग हा सुखी जीवनाचा राजमार्ग आहे असे योग शिक्षिका मालती पोहनेरकर यांनी मार्गदर्शन केले तर नांबियार म्हणाले कि, बिना औषध योगाने रोग दूर होतात तेव्हा बिना बोलण्यात वेळ न घालवता आपण योगा करूया.
यावेळी तोंडाला मास्क व सुरक्षित अंतर राखून योगा सत्राचा कार्यक्रम पार पडला. नरेंद्र वाणी यांनी योगावर केलेली कविता सादर करून आधार व्यक्त केले.