हातकणंगले I झुंज न्यूज : जाणारा माणूस तर परत येऊ शकत नाही, पण माझ्यामुळे इतर लोकांचे प्राण वाचणार असतील तर मला कामावर हजर राहावेच लागले ! हे वक्तव्य आहे कर्तव्यनिष्ठ आशा सेविका मधुमती खराडी यांचे. त्यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले असतानाच काही तासातच त्या पुन्हा आपल्या कामावर हजर झाल्या. त्यामुळे त्यांच्या कर्तव्यनिष्ठचे कौतुक सर्वत्र होत आहे.
हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे खासदार धैर्यशील माने कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आढावा बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे शिवसेना महिला आघाडी प्रमुख व आशा सेविका मधुमती खराडे यांच्या वडिलांचे कोरोनाने रविवारी (दि.९) सकाळी निधन झाले होते. तरीही त्या स्वतःला सावरत कर्तव्यावर हजर होत्या.
याबाबतची माहिती खासदार माने यांना समजताच त्यांनी त्यांचे सांत्वन करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठचे कौतुक केले, तसेच मधुमती खराडे यांसारख्या अशा अनेक रणरागिणी आहेत. ज्या कोणाच्या आई, बहीण आणि अर्धांगिनी आहेत. या महामारीच्या काळात कोरोनाविरोधात धाडसाने लढत आहेत. अशा कर्तव्यनिष्ठचे भगिनींच्या साथीने महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नसल्याची भावना खासदार माने यांनी व्यक्त केली.
“कोरोनामुळे मी माझे वडील गमावले आहेत, पण या संकटात इतरांची सेवा करून या रोगाविरोधात लढण्याची संधी मला देवानेच दिली आहे. इतरांचे जीव वाचणार असतील तर मी कामावर उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे खराडे म्हणाल्या.